S M L

ऊसतोडणी मजूर जळीतप्रकरणी वशिष्ट डाकेला अटक

10 जानेवारीबीडमधल्या गेवराई इथल्या ऊसतोडणी मजूर जळीत प्रकरणी आरोपी वशिष्ठ डाके याला अटक करण्यात आली आहे. तलवाडा पोलिसांनी डाके याला आज पहाटे पाच वाजता अटक केली. आज दुपारी दोन नंतर त्याला गेवराई कोर्टात हजर करण्यात येणार आहे. रंजेगाव चिंचोली गावात शहादेव म्हसोबा तायडे या ऊसतोडणी मजुराला वाशिष्ठ डाके यानं रॉकेल पेटवून जाळलं होतं.शहादेवनं डाकेकडून पाच हजार रुपये घेतले होते. शहादेव सांगली इथं ऊसतोडणीसाठी गेला होता. तो घरी आला असताना त्याला जाळण्यात आलं. दरम्यान, शहादेव याच्या कुटुंबीयांना भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी 50 हजारांची मदत जाहीर केली आहे. तसेच या प्रकरणाचा लवकर तपास करावा अशी सूचनाही केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 10, 2012 09:05 AM IST

10 जानेवारी

बीडमधल्या गेवराई इथल्या ऊसतोडणी मजूर जळीत प्रकरणी आरोपी वशिष्ठ डाके याला अटक करण्यात आली आहे. तलवाडा पोलिसांनी डाके याला आज पहाटे पाच वाजता अटक केली. आज दुपारी दोन नंतर त्याला गेवराई कोर्टात हजर करण्यात येणार आहे. रंजेगाव चिंचोली गावात शहादेव म्हसोबा तायडे या ऊसतोडणी मजुराला वाशिष्ठ डाके यानं रॉकेल पेटवून जाळलं होतं.शहादेवनं डाकेकडून पाच हजार रुपये घेतले होते. शहादेव सांगली इथं ऊसतोडणीसाठी गेला होता. तो घरी आला असताना त्याला जाळण्यात आलं. दरम्यान, शहादेव याच्या कुटुंबीयांना भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी 50 हजारांची मदत जाहीर केली आहे. तसेच या प्रकरणाचा लवकर तपास करावा अशी सूचनाही केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 10, 2012 09:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close