S M L

सांगलीत अजितराव घोरपडे यांचा काँग्रेसला रामराम

10 जानेवारीजिल्हा परिषद निवडणूकांच्या तोंडावर सांगली जिल्हात काँग्रेसला हादरा बसला आहे. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी काँग्रेसला राम राम करत राष्ट्रवादीची कास धरली आहे. जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. त्यांचा राष्ट्रवादीतला प्रवेश केवळ औपचारीकता राहिली आहे. घोरपडे हे सलग तीनदा जिल्हातील कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आलेत. 2009 मध्ये आर आर पाटील यांना घोरपडे यांनी तासगाव कवटेमहाकांळ विधानसभा क्षेत्रात आव्हान दिलं होतं. मात्र शरद पवार यांच्या मध्यस्थीमुळे त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. 1999 मध्ये आघाडी सरकारमध्ये घोरपडे पाटबंधारे राज्यमंत्री होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 10, 2012 02:13 PM IST

सांगलीत अजितराव घोरपडे यांचा काँग्रेसला रामराम

10 जानेवारी

जिल्हा परिषद निवडणूकांच्या तोंडावर सांगली जिल्हात काँग्रेसला हादरा बसला आहे. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी काँग्रेसला राम राम करत राष्ट्रवादीची कास धरली आहे. जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. त्यांचा राष्ट्रवादीतला प्रवेश केवळ औपचारीकता राहिली आहे. घोरपडे हे सलग तीनदा जिल्हातील कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आलेत. 2009 मध्ये आर आर पाटील यांना घोरपडे यांनी तासगाव कवटेमहाकांळ विधानसभा क्षेत्रात आव्हान दिलं होतं. मात्र शरद पवार यांच्या मध्यस्थीमुळे त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. 1999 मध्ये आघाडी सरकारमध्ये घोरपडे पाटबंधारे राज्यमंत्री होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 10, 2012 02:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close