S M L

सलमान रश्दींच्या भारत भेटीवर दारूल देवबंदचा विरोध

10 जानेवारीभारतीय वंशाचे लेखक सलमान रश्दी यांच्या भारत भेटीवरुन पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. जयपूरमध्ये होणार्‍या लिटररी फेस्टिव्हलसाठी रश्दी या महिन्याच्या शेवटी भारतात येत आहे. पण त्यांचा व्हिसा रद्द करावा अशी मागणी दारुल देवबंदने केली आहे. पण केंद्रीय कायदा मंत्री सलमान खुर्शीद यांनी ही मागणी फेटाळली आहे. रश्दी यांना भारतात येण्यापासून सरकार रोखणार नाही. हवं तर देवबंदनं कोर्टात जावं असं खुर्शीद यांनी म्हटलं आहे. आपल्या वादग्रस्त लेखनामुळे रश्दी नेहमीच चर्चेत राहिले आहे. त्यांच्या सॅटॅनिक वर्सेस या पुस्तकावर भारतात बंदी घालण्यात आली आहे. तर इराणनंही त्यांच्याविरोधात फतवा काढला आहे. दरम्यान रश्दी यांना भारतात येण्यासाठी व्हिसाची गरज नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 10, 2012 05:31 PM IST

सलमान रश्दींच्या भारत भेटीवर दारूल देवबंदचा विरोध

10 जानेवारी

भारतीय वंशाचे लेखक सलमान रश्दी यांच्या भारत भेटीवरुन पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. जयपूरमध्ये होणार्‍या लिटररी फेस्टिव्हलसाठी रश्दी या महिन्याच्या शेवटी भारतात येत आहे. पण त्यांचा व्हिसा रद्द करावा अशी मागणी दारुल देवबंदने केली आहे. पण केंद्रीय कायदा मंत्री सलमान खुर्शीद यांनी ही मागणी फेटाळली आहे. रश्दी यांना भारतात येण्यापासून सरकार रोखणार नाही. हवं तर देवबंदनं कोर्टात जावं असं खुर्शीद यांनी म्हटलं आहे. आपल्या वादग्रस्त लेखनामुळे रश्दी नेहमीच चर्चेत राहिले आहे. त्यांच्या सॅटॅनिक वर्सेस या पुस्तकावर भारतात बंदी घालण्यात आली आहे. तर इराणनंही त्यांच्याविरोधात फतवा काढला आहे. दरम्यान रश्दी यांना भारतात येण्यासाठी व्हिसाची गरज नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 10, 2012 05:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close