S M L

महायुतीत जागावाटपावरुन रस्सीखेच ; बैठक लांबणीवर

11 जानेवारीमुंबई व्यतिरिक्त पुणे, पिंपरी चिंचवड,अकोला, नाशिक या ठिकाणच्या महायुतीच्या जागावटपाची अंतिम टप्यातली चर्चा आज अपूर्ण राहिली. शिवसेना भवनात त्या त्या विभागातील प्रमुख नेत्यांची बैठक आज झाली होती. या बैठकीसाठी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले शिवसेना भवनात उपस्थित होते. पण भाजपचे नेते मात्र या बैठकीला आलेच नाहीत. त्यामुळे, जागावाटपाची घोषणा झालीच नाही. पिंपरी चिंचवडमध्ये 16 जागा सोडण्याची मागणी आरपीआयने केलीय. पण अधिकृत घोषणा आज झालीच नाही. पुण्यामध्ये सध्या 76 पैकी 43 जागांवर एकमत झाल्याचं सांगण्यात येतंय. महायुतीची पुढची बैठक आता उद्या, महायुतीमधल्या पक्षांच्या बैठका गुरुवारी पुण्यात होणार आहे. पुण्यात युतीत धुसफुसमुंबईतल्या महायुतीचं जागावाटप आता अंतिम टप्प्यात असताना पुण्यात मात्र दोन्ही मित्रपक्षांमध्ये धुसफुस अजुनही सुरूच आहे. यावर तोडग्यासाठी मुंबईत बैठकांचा सिलसिला सुरू आहे. त्यातच विकास मठकरी हे अध्यक्ष झाल्यापासून गडकरी गट आणि मुंडे गटातही धुसफूस सुरू आहे. त्यामुळे आपापल्या माणसांना उमेदवारी देण्यावरून भाजपांतर्गतही सध्या जोरदार लॉबिंग सुरू आहे. पुणे- नक्की वाद कुठं ? एकूण - 76 प्रभाग आणि 152 वॉर्ड्स- 40 प्रभाग आणि 80 वॉर्डांबाबत सहमती - 33 प्रभाग आणि 66 वॉर्डांबाबत वाद

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 11, 2012 05:36 PM IST

महायुतीत जागावाटपावरुन रस्सीखेच ; बैठक लांबणीवर

11 जानेवारी

मुंबई व्यतिरिक्त पुणे, पिंपरी चिंचवड,अकोला, नाशिक या ठिकाणच्या महायुतीच्या जागावटपाची अंतिम टप्यातली चर्चा आज अपूर्ण राहिली. शिवसेना भवनात त्या त्या विभागातील प्रमुख नेत्यांची बैठक आज झाली होती. या बैठकीसाठी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले शिवसेना भवनात उपस्थित होते. पण भाजपचे नेते मात्र या बैठकीला आलेच नाहीत. त्यामुळे, जागावाटपाची घोषणा झालीच नाही. पिंपरी चिंचवडमध्ये 16 जागा सोडण्याची मागणी आरपीआयने केलीय. पण अधिकृत घोषणा आज झालीच नाही. पुण्यामध्ये सध्या 76 पैकी 43 जागांवर एकमत झाल्याचं सांगण्यात येतंय. महायुतीची पुढची बैठक आता उद्या, महायुतीमधल्या पक्षांच्या बैठका गुरुवारी पुण्यात होणार आहे.

पुण्यात युतीत धुसफुस

मुंबईतल्या महायुतीचं जागावाटप आता अंतिम टप्प्यात असताना पुण्यात मात्र दोन्ही मित्रपक्षांमध्ये धुसफुस अजुनही सुरूच आहे. यावर तोडग्यासाठी मुंबईत बैठकांचा सिलसिला सुरू आहे. त्यातच विकास मठकरी हे अध्यक्ष झाल्यापासून गडकरी गट आणि मुंडे गटातही धुसफूस सुरू आहे. त्यामुळे आपापल्या माणसांना उमेदवारी देण्यावरून भाजपांतर्गतही सध्या जोरदार लॉबिंग सुरू आहे.

पुणे- नक्की वाद कुठं ?

एकूण - 76 प्रभाग आणि 152 वॉर्ड्स- 40 प्रभाग आणि 80 वॉर्डांबाबत सहमती - 33 प्रभाग आणि 66 वॉर्डांबाबत वाद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 11, 2012 05:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close