S M L

लोकसहभातून वारणेचं पाणी मिळालं कृष्णा नदीला

तुषार तपासे, सातारा11 जानेवारीउत्तर महाराष्ट्रात जळगांव आणि धुळ्यानंतर सातार्‍यातही नदी जोडण्याचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. सुमारा 11 मिटर उंचीच्या सह्याद्री पर्वताला छेदून वसंत सागर प्रकल्पातील वारणा नदीच्या वाया जाणार्‍या अतिरीक्त पाण्याचा फायदा हा कृष्णा नदीला झाला आहे. खळाळत्या पाण्याने नेहमीच प्रवाही असलेल्या वारणा नदीचं पाणी दर पावसाळ्यात वाया जायचं. पण आता दक्षिण माड नदीच्या माध्यमातून हेच पाणी कृष्णा नदीच्या पात्रात सोडण्यात आलं आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे यश हजारो शेतकर्‍यांनी गुढ्या उभारून साजरं केलं. या प्रकल्पामुळे जिल्ह्यात वाळवा,शिराळा आणि कराड तालुक्यातील 28 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. वाकुडे उपसा सिंचन योजना ही 2 टप्प्यांत होणार आहे. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे.. हा पूर्ण प्रकल्प लोकसहभागातून साकारण्यात आला आहे. चांदोलीमधल्या वारणा धरणाच्या डाव्या कालव्यातील हे पाणी पुढे बोगद्यातून हातगाव इथं लिफ्ट केलं आहे. तर वारणा धरणापासून 110 मीटर उंचीवरच्या बोगद्यातून हेच पाणी सायफन पद्धतीने कराडपर्यंत पोहोचवण्यात आलं आहे. या नदी जोड प्रकल्पामुळे कोरडवाहू शेतकर्‍यांच्या शेतात पाणी खेळणार आहे. त्यामुळे इथल्या शेतकर्‍यांना आता हिरवी स्वप्नं पडू लागली आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 11, 2012 02:34 PM IST

लोकसहभातून वारणेचं पाणी मिळालं कृष्णा नदीला

तुषार तपासे, सातारा

11 जानेवारी

उत्तर महाराष्ट्रात जळगांव आणि धुळ्यानंतर सातार्‍यातही नदी जोडण्याचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. सुमारा 11 मिटर उंचीच्या सह्याद्री पर्वताला छेदून वसंत सागर प्रकल्पातील वारणा नदीच्या वाया जाणार्‍या अतिरीक्त पाण्याचा फायदा हा कृष्णा नदीला झाला आहे.

खळाळत्या पाण्याने नेहमीच प्रवाही असलेल्या वारणा नदीचं पाणी दर पावसाळ्यात वाया जायचं. पण आता दक्षिण माड नदीच्या माध्यमातून हेच पाणी कृष्णा नदीच्या पात्रात सोडण्यात आलं आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे यश हजारो शेतकर्‍यांनी गुढ्या उभारून साजरं केलं. या प्रकल्पामुळे जिल्ह्यात वाळवा,शिराळा आणि कराड तालुक्यातील 28 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. वाकुडे उपसा सिंचन योजना ही 2 टप्प्यांत होणार आहे. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे.. हा पूर्ण प्रकल्प लोकसहभागातून साकारण्यात आला आहे.

चांदोलीमधल्या वारणा धरणाच्या डाव्या कालव्यातील हे पाणी पुढे बोगद्यातून हातगाव इथं लिफ्ट केलं आहे. तर वारणा धरणापासून 110 मीटर उंचीवरच्या बोगद्यातून हेच पाणी सायफन पद्धतीने कराडपर्यंत पोहोचवण्यात आलं आहे. या नदी जोड प्रकल्पामुळे कोरडवाहू शेतकर्‍यांच्या शेतात पाणी खेळणार आहे. त्यामुळे इथल्या शेतकर्‍यांना आता हिरवी स्वप्नं पडू लागली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 11, 2012 02:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close