S M L

टॉप 20 गुन्हेगारात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ;म्हणे पोलिसांचंच चुकलं !

गोविंद वाकडे, पिंपरी-चिंचवड11 जानेवारीमहापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याकरता पिंपरी-चिंचवड परिसरातल्या टॉप 20 गुन्हेगारांची यादी पोलिसांनी तयार केली. यातले काही गुन्हेगार हे राष्ट्रवादीसाठी काम करतात. विरोधकांनी या मुद्याचं भांडवलं केलं आहे. पण विशेष म्हणजे यादीतल्या काही गुन्हेगारांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, खंडणी, जबरी चोरी, सरकारी कर्मचार्‍यांना मारहाण अशा प्रकारच्या अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद या गुन्हेगारांवर आहे. पिंपरी शहरातल्या या टॉप 20 गुन्हेगारांमधल्या काहींचा गृहखातं असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसशी थेट संबंध आहे. हे आम्ही म्हणत नाही, तर हे चक्क पोलिसांचंच म्हणणं आहे.पिंपरी-चिंचवड शहरातले टॉप 20 गुन्हेगार कोण आहेत ?1) बाळू वाघेरे- मोकातला आरोपी- गुन्हे - 15- सध्या कारागृहात2) सुरेश ऊर्फ चिम्या निकाळजे- केबल व्यावसायिक- रिपब्लिकन युवा अध्यक्ष- इच्छूक उमेदवार3) देवेंद्र देवकर- गुन्हे - 104) संजय ऊर्फ सांगा चवरे- गुन्हे - 12- पक्ष - राष्ट्रवादी काँग्रेस5) हेमंत वाघेरे- गुन्हे - 7- सध्या तडीपार6) दत्तात्रय भांडेकर- गुन्हे - 9- पक्ष - राष्ट्रवादी काँग्रेस7) अदीथ टेकावडे- गुन्हे - 7- पक्ष - राष्ट्रवादी काँग्रेस8) उमेश टेकावडे- गुन्हे - 5- पक्ष - राष्ट्रवादी काँग्रेस9) सनी शिरसाठ- गुन्हे - 310) सचिन सुर्वे- गुन्हे - 611) राहुल विटकर- गुन्हे - 13- सध्या फरार- पक्ष - राष्ट्रवादी काँग्रेस12) अमर ऊर्फ रिंकू चौहान - गुन्हे - 17- सध्या फरार13) अभिजीत कुलागे- गुन्हे - 16- मजुरी करतो14) मीना गायकवाड- गुन्हे - 815) दशरथ सोनावणे- गुन्हे - 416) पंकज पवार- गुन्हे - 5- सध्या फरार17) राहुल उजागरे- गुन्हे - 518) सुनिल शिवपूर- गुन्हे - 18 - सध्या कारागृहात19) गणेश शिरसाठ- गुन्हे - 3- तडीपार20) रतन आवळे- गुन्हे - 5- सध्या तडीपारपोलिसांची ही यादी राजकीय दबावातून तयार झाल्याचा आरोप यापैकीच एका गुन्हेगाराने केला आहे. शहरातील मुख्य गुन्हेगार मोकाटच असल्याचं त्याचं म्हणणं आहे. गुन्हेगारांच्या यादीतल्या काहीजणांवर राष्ट्रवादीचं लेबल असल्याने त्यांच्यावर कारवाई होणार नाही, असा आरोप विरोधक करत आहेत. पण कुठलीही व्यक्ती ही जन्मजात गुन्हेगार नसते अशी भूमिका राष्ट्रवादीनं घेतली. गुन्हेगारांच्या यादीवरुन शहरात यादवी सुरु झालीय. पण पोलिसांनी तयार केलेली यादी किती काळजीपूर्वक तयार केली गेलीय यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 11, 2012 05:32 PM IST

टॉप 20 गुन्हेगारात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ;म्हणे पोलिसांचंच चुकलं !

गोविंद वाकडे, पिंपरी-चिंचवड

11 जानेवारी

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याकरता पिंपरी-चिंचवड परिसरातल्या टॉप 20 गुन्हेगारांची यादी पोलिसांनी तयार केली. यातले काही गुन्हेगार हे राष्ट्रवादीसाठी काम करतात. विरोधकांनी या मुद्याचं भांडवलं केलं आहे. पण विशेष म्हणजे यादीतल्या काही गुन्हेगारांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, खंडणी, जबरी चोरी, सरकारी कर्मचार्‍यांना मारहाण अशा प्रकारच्या अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद या गुन्हेगारांवर आहे. पिंपरी शहरातल्या या टॉप 20 गुन्हेगारांमधल्या काहींचा गृहखातं असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसशी थेट संबंध आहे. हे आम्ही म्हणत नाही, तर हे चक्क पोलिसांचंच म्हणणं आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातले टॉप 20 गुन्हेगार कोण आहेत ?1) बाळू वाघेरे- मोकातला आरोपी- गुन्हे - 15- सध्या कारागृहात2) सुरेश ऊर्फ चिम्या निकाळजे- केबल व्यावसायिक- रिपब्लिकन युवा अध्यक्ष- इच्छूक उमेदवार3) देवेंद्र देवकर- गुन्हे - 104) संजय ऊर्फ सांगा चवरे- गुन्हे - 12- पक्ष - राष्ट्रवादी काँग्रेस5) हेमंत वाघेरे- गुन्हे - 7- सध्या तडीपार6) दत्तात्रय भांडेकर- गुन्हे - 9- पक्ष - राष्ट्रवादी काँग्रेस7) अदीथ टेकावडे- गुन्हे - 7- पक्ष - राष्ट्रवादी काँग्रेस8) उमेश टेकावडे- गुन्हे - 5- पक्ष - राष्ट्रवादी काँग्रेस9) सनी शिरसाठ- गुन्हे - 310) सचिन सुर्वे- गुन्हे - 611) राहुल विटकर- गुन्हे - 13- सध्या फरार- पक्ष - राष्ट्रवादी काँग्रेस12) अमर ऊर्फ रिंकू चौहान - गुन्हे - 17- सध्या फरार13) अभिजीत कुलागे- गुन्हे - 16- मजुरी करतो14) मीना गायकवाड- गुन्हे - 815) दशरथ सोनावणे- गुन्हे - 416) पंकज पवार- गुन्हे - 5- सध्या फरार17) राहुल उजागरे- गुन्हे - 518) सुनिल शिवपूर- गुन्हे - 18 - सध्या कारागृहात19) गणेश शिरसाठ- गुन्हे - 3- तडीपार20) रतन आवळे- गुन्हे - 5- सध्या तडीपार

पोलिसांची ही यादी राजकीय दबावातून तयार झाल्याचा आरोप यापैकीच एका गुन्हेगाराने केला आहे. शहरातील मुख्य गुन्हेगार मोकाटच असल्याचं त्याचं म्हणणं आहे. गुन्हेगारांच्या यादीतल्या काहीजणांवर राष्ट्रवादीचं लेबल असल्याने त्यांच्यावर कारवाई होणार नाही, असा आरोप विरोधक करत आहेत. पण कुठलीही व्यक्ती ही जन्मजात गुन्हेगार नसते अशी भूमिका राष्ट्रवादीनं घेतली. गुन्हेगारांच्या यादीवरुन शहरात यादवी सुरु झालीय. पण पोलिसांनी तयार केलेली यादी किती काळजीपूर्वक तयार केली गेलीय यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 11, 2012 05:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close