S M L

दलित महिलेला बेदम मारहाण

11 जानेवारीमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातल्या मुलगावमध्ये दलित महिलेला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडलीय. या विधवा महिलेच्या मुलाचं गावातल्याच सवर्ण मुलीशी प्रेमसंबध होते. एक महिन्यापुर्वी मुलगा आणि मुलगी दोघे पळून गेले. याचा राग मनात धरून मुलीच्या नातेवाईंकानी या महिलेला पानवठ्यावर मारहाण करायला सुरुवात केली. या मारहाणीत महिलासुध्दा सहभागी होत्या. कृष्णा देसाई, हंबीरराव देसाई, शांताबाई देसाई, सुनंदा देसाई हे मारहाणीत सहभागी होते. त्यांच्याविरुध्द पाटण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पण अजून कुणालाच अटक करण्यात आलेली नाही. जखमी महिलेवर पाटणध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन गृहमंत्री आर आर पाटील यांनी दिले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 11, 2012 12:07 PM IST

दलित महिलेला बेदम मारहाण

11 जानेवारी

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातल्या मुलगावमध्ये दलित महिलेला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडलीय. या विधवा महिलेच्या मुलाचं गावातल्याच सवर्ण मुलीशी प्रेमसंबध होते. एक महिन्यापुर्वी मुलगा आणि मुलगी दोघे पळून गेले. याचा राग मनात धरून मुलीच्या नातेवाईंकानी या महिलेला पानवठ्यावर मारहाण करायला सुरुवात केली. या मारहाणीत महिलासुध्दा सहभागी होत्या. कृष्णा देसाई, हंबीरराव देसाई, शांताबाई देसाई, सुनंदा देसाई हे मारहाणीत सहभागी होते. त्यांच्याविरुध्द पाटण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पण अजून कुणालाच अटक करण्यात आलेली नाही. जखमी महिलेवर पाटणध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन गृहमंत्री आर आर पाटील यांनी दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 11, 2012 12:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close