S M L

स्मृतीचिन्हाच्या वादावर महापौर राजपाल यांची दिलगिरी

12 जानेवारीपुणे महापालिकेतल्या स्मृतीचिन्हाच्या वादावर आता पडदा पडेल अशी शक्यता आहे. कारण शिवसेनेच्या आंदोलनानंतर महापौर मोहनसिंग राजपाल यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे. ईद- ए- मिलाद निमित्त पालिकेच्या वतीन दिल्या जाणार्‍या स्मृतीचिन्हांमध्ये बदल करण्याच्या महापौरांच्या सूचनेला शिवसेनेनं आक्षेप घेतला होता. विशिष्ट मतांवर नजर ठेवूनच महापौरांनी ही सूचना केल्याचा आरोप शिवसेनेनं केला होता. स्मृती चिन्हावरील शिवाजी महाराजांचे छायाचित्र काढावे अशी सूचना महापौरांनी केली होती. राजपाल यांच्या सूचनेला शिवसेनेनं आक्षेप घेतं शिवसैनिकांनी महापौरांच्या दालनासमोर तीव्र निदर्शनं करत घोषणाबाजीही केली. यात राजकारण न करता महापौरांनी नागरिकांची माफी मागावी अशी मागणी शिवसेनेनं केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 12, 2012 11:10 AM IST

स्मृतीचिन्हाच्या वादावर महापौर राजपाल यांची दिलगिरी

12 जानेवारी

पुणे महापालिकेतल्या स्मृतीचिन्हाच्या वादावर आता पडदा पडेल अशी शक्यता आहे. कारण शिवसेनेच्या आंदोलनानंतर महापौर मोहनसिंग राजपाल यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे. ईद- ए- मिलाद निमित्त पालिकेच्या वतीन दिल्या जाणार्‍या स्मृतीचिन्हांमध्ये बदल करण्याच्या महापौरांच्या सूचनेला शिवसेनेनं आक्षेप घेतला होता. विशिष्ट मतांवर नजर ठेवूनच महापौरांनी ही सूचना केल्याचा आरोप शिवसेनेनं केला होता. स्मृती चिन्हावरील शिवाजी महाराजांचे छायाचित्र काढावे अशी सूचना महापौरांनी केली होती. राजपाल यांच्या सूचनेला शिवसेनेनं आक्षेप घेतं शिवसैनिकांनी महापौरांच्या दालनासमोर तीव्र निदर्शनं करत घोषणाबाजीही केली. यात राजकारण न करता महापौरांनी नागरिकांची माफी मागावी अशी मागणी शिवसेनेनं केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 12, 2012 11:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close