S M L

...तर गुगल,फेसबुक ब्लॉक करु : हायकोर्ट

12 जानेवारीसोशल नेटवकीर्ंग माध्यमांविरोधात सरकारने घेतलेल्या भूमिकेला आज वळण मिळालं. आज दिल्ली हायकोर्टाने पुन्हा एकदा गुगल आणि फेसबुकला फटकारले आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध होत असलेला वादग्रस्त मजकूर काढला नाही तर या वेबसाईट्सच ब्लॉक करण्याचा इशारा कोर्टाने दिला आहे. वादग्रस्त मजकूर गाळण्यासाठी यंत्रणा उभारावी, नाहीतर चीनप्रमाणे आम्हीही वेबसाईट ब्लॉक करु असे खडे बोल कोर्टाने सुनावले आहे. मागील महिन्यात केंद्रीय मंत्री कपील सिब्बल यांनी सोशन नेटवकीर्ंग साईटसवर आक्षेप घेत चांगला दम भरला होता.फेसबुक,गुगल यासाईटवर सरकार विरोधात आक्षेपार्ह मजकूर, फोटो तसेच काही समाजकंटाकाकडून समाज विघातक गोष्टींचा वापर होत असल्याचे दिसून आले. याला लगाम घालण्यासाठी सिब्बल यांनी फेसबुक, गुगल यांना सुचना केल्या होत्या. याला प्रतिसाद देत फेसबुकने कारवाई करण्याचे आश्वासन दिले होत मात्र गुगलने याबाबत नकार दिला होता. याप्रकरणी आता हायकोर्टाने सोशन नेटवर्कीग साईटला चांगलेच फैलावर घेतले. साईटवर असलेले मजूकर काढण्यासाठी लवकरात लवकर उपाय योजना करा अन्यथा चीनप्रमाणे भारतात वेबसाईट ब्लाक करु अशा इशारा कोर्टाने दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 12, 2012 06:07 PM IST

...तर गुगल,फेसबुक ब्लॉक करु : हायकोर्ट

12 जानेवारी

सोशल नेटवकीर्ंग माध्यमांविरोधात सरकारने घेतलेल्या भूमिकेला आज वळण मिळालं. आज दिल्ली हायकोर्टाने पुन्हा एकदा गुगल आणि फेसबुकला फटकारले आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध होत असलेला वादग्रस्त मजकूर काढला नाही तर या वेबसाईट्सच ब्लॉक करण्याचा इशारा कोर्टाने दिला आहे. वादग्रस्त मजकूर गाळण्यासाठी यंत्रणा उभारावी, नाहीतर चीनप्रमाणे आम्हीही वेबसाईट ब्लॉक करु असे खडे बोल कोर्टाने सुनावले आहे. मागील महिन्यात केंद्रीय मंत्री कपील सिब्बल यांनी सोशन नेटवकीर्ंग साईटसवर आक्षेप घेत चांगला दम भरला होता.फेसबुक,गुगल यासाईटवर सरकार विरोधात आक्षेपार्ह मजकूर, फोटो तसेच काही समाजकंटाकाकडून समाज विघातक गोष्टींचा वापर होत असल्याचे दिसून आले. याला लगाम घालण्यासाठी सिब्बल यांनी फेसबुक, गुगल यांना सुचना केल्या होत्या. याला प्रतिसाद देत फेसबुकने कारवाई करण्याचे आश्वासन दिले होत मात्र गुगलने याबाबत नकार दिला होता. याप्रकरणी आता हायकोर्टाने सोशन नेटवर्कीग साईटला चांगलेच फैलावर घेतले. साईटवर असलेले मजूकर काढण्यासाठी लवकरात लवकर उपाय योजना करा अन्यथा चीनप्रमाणे भारतात वेबसाईट ब्लाक करु अशा इशारा कोर्टाने दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 12, 2012 06:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close