S M L

घरचे 'शेर' बाहेर ढेर !

13 जानेवारीघरच्या मैदानावर इतर संघाना ढेर करणारी टीम इंडिया त्यासंघासारखीच बाहेर ढेर होतं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान पर्थमध्ये तिसरी टेस्ट सुरु आहे आणि मॅचच्या पहिल्याच दिवशी भारतीय टीम अवघ्या 161 रन्सवर ऑलआऊट झाली आहे. जगातल्या सर्वात वेगवान समजल्या जाणार्‍या पर्थच्या वाका ग्राउंडवर भारतीय बॅट्समनने सपशेल शरणागती पत्करली आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून भारताला पहिली बॅटिंग दिली. आणि हिल्फेनहॉसनं वीरेंद्र सेहवागला शुन्यावर आऊट करत ऑस्ट्रेलियाला पहिलं यश मिळवून दिलं. द वॉल राहुल द्रविड पुन्हा एकदा अपयशी ठरला. द्रविड 9 रन्स करुन आऊट झाला. सचिन तेंडुलकर 15 तर लक्ष्मण 31 रन्स करुन आऊट झाला. विराट कोहलीने भारतातर्फे सर्वाधिक 44 रन्स केले. ऑस्ट्रेलियातर्फे हिल्फेनहॉसने सर्वाधिक 4 तर पीटर सिडेलने 3 विकेट घेतल्या आहे. याला उत्तर देताना ऑस्ट्रेलियाने दिवसअखेर एकही विकेट न गमावता 149 रन केले आहेत.तसेच वॉर्नरने धडाकेबाज सेंच्युरी केली आहे. मेलबर्न आणि सिडनी टेस्ट पाठोपाठ भारताची पर्थ टेस्टमध्येही वाताहत सुरुच आहे. कागदार भक्कम वाटणारी बॅटिंग प्रत्यक्ष मैदानात मात्र ढेपाळत आहे. वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर भारताला पुन्हा एकदा चांगली सुरुवात करुन देण्यात अपयशी ठरले. वीरेंद्र सेहवागला तर भोपळाही फोडता आला नाही. गौतम गंभीर काही वेळ मैदानात उभा राहिला खरा पण मोठा स्कोर करण्यात तोही अपयशी ठरला. गंभीर 31 रन्स करुन आऊट झाला. भारताची द वॉल राहुल द्रविड या मॅचमध्येही ढेपाळली. ऑस्ट्रेलिया दौर्‍यात द्रविड सातत्यानं फ्लॉप ठरतोय. द्रविडला केवळ 9 रन्स करता आले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आक्रमक बॅटिंगच्या मुडमध्ये मैदानात उतरला. त्याने 25 बॉलमध्ये 3 फोर मारत 15 रन्सही केले. पण या सीरिजमध्ये आपली पहिलीच मॅच खेळणार्‍या रायन हॅरिसनं त्याला एलबीडब्ल्यू केलं. व्ही व्ही एस लक्ष्मण आणि विराट कोहलीनं इनिंग सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 68 रन्सची पार्टनरशिप केली. पण लक्ष्मण मोठा स्कोर करण्यात अपयशी ठरला. तो 31 रन्सवर आऊट झाला. विराट कोहलीने भारतातर्फे सर्वाधिक 44 रन्स केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 13, 2012 09:26 AM IST

घरचे 'शेर' बाहेर ढेर !

13 जानेवारी

घरच्या मैदानावर इतर संघाना ढेर करणारी टीम इंडिया त्यासंघासारखीच बाहेर ढेर होतं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान पर्थमध्ये तिसरी टेस्ट सुरु आहे आणि मॅचच्या पहिल्याच दिवशी भारतीय टीम अवघ्या 161 रन्सवर ऑलआऊट झाली आहे. जगातल्या सर्वात वेगवान समजल्या जाणार्‍या पर्थच्या वाका ग्राउंडवर भारतीय बॅट्समनने सपशेल शरणागती पत्करली आहे.

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून भारताला पहिली बॅटिंग दिली. आणि हिल्फेनहॉसनं वीरेंद्र सेहवागला शुन्यावर आऊट करत ऑस्ट्रेलियाला पहिलं यश मिळवून दिलं. द वॉल राहुल द्रविड पुन्हा एकदा अपयशी ठरला. द्रविड 9 रन्स करुन आऊट झाला. सचिन तेंडुलकर 15 तर लक्ष्मण 31 रन्स करुन आऊट झाला. विराट कोहलीने भारतातर्फे सर्वाधिक 44 रन्स केले. ऑस्ट्रेलियातर्फे हिल्फेनहॉसने सर्वाधिक 4 तर पीटर सिडेलने 3 विकेट घेतल्या आहे. याला उत्तर देताना ऑस्ट्रेलियाने दिवसअखेर एकही विकेट न गमावता 149 रन केले आहेत.तसेच वॉर्नरने धडाकेबाज सेंच्युरी केली आहे.

मेलबर्न आणि सिडनी टेस्ट पाठोपाठ भारताची पर्थ टेस्टमध्येही वाताहत सुरुच आहे. कागदार भक्कम वाटणारी बॅटिंग प्रत्यक्ष मैदानात मात्र ढेपाळत आहे. वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर भारताला पुन्हा एकदा चांगली सुरुवात करुन देण्यात अपयशी ठरले. वीरेंद्र सेहवागला तर भोपळाही फोडता आला नाही. गौतम गंभीर काही वेळ मैदानात उभा राहिला खरा पण मोठा स्कोर करण्यात तोही अपयशी ठरला. गंभीर 31 रन्स करुन आऊट झाला.

भारताची द वॉल राहुल द्रविड या मॅचमध्येही ढेपाळली. ऑस्ट्रेलिया दौर्‍यात द्रविड सातत्यानं फ्लॉप ठरतोय. द्रविडला केवळ 9 रन्स करता आले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आक्रमक बॅटिंगच्या मुडमध्ये मैदानात उतरला. त्याने 25 बॉलमध्ये 3 फोर मारत 15 रन्सही केले. पण या सीरिजमध्ये आपली पहिलीच मॅच खेळणार्‍या रायन हॅरिसनं त्याला एलबीडब्ल्यू केलं.

व्ही व्ही एस लक्ष्मण आणि विराट कोहलीनं इनिंग सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 68 रन्सची पार्टनरशिप केली. पण लक्ष्मण मोठा स्कोर करण्यात अपयशी ठरला. तो 31 रन्सवर आऊट झाला. विराट कोहलीने भारतातर्फे सर्वाधिक 44 रन्स केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 13, 2012 09:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close