S M L

लोकशाही वाचवण्यासाठी एक व्हा - गिलानी

13 जानेवारीपाकिस्तानात लष्कर बंड करेल अशी भीती तिथल्या सरकारला वाटतेय. पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी इस्लामाबादमधल्या ब्रिटीश हाय कमिशनरशी आज चर्चा केली. आणि संभाव्य लष्करी उठाव थांबवण्यासाठी मदत करण्याचं आवाहन केलं, असा दावा असोसिएटेड प्रेसने केला. दरम्यान, पाकिस्तानी संसदेत आज या राजकीय अस्थिरतेवर चर्चा झाली. लोकशाही की हुकूमशाही यापैकी एकाची निवड करावी असं आवाहन त्यांनी विरोधकांना केलं.पाकिस्तानात राजकीय अस्थिरतेची स्थिती कायम आहे.सरकार विरुद्ध लष्कर या संघर्षाच्या केंद्रस्थानी आहेत पंतप्रधान युसूफ रझा गिलानी...पाकिस्तानी संसदेत या वादावर बोलताना शुक्रवारी त्यांनी आपलं सरकार वाचवण्यासाठी लष्कराची गरज नसल्याचं सांगितलं. आणि लोकशाही की हुकूमशाही यापैकी एकाची निवड करण्याची वेळ आल्याचा इशारा दिला.सत्ताधारी पाकिस्तान पीपल्स पार्टी सध्या या वादावर शांत आहे. पण सोमवारी होणार्‍या चर्चेत हा पक्ष काय भूमिका काय घेतो, हे महत्त्वाचे ठरणार आहे. सोमवारीच सुप्रीम कोर्ट मेमोगेट प्रकरणही सुनावणीसाठी घेणार आहे. पण पाकिस्तानातला तणाव कमी होतोय, असा सरकारला विश्वास वाटतोय.एका तणावपूर्ण आठवड्यानंतर पाकिस्तानी सरकारला सध्यातरी आणखी काही दिवसांचं जीवदान मिळालंय. पण आव्हानं कायम आहेत. केवळ लष्कर किंवा सुप्रीम कोर्टाचीच भीती नाही, तर विरोधकांकडूनही गिलानी सरकारवर दबाव वाढतोय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 13, 2012 05:46 PM IST

लोकशाही वाचवण्यासाठी एक व्हा - गिलानी

13 जानेवारीपाकिस्तानात लष्कर बंड करेल अशी भीती तिथल्या सरकारला वाटतेय. पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी इस्लामाबादमधल्या ब्रिटीश हाय कमिशनरशी आज चर्चा केली. आणि संभाव्य लष्करी उठाव थांबवण्यासाठी मदत करण्याचं आवाहन केलं, असा दावा असोसिएटेड प्रेसने केला. दरम्यान, पाकिस्तानी संसदेत आज या राजकीय अस्थिरतेवर चर्चा झाली. लोकशाही की हुकूमशाही यापैकी एकाची निवड करावी असं आवाहन त्यांनी विरोधकांना केलं.

पाकिस्तानात राजकीय अस्थिरतेची स्थिती कायम आहे.सरकार विरुद्ध लष्कर या संघर्षाच्या केंद्रस्थानी आहेत पंतप्रधान युसूफ रझा गिलानी...पाकिस्तानी संसदेत या वादावर बोलताना शुक्रवारी त्यांनी आपलं सरकार वाचवण्यासाठी लष्कराची गरज नसल्याचं सांगितलं. आणि लोकशाही की हुकूमशाही यापैकी एकाची निवड करण्याची वेळ आल्याचा इशारा दिला.

सत्ताधारी पाकिस्तान पीपल्स पार्टी सध्या या वादावर शांत आहे. पण सोमवारी होणार्‍या चर्चेत हा पक्ष काय भूमिका काय घेतो, हे महत्त्वाचे ठरणार आहे. सोमवारीच सुप्रीम कोर्ट मेमोगेट प्रकरणही सुनावणीसाठी घेणार आहे. पण पाकिस्तानातला तणाव कमी होतोय, असा सरकारला विश्वास वाटतोय.

एका तणावपूर्ण आठवड्यानंतर पाकिस्तानी सरकारला सध्यातरी आणखी काही दिवसांचं जीवदान मिळालंय. पण आव्हानं कायम आहेत. केवळ लष्कर किंवा सुप्रीम कोर्टाचीच भीती नाही, तर विरोधकांकडूनही गिलानी सरकारवर दबाव वाढतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 13, 2012 05:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close