S M L

नाशिकमध्ये मनसे उमेदवाराच्या मुलाखतीला सुरुवात

13 जानेवारीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उमेदवाराच्या मुलाखती घेण्याचा धडाका सुरु आहे. पुण्यानंतर आता नाशिकमध्ये मनसेच्या मुलाखतींना सुरुवात झाली आहे. राज ठाकरे यांनी राजगड या पक्षाच्या कार्यालयात मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. 650 उमेदवारांच्या मुलाखती या तीन दिवसात होणार आहेत. पण परिक्षेचा निकाल जाहीर न केल्यामुळे नवोदित उमेदवारांची थोडी निराशा झाली आहे. राज यांच्या या प्रयोगाचे जनतेनं कौतुक केलं. राज यांनीही दिलेल्या वचनाप्रमाणे प्रत्येक उमेदवाराच्या स्वत: मुलाखती घेतं आहे. यासाठी राज यांनी सकाळी 9 ते 6 हा वेळ खास राखून ठेवला आहे. राज बरोबर सकाळी 9वाजता मुलाखतीच्या ठिकाणी हजर राहतात. फक्त दुपारच्या जेवणाची अर्धातास सुट्टी घेतात आणि पुन्हा कामाला लागतात. राज यांच्या मेहनतीकडे पाहुन कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत त्या निकालाकडे...आणि त्यानंतर राज यांच्या जाहीर सभांकडे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 13, 2012 02:20 PM IST

नाशिकमध्ये मनसे उमेदवाराच्या मुलाखतीला सुरुवात

13 जानेवारी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उमेदवाराच्या मुलाखती घेण्याचा धडाका सुरु आहे. पुण्यानंतर आता नाशिकमध्ये मनसेच्या मुलाखतींना सुरुवात झाली आहे. राज ठाकरे यांनी राजगड या पक्षाच्या कार्यालयात मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. 650 उमेदवारांच्या मुलाखती या तीन दिवसात होणार आहेत. पण परिक्षेचा निकाल जाहीर न केल्यामुळे नवोदित उमेदवारांची थोडी निराशा झाली आहे. राज यांच्या या प्रयोगाचे जनतेनं कौतुक केलं. राज यांनीही दिलेल्या वचनाप्रमाणे प्रत्येक उमेदवाराच्या स्वत: मुलाखती घेतं आहे. यासाठी राज यांनी सकाळी 9 ते 6 हा वेळ खास राखून ठेवला आहे. राज बरोबर सकाळी 9वाजता मुलाखतीच्या ठिकाणी हजर राहतात. फक्त दुपारच्या जेवणाची अर्धातास सुट्टी घेतात आणि पुन्हा कामाला लागतात. राज यांच्या मेहनतीकडे पाहुन कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत त्या निकालाकडे...आणि त्यानंतर राज यांच्या जाहीर सभांकडे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 13, 2012 02:20 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close