S M L

बाबा रामदेव यांच्यावर काळं फेकलं

14 जानेवारीदिल्लीमध्ये आज बाब रामदेवांच्या पत्रकार परिषदेत मोठं नाट्य घडलं. त्यांच्या तोंडावर काळंी शाई फेकण्याचा प्रयत्न झाला. दिल्लीतल्या कॉन्स्टिट्युशनल क्लबमध्ये शनिवारी दुपारी योगगुरू बाबा रामदेव काळ्या पैशांच्या आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेत होते. पण काही वेळातच कमरान युनूस सिद्दिकी या व्यक्तीने त्यांच्या चेहर्‍यावर काळी शाई फेकली. बाबा रामदेव यांच्या समर्थकांनी कमरानला पकडलं आणि बेदम मारहाण केली. नंतर पोलिसांनी त्याला अटक केली. आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांच्या मुद्द्यावर प्रचाराची घोषणा बाबा रामदेव यांनी केली होती. बाबा रामदेव स्वतंत्र प्रचार करणार की टीम अण्णांच्या प्रचारात भाग घेणार का, हे अजून स्पष्ट व्हायचं आहे.बाबा रामदेव यांच्यावर शाईफेकीचा अण्णा हजारे यांनी निषेध केलाय. त्यांनी निषेध पत्रक जाहीर केलं. त्यात म्हटलंय,'हा बाबा रामदेव यांच्या तोंडाला शाई लावण्याचा प्रयत्न नाही, तर लोकशाहीला काळिमा फासण्याचा प्रयत्न आहे. अशा गोष्टींमुळे जन आंदोलन थांबणार नाही, तर ते आणखी वाढेल.'दरम्यान, यापूर्वी लोकांच्या संतापाचा फटका बसलेल्या काँग्रेसमधल्या काही नेत्यांनी आणि भाजपनं या घटनेचा कडक शब्दात निषेध केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 14, 2012 09:17 AM IST

बाबा रामदेव यांच्यावर काळं फेकलं

14 जानेवारी

दिल्लीमध्ये आज बाब रामदेवांच्या पत्रकार परिषदेत मोठं नाट्य घडलं. त्यांच्या तोंडावर काळंी शाई फेकण्याचा प्रयत्न झाला. दिल्लीतल्या कॉन्स्टिट्युशनल क्लबमध्ये शनिवारी दुपारी योगगुरू बाबा रामदेव काळ्या पैशांच्या आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेत होते. पण काही वेळातच कमरान युनूस सिद्दिकी या व्यक्तीने त्यांच्या चेहर्‍यावर काळी शाई फेकली.

बाबा रामदेव यांच्या समर्थकांनी कमरानला पकडलं आणि बेदम मारहाण केली. नंतर पोलिसांनी त्याला अटक केली. आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांच्या मुद्द्यावर प्रचाराची घोषणा बाबा रामदेव यांनी केली होती. बाबा रामदेव स्वतंत्र प्रचार करणार की टीम अण्णांच्या प्रचारात भाग घेणार का, हे अजून स्पष्ट व्हायचं आहे.

बाबा रामदेव यांच्यावर शाईफेकीचा अण्णा हजारे यांनी निषेध केलाय. त्यांनी निषेध पत्रक जाहीर केलं. त्यात म्हटलंय,'हा बाबा रामदेव यांच्या तोंडाला शाई लावण्याचा प्रयत्न नाही, तर लोकशाहीला काळिमा फासण्याचा प्रयत्न आहे. अशा गोष्टींमुळे जन आंदोलन थांबणार नाही, तर ते आणखी वाढेल.'

दरम्यान, यापूर्वी लोकांच्या संतापाचा फटका बसलेल्या काँग्रेसमधल्या काही नेत्यांनी आणि भाजपनं या घटनेचा कडक शब्दात निषेध केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 14, 2012 09:17 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close