S M L

रिपाइंच्या नगरसेवकाविरुध्द तडीपारीचा प्रस्ताव

14 जानेवारीमहापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे. निवडणुकीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गुन्हेगारी पार्श्वभूमी असणार्‍यांवर पोलिसांनी कडक कारवाई करायला सुरूवात केली आहे. त्यातच नाशिक महापालिकेतील आरपीआयचे नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्याविरोधात नाशिक पोलिसांनी तडीपारीचा प्रस्ताव तयार केला आहे. लोंढे यांच्याविरोधात धमक्या, खंडणी आणि हाणामारी यासारखे गुन्हे दाखल आहेत. यासंदर्भात नागरिकांना अधिक काही माहिती द्यायची असल्यास 24 जानेवारीपर्यंत संपर्क करण्याचं आवाहनही पोलिसांनी केलंय. लोेंढे गेल्या 15 वर्षांपासून नगरसेवक आहेत. तसेच सध्या ते रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांचा एक मलगा दीपक लोंढे याच्याविरुद्ध नुकताच आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नागपूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला आहे. तर दुसर्‍या मुलाच्याविरोधातही तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. दरम्यान निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप प्रकाश लोंढे यांनी केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 14, 2012 09:35 AM IST

रिपाइंच्या नगरसेवकाविरुध्द तडीपारीचा प्रस्ताव

14 जानेवारी

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे. निवडणुकीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गुन्हेगारी पार्श्वभूमी असणार्‍यांवर पोलिसांनी कडक कारवाई करायला सुरूवात केली आहे. त्यातच नाशिक महापालिकेतील आरपीआयचे नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्याविरोधात नाशिक पोलिसांनी तडीपारीचा प्रस्ताव तयार केला आहे.

लोंढे यांच्याविरोधात धमक्या, खंडणी आणि हाणामारी यासारखे गुन्हे दाखल आहेत. यासंदर्भात नागरिकांना अधिक काही माहिती द्यायची असल्यास 24 जानेवारीपर्यंत संपर्क करण्याचं आवाहनही पोलिसांनी केलंय. लोेंढे गेल्या 15 वर्षांपासून नगरसेवक आहेत. तसेच सध्या ते रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत.

त्यांचा एक मलगा दीपक लोंढे याच्याविरुद्ध नुकताच आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नागपूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला आहे. तर दुसर्‍या मुलाच्याविरोधातही तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. दरम्यान निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप प्रकाश लोंढे यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 14, 2012 09:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close