S M L

मनसेच्या इच्छुक उमेदवारांना कामाचं गाजर !

14 जानेवारीबंडखोरी टाळण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्ष संघटनेच्या कामाचं गाजर पुढे केलं आहे. नाशिकमध्ये काल शुक्रवारी त्यांनी एका दिवसात 650 उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी उमेदवारी नाही मिळाली तर पक्ष संघटनेचं काम कराल का ? असं उमेदवारांना विचारण्यात आलं. त्यामुळे परीक्षेनंतर उत्साहात आलेल्या बर्‍याचशा उमेदवारांच्या उत्साहावर पाणी पडलंय. इच्छुकांची मोठी संख्या असलेल्या मनसेला तेवढाच मोठा बंडखोरीचाही धोका आहे. त्यातच नवीन येणार्‍याला संधी दिली जाईल मात्र त्यांनाही परीक्षा द्यावी लागेल अशी गुगली राज ठाकरेंनी टाकल्यामुळे नाशिकच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 14, 2012 09:42 AM IST

मनसेच्या इच्छुक उमेदवारांना कामाचं गाजर !

14 जानेवारी

बंडखोरी टाळण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्ष संघटनेच्या कामाचं गाजर पुढे केलं आहे. नाशिकमध्ये काल शुक्रवारी त्यांनी एका दिवसात 650 उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी उमेदवारी नाही मिळाली तर पक्ष संघटनेचं काम कराल का ? असं उमेदवारांना विचारण्यात आलं. त्यामुळे परीक्षेनंतर उत्साहात आलेल्या बर्‍याचशा उमेदवारांच्या उत्साहावर पाणी पडलंय. इच्छुकांची मोठी संख्या असलेल्या मनसेला तेवढाच मोठा बंडखोरीचाही धोका आहे. त्यातच नवीन येणार्‍याला संधी दिली जाईल मात्र त्यांनाही परीक्षा द्यावी लागेल अशी गुगली राज ठाकरेंनी टाकल्यामुळे नाशिकच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 14, 2012 09:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close