S M L

टीम इंडियाचा गेम ओव्हर ;धोणीवर एका मॅचची बंदी

15 जानेवारीपर्थ टेस्टमध्ये भारतीय टीमचा अडीच दिवसातच गेम ओव्हर झाला आहे. मॅचच्या तिसर्‍याच दिवशी भारताची दुसरी इनिंग 171 रन्सवर ऑलआऊट झाली आणि भारताला इनिंग आणि 37 रन्सनं पराभव स्विकारावा लागला. शेवटच्या तीन बॅट्समनना तर रन्सचं खातंही खोलता आलं नाही. ऑस्ट्रेलिया दौर्‍यातला भारताचा हा सलग तिसरा आणि सर्वात लाजीरवाणा पराभव ठरला. पर्थ टेस्टमध्ये भारताची पहिली इनिंग 161 रन्सवर ऑलआऊट झाली होती. याला उत्तर देताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या इनिंगमध्ये 369 रन्स करत 208 रन्सची आघाडी घेतली. पण भारतीय टीमला दुसर्‍या इनिंगमध्येही मोठा स्कोर करता आला नाही. भारताचे प्रमुख बॅट्समन पुन्हा एकदा अपयशी ठरले. विराट कोहलीने भारतातर्फे सर्वाधिक 75 रन्स केले. पण इतर बॅट्समनने सपशेल निराशा केली. ऑस्ट्रेलियातर्फे हिल्फेनहॉसनं सर्वाधिक 4 तर पीटर सिडेलनं तीन विकेट घेतल्या. महेंद्रसिंग धोणीवर एका मॅचची बंदीऑस्ट्रेलिया दौर्‍यात पराभवाने खचलेल्या भारतीय टीमला आता आणखी एक धक्का बसला आहे. भारतीय टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोणी ऍडलेड टेस्टमध्ये खेळणार नाही. धोणीवर एका मॅचची बंदी घालण्यात आली आहे. स्लो ओव्हर रेटचा फटका त्याला बसला आहे. पर्थ टेस्टमध्ये भारतीय बॅट्समनने बॅटिंगसाठी अगदी कमी तर बॉलर्सनं मात्र जास्त वेळ घेतला. निर्धारित वेळेत ओव्हर्स पूर्ण न झाल्याने धोणीवर बंदीची कारवाई करण्यात आलीय. टेस्ट क्रिकेटमध्ये सलग पराभवामुळे आधीच धोणीच्या कॅप्टनसीवर टीका होतेय आणि आता त्यातच त्याला बाहेर बसावे लागल्याने त्याच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 15, 2012 09:32 AM IST

टीम इंडियाचा गेम ओव्हर ;धोणीवर एका मॅचची बंदी

15 जानेवारी

पर्थ टेस्टमध्ये भारतीय टीमचा अडीच दिवसातच गेम ओव्हर झाला आहे. मॅचच्या तिसर्‍याच दिवशी भारताची दुसरी इनिंग 171 रन्सवर ऑलआऊट झाली आणि भारताला इनिंग आणि 37 रन्सनं पराभव स्विकारावा लागला. शेवटच्या तीन बॅट्समनना तर रन्सचं खातंही खोलता आलं नाही. ऑस्ट्रेलिया दौर्‍यातला भारताचा हा सलग तिसरा आणि सर्वात लाजीरवाणा पराभव ठरला. पर्थ टेस्टमध्ये भारताची पहिली इनिंग 161 रन्सवर ऑलआऊट झाली होती. याला उत्तर देताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या इनिंगमध्ये 369 रन्स करत 208 रन्सची आघाडी घेतली. पण भारतीय टीमला दुसर्‍या इनिंगमध्येही मोठा स्कोर करता आला नाही. भारताचे प्रमुख बॅट्समन पुन्हा एकदा अपयशी ठरले. विराट कोहलीने भारतातर्फे सर्वाधिक 75 रन्स केले. पण इतर बॅट्समनने सपशेल निराशा केली. ऑस्ट्रेलियातर्फे हिल्फेनहॉसनं सर्वाधिक 4 तर पीटर सिडेलनं तीन विकेट घेतल्या.

महेंद्रसिंग धोणीवर एका मॅचची बंदी

ऑस्ट्रेलिया दौर्‍यात पराभवाने खचलेल्या भारतीय टीमला आता आणखी एक धक्का बसला आहे. भारतीय टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोणी ऍडलेड टेस्टमध्ये खेळणार नाही. धोणीवर एका मॅचची बंदी घालण्यात आली आहे. स्लो ओव्हर रेटचा फटका त्याला बसला आहे. पर्थ टेस्टमध्ये भारतीय बॅट्समनने बॅटिंगसाठी अगदी कमी तर बॉलर्सनं मात्र जास्त वेळ घेतला. निर्धारित वेळेत ओव्हर्स पूर्ण न झाल्याने धोणीवर बंदीची कारवाई करण्यात आलीय. टेस्ट क्रिकेटमध्ये सलग पराभवामुळे आधीच धोणीच्या कॅप्टनसीवर टीका होतेय आणि आता त्यातच त्याला बाहेर बसावे लागल्याने त्याच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 15, 2012 09:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close