S M L

वसंत डावखरे, जितेंद्र आव्हाड यांच्यात दिलजमाई

15 जानेवारीठाण्यामधील राष्ट्रवादीत सुरु असलेल्या पक्षांतर्गत मतभेदांवर आज मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर तोडगा काढण्यात आला. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात दिलजमाई झालीय. तीळगूळ घ्या, गोड गोड बोला असं म्हणत दोघांनीही आणि वाटाघाटींच्या अनेक बैठकांनंतर दोन्ही पक्षांनी त्यांच्यातील मतभेदांना पूर्णविराम दिला. त्यामुळे ठाण्यात रखडलेला आघाडीचा गाडा आता पुन्हा पुढं सरकरण्याची चिन्हं आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसात वसंत डावखरे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतील अनेक नेते आव्हाडांवर टीका करून शिवसेनेत दाखल झाले. यात डावखरे समर्थकांचाही समावेश होता. या दोन नेत्यांमधील मतभेदांमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 15, 2012 12:59 PM IST

वसंत डावखरे, जितेंद्र आव्हाड यांच्यात दिलजमाई

15 जानेवारी

ठाण्यामधील राष्ट्रवादीत सुरु असलेल्या पक्षांतर्गत मतभेदांवर आज मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर तोडगा काढण्यात आला. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात दिलजमाई झालीय. तीळगूळ घ्या, गोड गोड बोला असं म्हणत दोघांनीही आणि वाटाघाटींच्या अनेक बैठकांनंतर दोन्ही पक्षांनी त्यांच्यातील मतभेदांना पूर्णविराम दिला. त्यामुळे ठाण्यात रखडलेला आघाडीचा गाडा आता पुन्हा पुढं सरकरण्याची चिन्हं आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसात वसंत डावखरे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतील अनेक नेते आव्हाडांवर टीका करून शिवसेनेत दाखल झाले. यात डावखरे समर्थकांचाही समावेश होता. या दोन नेत्यांमधील मतभेदांमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 15, 2012 12:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close