S M L

गोपीनाथ मुडेंना झटका ; पंडित अण्णा मुंडे जाणार राष्ट्रवादीत

16 जानेवारीपरळीत धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात बंड पुकारून नगरअध्यक्षपदी आपला उमेदवार निवडून आणला या घटनेतून गोपिनाथ मुंडे सावरत नाही तोच मोठा झटका मुंडेंना बसला. गोपिनाथ मुंडेंचे पुतणे धनंजय मुंडे यांच्यानंतर मोठे भाऊ पंडित अण्णा मुंडे आता राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. 19 जानेवारीला परळीत होणार्‍या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. पं्‌डत अण्णा मुंडे यांनीच हे जाहीर केलं आहे. गोपीनाथ मुंडेंना आता आणखी एक धक्का बसलाय. आधी फक्त बंड करणारे धनंजय आणि पंडित अण्णा मुंडे आता 19 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. हे कमी होतं म्हणून की काय.. तर मुंडेंच्या या घरातल्या विरोधकांनी कृषी उत्पन्न बाजार समितीही ताब्यात घेतली. इथंच न थांबता पंडित अण्णांनी गोपीनाथ मुंडेंवर आणि त्यांच्या पत्नीवर जातीयवादाचा आरोप केला. आधी परळी नगर पालिका.. आणि आता बाजार समिती हातून गेल्यामुळे गोपीनाथ मुंडेंनी जिल्हा परिषद निडवणुकीसाठी दंड थोपटले आहेत. गोपीनाथ मुंडेंचं भाजप आणि राज्याच्या राजकारणात महत्त्व कमी करणाचा प्रयत्न राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी हे एकत्र येऊन करत आहे. याला इतिहास आहे 90 च्या दशकातला. शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री असताना 1995 मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी त्यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. एनरॉन प्रकल्प आणि दाऊदशी संबंध असल्याच्या मुद्द्यावरुन गोपीनाथ मुंडे यांनी पवारांवर आरोप केले होते. आता पंडित अण्णांना घरातून फोडून पवारांच्या पुतण्याने जुना हिशेब चुकता केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार.. एका बड्या रस्ते विकास कंपनीच्या माध्यमातून अजित पवार आणि नितिन गडकरी एकत्र आले आहे. आणि त्यामुळेच भाजपमधल्या सत्ता संघर्षाच्या राजकारणाला राष्ट्रवादीचे नेते फुस देत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 16, 2012 11:43 AM IST

गोपीनाथ मुडेंना झटका ;  पंडित अण्णा मुंडे जाणार राष्ट्रवादीत

16 जानेवारी

परळीत धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात बंड पुकारून नगरअध्यक्षपदी आपला उमेदवार निवडून आणला या घटनेतून गोपिनाथ मुंडे सावरत नाही तोच मोठा झटका मुंडेंना बसला. गोपिनाथ मुंडेंचे पुतणे धनंजय मुंडे यांच्यानंतर मोठे भाऊ पंडित अण्णा मुंडे आता राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. 19 जानेवारीला परळीत होणार्‍या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. पं्‌डत अण्णा मुंडे यांनीच हे जाहीर केलं आहे.

गोपीनाथ मुंडेंना आता आणखी एक धक्का बसलाय. आधी फक्त बंड करणारे धनंजय आणि पंडित अण्णा मुंडे आता 19 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. हे कमी होतं म्हणून की काय.. तर मुंडेंच्या या घरातल्या विरोधकांनी कृषी उत्पन्न बाजार समितीही ताब्यात घेतली. इथंच न थांबता पंडित अण्णांनी गोपीनाथ मुंडेंवर आणि त्यांच्या पत्नीवर जातीयवादाचा आरोप केला.

आधी परळी नगर पालिका.. आणि आता बाजार समिती हातून गेल्यामुळे गोपीनाथ मुंडेंनी जिल्हा परिषद निडवणुकीसाठी दंड थोपटले आहेत. गोपीनाथ मुंडेंचं भाजप आणि राज्याच्या राजकारणात महत्त्व कमी करणाचा प्रयत्न राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी हे एकत्र येऊन करत आहे. याला इतिहास आहे 90 च्या दशकातला. शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री असताना 1995 मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी त्यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. एनरॉन प्रकल्प आणि दाऊदशी संबंध असल्याच्या मुद्द्यावरुन गोपीनाथ मुंडे यांनी पवारांवर आरोप केले होते. आता पंडित अण्णांना घरातून फोडून पवारांच्या पुतण्याने जुना हिशेब चुकता केला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार.. एका बड्या रस्ते विकास कंपनीच्या माध्यमातून अजित पवार आणि नितिन गडकरी एकत्र आले आहे. आणि त्यामुळेच भाजपमधल्या सत्ता संघर्षाच्या राजकारणाला राष्ट्रवादीचे नेते फुस देत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 16, 2012 11:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close