S M L

नाशिकमध्ये पुन्हा एकदा वाहनांची जाळपोळ

16 जानेवारीनाशिकमध्ये पुन्हा एकदा गाड्या पेटवून पोलिसांना आव्हान देण्याचा प्रकार झाला आहे. विजयनगरजवळ पहाटे अज्ञात इसमांनी 3 टेम्पो पेटवून पोबारा केलाय.आगीच्या भडक्यानं लोक गोळा झाल्याने शेजारी उभ्या असलेल्या इतर गाड्यांची आग आटोक्यात आणण्यात आली. अन्यथा मोठा घातपात होण्याची शक्यता होती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर हा प्रकार घडला असल्याचा अंदाज आहे. तीन वर्षांपूर्वी पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केल्यावर गाड्या जाळण्याचा प्रकार झाला होता. सध्याही पोलिसांतर्फे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हद्दपारी, स्थानबद्धता आणि झाडाझडती सुरू आहे. मोरवाडीजवळ झालेल्या या जाळपोळीचा तपास अंबड पोलीस करताहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 16, 2012 11:39 AM IST

नाशिकमध्ये पुन्हा एकदा वाहनांची जाळपोळ

16 जानेवारी

नाशिकमध्ये पुन्हा एकदा गाड्या पेटवून पोलिसांना आव्हान देण्याचा प्रकार झाला आहे. विजयनगरजवळ पहाटे अज्ञात इसमांनी 3 टेम्पो पेटवून पोबारा केलाय.आगीच्या भडक्यानं लोक गोळा झाल्याने शेजारी उभ्या असलेल्या इतर गाड्यांची आग आटोक्यात आणण्यात आली. अन्यथा मोठा घातपात होण्याची शक्यता होती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर हा प्रकार घडला असल्याचा अंदाज आहे. तीन वर्षांपूर्वी पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केल्यावर गाड्या जाळण्याचा प्रकार झाला होता. सध्याही पोलिसांतर्फे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हद्दपारी, स्थानबद्धता आणि झाडाझडती सुरू आहे. मोरवाडीजवळ झालेल्या या जाळपोळीचा तपास अंबड पोलीस करताहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 16, 2012 11:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close