S M L

रिकाम्या बंगल्यात राहत होती 103 बोगस मतदार !

अद्वैत मेहता, पुणे 16 जानेवारीनिवडणुका म्हटलं की मतदार याद्यातील घोळ आणि त्यातही बोगस मतदारांबाबतच्या तक्रारी नव्या नाहीत. पुण्यातील प्रभाग क्रमांक 9 मध्ये तर सरकारी यंत्रणांनी कहरच केला. या परिसरातील एका बंगल्यात कुणीही रहात नाही पण सरकार दरबारी इथे तब्बल 103 मतदार राहत असल्याची नोंद आहे. बोगस मतदार याद्यांचा आता कहर झालाय. पुण्यातल्या या बोगसगिरीच्या प्रकाराने सर्वच राजकीय पक्षांची झोप उडालीय. एवढंच नाही तर आता या बोगसगिरीपुढे खुद्द निवडणूक आयोगानंही हात टेकले आहेत. म्हणून आता बोगसगिरीविरोधात भाजप, शिवसेना, मनसे आणि काँग्रेस या सगळ्याच पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी एकत्रीतपणे आवाज उठवला आहे.अटीतटीच्या लढतीत जिथं एका एका मतावर सत्तेची गणित घडत बिघडत असतात. तिथं बोगसगिरीतून सत्ता मिळवली जाते ही लोकशहाची थट्टा आहे. ती थाबवण्यासाठी कोण पुढाकार घेणार हा जनतेचा सवाल आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 16, 2012 12:00 PM IST

रिकाम्या बंगल्यात राहत होती 103 बोगस मतदार !

अद्वैत मेहता, पुणे

16 जानेवारी

निवडणुका म्हटलं की मतदार याद्यातील घोळ आणि त्यातही बोगस मतदारांबाबतच्या तक्रारी नव्या नाहीत. पुण्यातील प्रभाग क्रमांक 9 मध्ये तर सरकारी यंत्रणांनी कहरच केला. या परिसरातील एका बंगल्यात कुणीही रहात नाही पण सरकार दरबारी इथे तब्बल 103 मतदार राहत असल्याची नोंद आहे.

बोगस मतदार याद्यांचा आता कहर झालाय. पुण्यातल्या या बोगसगिरीच्या प्रकाराने सर्वच राजकीय पक्षांची झोप उडालीय. एवढंच नाही तर आता या बोगसगिरीपुढे खुद्द निवडणूक आयोगानंही हात टेकले आहेत. म्हणून आता बोगसगिरीविरोधात भाजप, शिवसेना, मनसे आणि काँग्रेस या सगळ्याच पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी एकत्रीतपणे आवाज उठवला आहे.

अटीतटीच्या लढतीत जिथं एका एका मतावर सत्तेची गणित घडत बिघडत असतात. तिथं बोगसगिरीतून सत्ता मिळवली जाते ही लोकशहाची थट्टा आहे. ती थाबवण्यासाठी कोण पुढाकार घेणार हा जनतेचा सवाल आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 16, 2012 12:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close