S M L

जन्मतारखेवरुन लष्करप्रमुखांनी सरकारला खेचले कोर्टात

16 जानेवारीलष्करप्रमुख व्ही. के. सिंग आणि सरकार यांच्यात संघर्ष सुरू आहे. व्ही. के. सिंग यांच्या वयावरून सध्या मोठा वाद पेटला. आणि त्याच कारणावरून सिंग यांनी सरकारविरुद्ध सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय. सरकारविरुद्ध त्यांनी रिट पिटीशन दाखल केली गेली आहे. लष्कर आणि सरकारमधला संघर्ष कोर्टात जाण्याची अशा प्रकारची ही पहिलीच वेळ आहे. व्ही के सिंग यांच्या दहावीच्या प्रमाणपत्रावर आणि यूपीएससीच्या प्रवेश परीक्षेत वेगवेगळ्या जन्मतारखा आहेत. दहावीच्या प्रमाणपत्रावरची जन्मतारीख ग्राह्य धरावी, अशी व्ही. के. सिंग यांची मागणी आहे. पण संरक्षण मंत्रालयाने त्यांची ही मागणी फेटाळून लावलीय. त्यामुळे त्यांच्या वयाचा वाद सुरू झाला आहे.जन्मतारखेचा हा काय वाद आणि त्यामागचं राजकारण काय आहे ?लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांच्या जन्मतारखेवरुन सध्या मोठा वाद रंगला आहे. बलाढ्य अशा भारतीय लष्कराचे नेतृत्व करणारे व्ही. के. सिंग सध्या आपल्या जन्मतारखेसाठी लढत आहे. जनरल व्ही. के. सिंग यांच्या कागदपत्रांवर दोन वेगवेगळ्या जन्मतारखा आहेत आणि यावरुनच वाद सुरु आहे. सिंग यांच्या लष्करी ओळखपत्रावर, तसेच शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 10 मे 1951 ही जन्मतारीख दिलीय. हीच ग्राह्य धरावी, असं जनरल व्ही. के. सिंग यांचं म्हणणं आहे. पण लष्कर सचिव शाखेकडे असलेल्या कागदपत्रात त्यांची जन्मतारीख 10 मे 1950 दिलीय. तिच ग्राह्य धरू असं संरक्षण मंत्रालयाचं म्हणणं आहे.पाच वर्षांपूर्वीच हा वाद सुरु झाला. सुखना जमीन घोटाळ्याच्या तपासानंतर तो वाढत गेला. व्ही. के. सिंग इस्टर्न आर्मी कमांडर असताना त्यांनी सुखना घोटाळ्यातले मुख्य आरोपी अवधेश प्रकाश यांच्याविरोधात कठोर भूमिका घेतली होती. अवधेश प्रकाश हे त्यावेळी लष्कर सचिव शाखेचे प्रमुख होते. त्यांच्याकडेच अधिकार्‍यांच्या जन्मतारखेचे रेकॉर्ड्स होते. लष्कराच्या मोठ्या अधिकार्‍यांमध्ये वाद निर्माण झाला. पण त्याकडे राजकीय आणि प्रशासकीय अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केलं. हा वाद आता फक्त जन्मतारखेचा वाद राहिलेला नाही, असं काही निवृत्त लष्करी अधिकारी सांगतात. एक व्यक्ती लष्कर प्रमुख पदापर्यंत पोचते आणि त्यानंतर त्याच्या जन्मतारखेवरुन वाद निर्माण होतो, हे नक्कीच खेदजनक आहे. या प्रकरणामुळे लष्कराची नितिमत्ता आणि एका अधिकार्‍याचा प्रामाणिकपणा पणाला लागला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 16, 2012 05:43 PM IST

जन्मतारखेवरुन लष्करप्रमुखांनी सरकारला खेचले कोर्टात

16 जानेवारी

लष्करप्रमुख व्ही. के. सिंग आणि सरकार यांच्यात संघर्ष सुरू आहे. व्ही. के. सिंग यांच्या वयावरून सध्या मोठा वाद पेटला. आणि त्याच कारणावरून सिंग यांनी सरकारविरुद्ध सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय. सरकारविरुद्ध त्यांनी रिट पिटीशन दाखल केली गेली आहे. लष्कर आणि सरकारमधला संघर्ष कोर्टात जाण्याची अशा प्रकारची ही पहिलीच वेळ आहे. व्ही के सिंग यांच्या दहावीच्या प्रमाणपत्रावर आणि यूपीएससीच्या प्रवेश परीक्षेत वेगवेगळ्या जन्मतारखा आहेत. दहावीच्या प्रमाणपत्रावरची जन्मतारीख ग्राह्य धरावी, अशी व्ही. के. सिंग यांची मागणी आहे. पण संरक्षण मंत्रालयाने त्यांची ही मागणी फेटाळून लावलीय. त्यामुळे त्यांच्या वयाचा वाद सुरू झाला आहे.

जन्मतारखेचा हा काय वाद आणि त्यामागचं राजकारण काय आहे ?

लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांच्या जन्मतारखेवरुन सध्या मोठा वाद रंगला आहे. बलाढ्य अशा भारतीय लष्कराचे नेतृत्व करणारे व्ही. के. सिंग सध्या आपल्या जन्मतारखेसाठी लढत आहे. जनरल व्ही. के. सिंग यांच्या कागदपत्रांवर दोन वेगवेगळ्या जन्मतारखा आहेत आणि यावरुनच वाद सुरु आहे. सिंग यांच्या लष्करी ओळखपत्रावर, तसेच शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 10 मे 1951 ही जन्मतारीख दिलीय. हीच ग्राह्य धरावी, असं जनरल व्ही. के. सिंग यांचं म्हणणं आहे. पण लष्कर सचिव शाखेकडे असलेल्या कागदपत्रात त्यांची जन्मतारीख 10 मे 1950 दिलीय. तिच ग्राह्य धरू असं संरक्षण मंत्रालयाचं म्हणणं आहे.पाच वर्षांपूर्वीच हा वाद सुरु झाला. सुखना जमीन घोटाळ्याच्या तपासानंतर तो वाढत गेला. व्ही. के. सिंग इस्टर्न आर्मी कमांडर असताना त्यांनी सुखना घोटाळ्यातले मुख्य आरोपी अवधेश प्रकाश यांच्याविरोधात कठोर भूमिका घेतली होती. अवधेश प्रकाश हे त्यावेळी लष्कर सचिव शाखेचे प्रमुख होते. त्यांच्याकडेच अधिकार्‍यांच्या जन्मतारखेचे रेकॉर्ड्स होते. लष्कराच्या मोठ्या अधिकार्‍यांमध्ये वाद निर्माण झाला. पण त्याकडे राजकीय आणि प्रशासकीय अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केलं.

हा वाद आता फक्त जन्मतारखेचा वाद राहिलेला नाही, असं काही निवृत्त लष्करी अधिकारी सांगतात. एक व्यक्ती लष्कर प्रमुख पदापर्यंत पोचते आणि त्यानंतर त्याच्या जन्मतारखेवरुन वाद निर्माण होतो, हे नक्कीच खेदजनक आहे. या प्रकरणामुळे लष्कराची नितिमत्ता आणि एका अधिकार्‍याचा प्रामाणिकपणा पणाला लागला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 16, 2012 05:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close