S M L

13/7 च्या बाँबस्फोटातील सुत्रधार त्या दिवशी मुंबईतच होते !

सुधाकर काश्यप, मुंबई16 जानेवारी13 जुलै 2011 ला तीन ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटांनी मुंबई हादरली होती. या प्रकरणातील तीन संशयीत हे स्फोट घडवण्याआधी आणि नंतरसुद्धा मुंबईत राहिले होते, हे आता उघड झालं आहे. दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिद्दीनचे हे मुंबईतील मॉड्युल कसं काम करत होतं. मुंबईत 13 जुलै 2011 ला दादर, ऑपेरा हाऊस आणि झवेरी बाजार मध्ये स्फोट झाले पुन्हा एकदा मुंबई हादरुन गेली. या ब्लास्ट मध्ये 26 जण ठार तर 100 च्यावर जण जखमी झाले होते. पण हा ब्लास्ट कोणी केला यावर मात्र प्रश्नचिन्ह होतं. - एनआयए, मुंबई क्राईम ब्रँाच, एटीएस आणि सीबीआयचे अधिकारी यावर एकत्र तपास करत होते.- या ब्लास्टमागे इंडियन मुजाहिद्दीनचा हात असल्याचं आता स्पष्ट झालंय- या घटनेनंतर एनआयएने आणि अनेक राज्यांच्या एटीएसने तपास मोहिम सुरु केली होती.- या मोहिमेअंतर्गत दिल्ली आणि चेन्नईमधून इंडियन मुजाहिद्दीनच्या 7 जणांना अटक करण्यात आली.- त्यांच्या तपासात इंडियन मुजाहिद्दीनचा म्होरक्या शहारुख शहाबदरी उर्फ रिजाय भटकल आणि त्याचे साथिदार विकास आणि तवरेझ हे तिघे भायखळ्यात राहिले होते ही गोष्ट उघड झाली.- भायखळ्याच्या हबीब बिल्डिंगच्या तिसर्‍या मजल्यावर ते रहात होते. या घटनेला आता सहा महिने झालेत. एएनआय, मुंबई क्राईम ब्रँच, एटिएस आदि तपास यंत्रणा या ब्लास्टचा तपास करत आहेत. पण हे ब्लास्ट कोणत्या दहशतवाद्यांनी घडवून आणलेत हे उघड करता आलेलं नाही. मात्र, ज्या पद्धतीने या घटनेच्या तपासाबाबतची माहिती बाहेत येतेय ,त्यावरुन तपास यंत्रणेला तपास करायच्या ऐवजी एकमेकांवर कुरघोडी करण्यात जास्त रस असल्याचं दिसून येतंय. इंडियन मुजाहिद्दीनच्या कारवाया एटीएस आणि मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर घडल्या. इंडियन मुजाहिद्दीनचे हे तीन दहशतवादी अनेक महिने वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांचा वावर असलेल्या इमारतीच्या जवळ राहत होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही सगळी माहिती दिल्ली पोलिसांच्या तपासात उघड झाल्यानं मुंबई पोलिसांचे धाबे दणाणले.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 16, 2012 06:11 PM IST

13/7 च्या बाँबस्फोटातील सुत्रधार त्या दिवशी मुंबईतच होते !

सुधाकर काश्यप, मुंबई

16 जानेवारी13 जुलै 2011 ला तीन ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटांनी मुंबई हादरली होती. या प्रकरणातील तीन संशयीत हे स्फोट घडवण्याआधी आणि नंतरसुद्धा मुंबईत राहिले होते, हे आता उघड झालं आहे. दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिद्दीनचे हे मुंबईतील मॉड्युल कसं काम करत होतं. मुंबईत 13 जुलै 2011 ला दादर, ऑपेरा हाऊस आणि झवेरी बाजार मध्ये स्फोट झाले पुन्हा एकदा मुंबई हादरुन गेली. या ब्लास्ट मध्ये 26 जण ठार तर 100 च्यावर जण जखमी झाले होते. पण हा ब्लास्ट कोणी केला यावर मात्र प्रश्नचिन्ह होतं. - एनआयए, मुंबई क्राईम ब्रँाच, एटीएस आणि सीबीआयचे अधिकारी यावर एकत्र तपास करत होते.- या ब्लास्टमागे इंडियन मुजाहिद्दीनचा हात असल्याचं आता स्पष्ट झालंय- या घटनेनंतर एनआयएने आणि अनेक राज्यांच्या एटीएसने तपास मोहिम सुरु केली होती.- या मोहिमेअंतर्गत दिल्ली आणि चेन्नईमधून इंडियन मुजाहिद्दीनच्या 7 जणांना अटक करण्यात आली.- त्यांच्या तपासात इंडियन मुजाहिद्दीनचा म्होरक्या शहारुख शहाबदरी उर्फ रिजाय भटकल आणि त्याचे साथिदार विकास आणि तवरेझ हे तिघे भायखळ्यात राहिले होते ही गोष्ट उघड झाली.- भायखळ्याच्या हबीब बिल्डिंगच्या तिसर्‍या मजल्यावर ते रहात होते. या घटनेला आता सहा महिने झालेत. एएनआय, मुंबई क्राईम ब्रँच, एटिएस आदि तपास यंत्रणा या ब्लास्टचा तपास करत आहेत. पण हे ब्लास्ट कोणत्या दहशतवाद्यांनी घडवून आणलेत हे उघड करता आलेलं नाही. मात्र, ज्या पद्धतीने या घटनेच्या तपासाबाबतची माहिती बाहेत येतेय ,त्यावरुन तपास यंत्रणेला तपास करायच्या ऐवजी एकमेकांवर कुरघोडी करण्यात जास्त रस असल्याचं दिसून येतंय. इंडियन मुजाहिद्दीनच्या कारवाया एटीएस आणि मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर घडल्या. इंडियन मुजाहिद्दीनचे हे तीन दहशतवादी अनेक महिने वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांचा वावर असलेल्या इमारतीच्या जवळ राहत होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही सगळी माहिती दिल्ली पोलिसांच्या तपासात उघड झाल्यानं मुंबई पोलिसांचे धाबे दणाणले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 16, 2012 06:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close