S M L

गिरणी कामगारांच्या लढ्याला 30 वर्ष पूर्ण

विनोद तळेकर, मुंबई18 जानेवारीमुंबईतल्या गिरणी कामगारांच्या लढ्याला आज 30 वर्षे पूर्ण होत आहे. 18 जानेवारी 1982 या दिवशी पगारवाढ आणि बोनसच्या मागणीसाठी गिरणी कामगारांनी बेमुदत संप पुकारला. कामगार नेते डॉ. दत्ता सावंत यांच्या नेतृत्वाखाली जवळपास अडीच लाख कामगार संपात सहभागी झाले. मुंबईतल्या 50 पेक्षा जास्त सूत गिरण्यांचे कामकाज ठप्प झाले. त्यानंतर अनेक आंदोलन झाली पण गिरणी कामगारांच्या आयुष्यात मात्र कधी उजेड पडलाच नाही. एकेकाळी गिरणगाव म्हणून ओळखला जाणारा परिसर आता बिल्डर्ससाठी हॉट डेस्टिनेशन ठरलं आहे. या गिरण्यांच्या जागांची किंमत आता हजारो कोटीमध्ये पोहोचली आहेत. पण गिरणी कामगाराला मात्र आपलं हक्काचं घर मिळालंच नाही. सध्या सरकारी पातळीवर हलचाली सुरु झाल्यात. हेच काय ते समाधान म्हणावे लागेल. त्या ऐतिहासिक संपानंतर अजूनही गिरणी कामगार लढतोय. पण आता त्याच्या मनात या भांडवशाही व्यवस्थेबद्दल कटूता नाही. त्याने आपला मार्ग शोधलाय. ससेहोलपट आणि उपासमारी यातून तो बाहेर पडला आहे. आता तो अधिक आशावादी झाला आहे. पण त्याचा लढा मात्र अजूनही संपलेला नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 18, 2012 09:38 AM IST

गिरणी कामगारांच्या लढ्याला 30 वर्ष पूर्ण

विनोद तळेकर, मुंबई

18 जानेवारी

मुंबईतल्या गिरणी कामगारांच्या लढ्याला आज 30 वर्षे पूर्ण होत आहे. 18 जानेवारी 1982 या दिवशी पगारवाढ आणि बोनसच्या मागणीसाठी गिरणी कामगारांनी बेमुदत संप पुकारला. कामगार नेते डॉ. दत्ता सावंत यांच्या नेतृत्वाखाली जवळपास अडीच लाख कामगार संपात सहभागी झाले. मुंबईतल्या 50 पेक्षा जास्त सूत गिरण्यांचे कामकाज ठप्प झाले. त्यानंतर अनेक आंदोलन झाली पण गिरणी कामगारांच्या आयुष्यात मात्र कधी उजेड पडलाच नाही.

एकेकाळी गिरणगाव म्हणून ओळखला जाणारा परिसर आता बिल्डर्ससाठी हॉट डेस्टिनेशन ठरलं आहे. या गिरण्यांच्या जागांची किंमत आता हजारो कोटीमध्ये पोहोचली आहेत. पण गिरणी कामगाराला मात्र आपलं हक्काचं घर मिळालंच नाही. सध्या सरकारी पातळीवर हलचाली सुरु झाल्यात. हेच काय ते समाधान म्हणावे लागेल.

त्या ऐतिहासिक संपानंतर अजूनही गिरणी कामगार लढतोय. पण आता त्याच्या मनात या भांडवशाही व्यवस्थेबद्दल कटूता नाही. त्याने आपला मार्ग शोधलाय. ससेहोलपट आणि उपासमारी यातून तो बाहेर पडला आहे. आता तो अधिक आशावादी झाला आहे. पण त्याचा लढा मात्र अजूनही संपलेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 18, 2012 09:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close