S M L

ठाण्यात आ.भोईर यांचा राष्ट्रवादीला रामराम

19 जानेवारीठाण्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादीला फटका बसला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर आरोप करुन राष्ट्रवादीचे आमदार सुभाष भोईर आज राष्ट्रवादीलाच राम राम ठोकला आहे. भोईर यांनी आता 'जय महाराष्ट्र'चा झेंडा खांद्यावर घेतला असून शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. भोईर हे राष्ट्रवादीचे विद्यमान विधानपरिषद सदस्य असून ते आज आपला राजीनामाही देणार आहे. यानंतर त्यांचा मातोश्रीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत सेनेत प्रवेश करणार आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याचा त्यांनी निर्णय घेतला असल्याचं भोईर यांचं म्हणणं आहे. भोईर यांच्यासोबत राष्ट्रवादीचे ठाण्यातील नगरसेवक हरिष वैतीही सेनेत प्रवेश करणार आहे. या प्रवेशनाट्यामुळे ठाण्यातील महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला खिंडार पडलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 19, 2012 08:56 AM IST

ठाण्यात आ.भोईर यांचा राष्ट्रवादीला रामराम

19 जानेवारी

ठाण्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादीला फटका बसला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर आरोप करुन राष्ट्रवादीचे आमदार सुभाष भोईर आज राष्ट्रवादीलाच राम राम ठोकला आहे. भोईर यांनी आता 'जय महाराष्ट्र'चा झेंडा खांद्यावर घेतला असून शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. भोईर हे राष्ट्रवादीचे विद्यमान विधानपरिषद सदस्य असून ते आज आपला राजीनामाही देणार आहे. यानंतर त्यांचा मातोश्रीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत सेनेत प्रवेश करणार आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याचा त्यांनी निर्णय घेतला असल्याचं भोईर यांचं म्हणणं आहे. भोईर यांच्यासोबत राष्ट्रवादीचे ठाण्यातील नगरसेवक हरिष वैतीही सेनेत प्रवेश करणार आहे. या प्रवेशनाट्यामुळे ठाण्यातील महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला खिंडार पडलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 19, 2012 08:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close