S M L

नाशिकजवळ मालगाडी घसरली ; रेल्वे वाहतूक ठप्प

19 जानेवारीनाशिक : इगतपुरीजवळ पाडळी स्टेशनला मालगाडीचे 20 कंटेनर रुळावरुन खाली घसरले आहेत. त्यामुळे मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली. या अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नाही, पण याचा परिणाम मुंबईकडे येणार्‍या गाड्यांवर झाला आहे. मुंबईकडे येणार्‍या काही गाड्या रद्द करण्यात आल्यात तर काही गाड्या मध्येच थांबवण्यात आल्या आहेत. मध्येच थांबवण्यात आलेल्या गाड्यांमध्ये पंजाब एक्सप्रेस आहे. ही गाडी ओढा स्टेशनजवळ थांबवण्यात आली आहे. सेवाग्राम एक्सप्रेस निफाडजवळ थांबवली आहे. जनशताब्दी मनमाडजवळ थांबवण्यात आली आहे. तर पंचवटी आणि गोदावरी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 19, 2012 08:18 AM IST

नाशिकजवळ मालगाडी घसरली ; रेल्वे वाहतूक ठप्प

19 जानेवारी

नाशिक : इगतपुरीजवळ पाडळी स्टेशनला मालगाडीचे 20 कंटेनर रुळावरुन खाली घसरले आहेत. त्यामुळे मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली. या अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नाही, पण याचा परिणाम मुंबईकडे येणार्‍या गाड्यांवर झाला आहे. मुंबईकडे येणार्‍या काही गाड्या रद्द करण्यात आल्यात तर काही गाड्या मध्येच थांबवण्यात आल्या आहेत. मध्येच थांबवण्यात आलेल्या गाड्यांमध्ये पंजाब एक्सप्रेस आहे. ही गाडी ओढा स्टेशनजवळ थांबवण्यात आली आहे. सेवाग्राम एक्सप्रेस निफाडजवळ थांबवली आहे. जनशताब्दी मनमाडजवळ थांबवण्यात आली आहे. तर पंचवटी आणि गोदावरी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 19, 2012 08:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close