S M L

राज्य निवडणूक आयोगावर विरोधी पक्षांची आगपाखड !

18 जानेवारीराज्य निवडणूक आयोग सध्या विरोधी पक्षांच्या टीकेचं लक्ष बनले आहेत. आचारसंहिता भंग प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांना क्लीन चिट दिल्याप्रकरणी राज ठाकरेंनी निवडणूक आयोगावर तोफ डागलीय. जिल्हा परिषद आणि महापालिकांची मतमोजणी एकाच दिवशी व्हावी, याबद्दलचा वादही अजून संपलेला नाही. एकंदरीतच निवडणूक आयोगावरूनच सध्या कसं राजकारण सुरू आहे, त्याबद्दलचा हा रिपोर्ट...निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालीय. आणि यंदा.. राजकीय पक्ष एकमेकांवरच नाही..तर निवडणूक आयोगही टीका करतायत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर निवडणूक आयोगावर तोफांचा भडिमारच सुरू केलाय. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर निवडणूक आयोगाने अजित पवारांना क्लीन चिट दिली यावरून राज ठाकरे संतापले आहेत. आचारसंहिता भंग केल्याच्या प्रकरणात दिलगिरी व्यक्त केल्यानंतर आयोगाने अजित पवारांना सोडलंच कसं असा सवाल राज यांनी उपस्थित केला. उद्या मीसुद्धा अशी चूक करून दिलगिरी व्यक्त करतो, निवडणूक आयोग मला सोडेल का ? असा सवाल राज यांनी निवडणूक आयोगाला विचाराला.आयोगाला मात्र हे आरोप मान्य नाहीत. राज्यात महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हापासूनच निवडणूक आयोगावर टीका होतेय. दोन्ही निवडणुकांची मतमोजणी एकाच दिवशी घ्यावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी आयोगाकडे लगेचच केली होती तो वाद अजूनही संपलेला नाहीयनिवडणूक आयोग सत्ताधार्‍यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप होतोय. मुळात सरकारनेच जिल्हा परिषदेच्या निवडणुका 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा झाल्यानंतर घ्या, असा दबाव सरकारने टाकला होता. पण जिल्हा परिषदांची मुदत संपत असल्याने निवडणूक आयोगाने सरकारचा दबाव झुगारला. शिवाय मतदान यंत्रांची कमतरता असल्याने एकाच दिवशी मतमोजणी घेणं शक्य नसल्याचंही आयोगाचं म्हणणं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 18, 2012 02:47 PM IST

राज्य निवडणूक आयोगावर विरोधी पक्षांची आगपाखड !

18 जानेवारी

राज्य निवडणूक आयोग सध्या विरोधी पक्षांच्या टीकेचं लक्ष बनले आहेत. आचारसंहिता भंग प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांना क्लीन चिट दिल्याप्रकरणी राज ठाकरेंनी निवडणूक आयोगावर तोफ डागलीय. जिल्हा परिषद आणि महापालिकांची मतमोजणी एकाच दिवशी व्हावी, याबद्दलचा वादही अजून संपलेला नाही. एकंदरीतच निवडणूक आयोगावरूनच सध्या कसं राजकारण सुरू आहे, त्याबद्दलचा हा रिपोर्ट...

निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालीय. आणि यंदा.. राजकीय पक्ष एकमेकांवरच नाही..तर निवडणूक आयोगही टीका करतायत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर निवडणूक आयोगावर तोफांचा भडिमारच सुरू केलाय. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर निवडणूक आयोगाने अजित पवारांना क्लीन चिट दिली यावरून राज ठाकरे संतापले आहेत. आचारसंहिता भंग केल्याच्या प्रकरणात दिलगिरी व्यक्त केल्यानंतर आयोगाने अजित पवारांना सोडलंच कसं असा सवाल राज यांनी उपस्थित केला. उद्या मीसुद्धा अशी चूक करून दिलगिरी व्यक्त करतो, निवडणूक आयोग मला सोडेल का ? असा सवाल राज यांनी निवडणूक आयोगाला विचाराला.आयोगाला मात्र हे आरोप मान्य नाहीत. राज्यात महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हापासूनच निवडणूक आयोगावर टीका होतेय. दोन्ही निवडणुकांची मतमोजणी एकाच दिवशी घ्यावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी आयोगाकडे लगेचच केली होती तो वाद अजूनही संपलेला नाहीय

निवडणूक आयोग सत्ताधार्‍यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप होतोय. मुळात सरकारनेच जिल्हा परिषदेच्या निवडणुका 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा झाल्यानंतर घ्या, असा दबाव सरकारने टाकला होता. पण जिल्हा परिषदांची मुदत संपत असल्याने निवडणूक आयोगाने सरकारचा दबाव झुगारला. शिवाय मतदान यंत्रांची कमतरता असल्याने एकाच दिवशी मतमोजणी घेणं शक्य नसल्याचंही आयोगाचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 18, 2012 02:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close