S M L

पवारांनी केला पॉवरगेम ; खा.परांजपेंची सेनेवर टीका

20 जानेवारीधक्कातंत्राचं राजकारण करणा-या शरद पवारांनी आज पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप घडवलाय. ठाण्यात पवारांनी शिवसेनेला मोठं खिंडार पाडलंय. शरद पवारांनी आज बोलावलेल्या पत्रकार परिषदेत थेट शिवसेनेचे कल्याणचे खासदार आनंद परांजपे यांनाच आणून सगळ्यांनाच धक्का दिलाय. आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला नसला तरी शरद पवारांच्या शेजारी बसून त्यांनी आज शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं. बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आदर असला तरी सध्याचं शिवसेनेचं नेतृत्व आणि ठाण्यातील शिवसेनेचे नेते कार्यकर्त्यांची गळपेची करत असल्याचं नाव न घेता त्यांनी म्हटलंय. ' शिवसेना मी लहानपणापासून शिवसेना बघतोय. एका कुटुंबासारखं मी सेनेला पाहिलंय. ज्या ध्येयासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली ते आज होत नाही. समाजकारण 80 टक्के आणि 20 टक्के राजकारण अशी होती. सत्तेसाठीच आज काम केलं जातंय, पूर्वीसारखी शिवसेना राहिली नाही. विकासाची किंमत आज शिवसेनेला नाही. शिवसेनाप्रमुखांना अभिप्रेत असणारा विकास आज होत नाही. शिवसैनिकांची गळचेपी आणि हेळसांड होतेय 'अशा शब्दात टीका करत सेनेतल्या नेतृत्वाबद्दल आरोप केले.पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला जितेंद्र आव्हाड यांच्यावर नाराजी व्यक्त करत अनेकांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला, यावर पत्रकारांनी शरद पवार यांना प्रश्न विचारला. पण पवारांनी जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण केली आणि थोड्याच वेळात एक राजकीय भूकंप झाला. पण राष्ट्रवादीत प्रवेश करणार की नाही हे आनंद परांजपेंनी स्पष्ट केलं नाही आणि शरद पवार यांनीही या सस्पेन्स कायम ठेवत आनंद परांजपेंना निरोप दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 20, 2012 12:36 PM IST

पवारांनी केला पॉवरगेम ; खा.परांजपेंची सेनेवर टीका

20 जानेवारी

धक्कातंत्राचं राजकारण करणा-या शरद पवारांनी आज पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप घडवलाय. ठाण्यात पवारांनी शिवसेनेला मोठं खिंडार पाडलंय. शरद पवारांनी आज बोलावलेल्या पत्रकार परिषदेत थेट शिवसेनेचे कल्याणचे खासदार आनंद परांजपे यांनाच आणून सगळ्यांनाच धक्का दिलाय. आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला नसला तरी शरद पवारांच्या शेजारी बसून त्यांनी आज शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं. बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आदर असला तरी सध्याचं शिवसेनेचं नेतृत्व आणि ठाण्यातील शिवसेनेचे नेते कार्यकर्त्यांची गळपेची करत असल्याचं नाव न घेता त्यांनी म्हटलंय. ' शिवसेना मी लहानपणापासून शिवसेना बघतोय. एका कुटुंबासारखं मी सेनेला पाहिलंय. ज्या ध्येयासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली ते आज होत नाही. समाजकारण 80 टक्के आणि 20 टक्के राजकारण अशी होती. सत्तेसाठीच आज काम केलं जातंय, पूर्वीसारखी शिवसेना राहिली नाही. विकासाची किंमत आज शिवसेनेला नाही. शिवसेनाप्रमुखांना अभिप्रेत असणारा विकास आज होत नाही. शिवसैनिकांची गळचेपी आणि हेळसांड होतेय 'अशा शब्दात टीका करत सेनेतल्या नेतृत्वाबद्दल आरोप केले.

पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला जितेंद्र आव्हाड यांच्यावर नाराजी व्यक्त करत अनेकांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला, यावर पत्रकारांनी शरद पवार यांना प्रश्न विचारला. पण पवारांनी जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण केली आणि थोड्याच वेळात एक राजकीय भूकंप झाला. पण राष्ट्रवादीत प्रवेश करणार की नाही हे आनंद परांजपेंनी स्पष्ट केलं नाही आणि शरद पवार यांनीही या सस्पेन्स कायम ठेवत आनंद परांजपेंना निरोप दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 20, 2012 12:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close