S M L

92 व्या नाट्यसंमेलनाला थाटात सुरुवात

21 जानेवारी92 व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाला आज सांगलीत थाटात सुरूवात झाली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण संमेलनाचे उद्घाटन करणार होते. पण आचारसंहितेच्या बडग्यामुळे मुख्यमंत्री नाट्यसंमेलनाला अनुपस्थित राहिले आहेत. त्यामुळे दिग्दर्शक-अभिनेते अमोल पालेकर यांच्याहस्ते संमेलनाचे उद्घाटन झालं आहेत. नाट्यसंमेलनाला यंदाही नेहमीच्याच मराठी कलाकारांनी हजेरी लावलीय. संमेलनाध्यक्ष श्रीकांत मोघे, मावळते अध्यक्ष राम जाधव, स्मिता तळवळकर, वंदना गुप्ते आणि अखिल भारतीय नाट्यपरिषदेचे अध्यक्ष हेमंत टकले आणि उपाध्यक्ष विनय आपटे यांनी व्यासपीठावर हजेरी लावलीय. तर संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत वनमंत्री पतंगराव कदम, सांस्कृतिक राज्यमंत्री फौजिया खान याही या संमेलनाला उपस्थित आहेत. तर ग्रामविकास मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्यासह अभिनेते प्रशांत दामले, शरद पोंक्षे, ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग, आशालता हे नाट्यकलावंतही संमेलनाला उपस्थित आहेत.दरम्यान, अमोल पालेकर यांनी 92 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यातील भाषणात नाट्य परिषदेवर चौफेर टीका केली. नाट्य परिषद फक्त प्रशासकीय काम करते नाटक वाढवण्याचा कधीच प्रयत्न करत नाही. अनेक मोठ्या कलाकारांना कधीच योग्य सन्मान किंवा त्यांचा साधा सत्कारही नाट्य संमेलनात केला गेला नाही. ही खेदाची गोष्ट आहे. तसेच तरुण पीढीला या मोठ्या कलाकारांची साधी माहिती ही गुगल किंवा विकीपीडियावर केली गेली नाही. सत्यदेव दुबे सारख्या मोठ्या नाटककारालाही नाट्य परिषद विसरली ही खुपच खेदाची गोष्ट आहे. समांतर रंगभूमीमुळे नाट्य परिषदेनं कधीही साधे व्यासपीठ सुधा उपलब्ध केले नाही ही अजून एक खेदाची गोष्ट असल्याचे पालेकरांनी म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 21, 2012 08:57 AM IST

92 व्या नाट्यसंमेलनाला थाटात सुरुवात

21 जानेवारी

92 व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाला आज सांगलीत थाटात सुरूवात झाली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण संमेलनाचे उद्घाटन करणार होते. पण आचारसंहितेच्या बडग्यामुळे मुख्यमंत्री नाट्यसंमेलनाला अनुपस्थित राहिले आहेत. त्यामुळे दिग्दर्शक-अभिनेते अमोल पालेकर यांच्याहस्ते संमेलनाचे उद्घाटन झालं आहेत. नाट्यसंमेलनाला यंदाही नेहमीच्याच मराठी कलाकारांनी हजेरी लावलीय. संमेलनाध्यक्ष श्रीकांत मोघे, मावळते अध्यक्ष राम जाधव, स्मिता तळवळकर, वंदना गुप्ते आणि अखिल भारतीय नाट्यपरिषदेचे अध्यक्ष हेमंत टकले आणि उपाध्यक्ष विनय आपटे यांनी व्यासपीठावर हजेरी लावलीय. तर संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत वनमंत्री पतंगराव कदम, सांस्कृतिक राज्यमंत्री फौजिया खान याही या संमेलनाला उपस्थित आहेत. तर ग्रामविकास मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्यासह अभिनेते प्रशांत दामले, शरद पोंक्षे, ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग, आशालता हे नाट्यकलावंतही संमेलनाला उपस्थित आहेत.

दरम्यान, अमोल पालेकर यांनी 92 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यातील भाषणात नाट्य परिषदेवर चौफेर टीका केली. नाट्य परिषद फक्त प्रशासकीय काम करते नाटक वाढवण्याचा कधीच प्रयत्न करत नाही. अनेक मोठ्या कलाकारांना कधीच योग्य सन्मान किंवा त्यांचा साधा सत्कारही नाट्य संमेलनात केला गेला नाही. ही खेदाची गोष्ट आहे. तसेच तरुण पीढीला या मोठ्या कलाकारांची साधी माहिती ही गुगल किंवा विकीपीडियावर केली गेली नाही. सत्यदेव दुबे सारख्या मोठ्या नाटककारालाही नाट्य परिषद विसरली ही खुपच खेदाची गोष्ट आहे. समांतर रंगभूमीमुळे नाट्य परिषदेनं कधीही साधे व्यासपीठ सुधा उपलब्ध केले नाही ही अजून एक खेदाची गोष्ट असल्याचे पालेकरांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 21, 2012 08:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close