S M L

'या टोपलीखाली दडलाय बिबट्या'

22 जानेवारीकोंबड्या, बदकं डालायच्या... म्हणजे टोपलीखाली ठेवायच्या...मोठ्या डालगीत फार तर एखादा भला मोठा वाढलेला कोंबडा किंवा जोमदार बदकं असतील असं वाटेल... पण चक्क एका बिबट्याला टोपलीत डालण्यात आलं आहे. कर्दे गावच्या गावकर्‍यांची ही कमाल आहे. 6 ते 8 महिन्यांचा हा बिबट्या असून, कर्देतल्या मनोहर शिगवण यांच्या घराबाहेर तो पहाटे या डालग्यापाशी लपला होता. काल रात्री दहाच्या सुमारास दारावर धडका ऐकू आल्या, त्यावेळी मनोहर यांनी खिडकीतून पाहिल्यावर त्यांना बिबट्या दिसला. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी गावकर्‍यांना मदतीसाठी बोलावले. गावकरी आल्यावर बिबट्या पसार झाला. त्यानंतर बिबट्या पुन्हा दिसला तो थेट सकाळी याच घराबाहेर... गावकर्‍यांनी मग सावधपणे या बिबट्याला डालग्याखाली बंदिस्त केलं. आणि वनविभागाला बोलावलं. वन विभागाने पिंजरा आणून या बिबट्याला ताब्यात घेतलं. ताब्यात घेतलेला हा बिबट्या जखमी अवस्थेत असल्याचे आढळून आलंय. त्याच्या पुढच्या दोन्ही पायांना गंभीर जखमा झाल्या आहेत. या बिबट्यावर प्रथमोपचार करून, त्याला आता मुंबईच्या बोरीवली नॅशनल पार्कमध्ये पाठवण्यात येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 22, 2012 09:53 AM IST

'या टोपलीखाली दडलाय बिबट्या'

22 जानेवारी

कोंबड्या, बदकं डालायच्या... म्हणजे टोपलीखाली ठेवायच्या...मोठ्या डालगीत फार तर एखादा भला मोठा वाढलेला कोंबडा किंवा जोमदार बदकं असतील असं वाटेल... पण चक्क एका बिबट्याला टोपलीत डालण्यात आलं आहे. कर्दे गावच्या गावकर्‍यांची ही कमाल आहे. 6 ते 8 महिन्यांचा हा बिबट्या असून, कर्देतल्या मनोहर शिगवण यांच्या घराबाहेर तो पहाटे या डालग्यापाशी लपला होता. काल रात्री दहाच्या सुमारास दारावर धडका ऐकू आल्या, त्यावेळी मनोहर यांनी खिडकीतून पाहिल्यावर त्यांना बिबट्या दिसला. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी गावकर्‍यांना मदतीसाठी बोलावले. गावकरी आल्यावर बिबट्या पसार झाला. त्यानंतर बिबट्या पुन्हा दिसला तो थेट सकाळी याच घराबाहेर... गावकर्‍यांनी मग सावधपणे या बिबट्याला डालग्याखाली बंदिस्त केलं. आणि वनविभागाला बोलावलं. वन विभागाने पिंजरा आणून या बिबट्याला ताब्यात घेतलं. ताब्यात घेतलेला हा बिबट्या जखमी अवस्थेत असल्याचे आढळून आलंय. त्याच्या पुढच्या दोन्ही पायांना गंभीर जखमा झाल्या आहेत. या बिबट्यावर प्रथमोपचार करून, त्याला आता मुंबईच्या बोरीवली नॅशनल पार्कमध्ये पाठवण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 22, 2012 09:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close