S M L

उल्हासनगरमध्ये युतीला आघाडीचे आव्हान

22 जानेवारीशिवसेनेचे खासदार आनंद परांजपेंसारखा मोहरा हाती लागल्याने खुशीत असलेल्या राष्ट्रवादीने महायुतीला आता ठाणे जिल्ह्यात पुरतं नामोहरम करण्याचे ठरवलेलं दिसतंय. त्यामुळेच मुंबई, ठाणे, नाशिक आणि नागपूरसह आता राष्ट्रवादीने उल्हासनगरमध्येही काँग्रेसबरोबर आघाडी केली आहे. महापालिका निवडणुकीत काँग्रेस 35 तर राष्ट्रवादी 43 जागांवर लढणार आहे. गेल्या निवडणुकीत दोन्ही पक्ष इथं वेगवेगळे लढले होते. यात काँग्रेसला 6 तर राष्ट्रवादीला 16 जागा मिळाल्या होत्या. सध्या महापालिकेत शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे. शिवसेना भाजप युतीला सत्तेवरुन खाली खेचण्यासाठी आता काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 22, 2012 10:04 AM IST

उल्हासनगरमध्ये युतीला आघाडीचे आव्हान

22 जानेवारी

शिवसेनेचे खासदार आनंद परांजपेंसारखा मोहरा हाती लागल्याने खुशीत असलेल्या राष्ट्रवादीने महायुतीला आता ठाणे जिल्ह्यात पुरतं नामोहरम करण्याचे ठरवलेलं दिसतंय. त्यामुळेच मुंबई, ठाणे, नाशिक आणि नागपूरसह आता राष्ट्रवादीने उल्हासनगरमध्येही काँग्रेसबरोबर आघाडी केली आहे. महापालिका निवडणुकीत काँग्रेस 35 तर राष्ट्रवादी 43 जागांवर लढणार आहे. गेल्या निवडणुकीत दोन्ही पक्ष इथं वेगवेगळे लढले होते. यात काँग्रेसला 6 तर राष्ट्रवादीला 16 जागा मिळाल्या होत्या. सध्या महापालिकेत शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे. शिवसेना भाजप युतीला सत्तेवरुन खाली खेचण्यासाठी आता काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 22, 2012 10:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close