S M L

कार्यकर्ते गोळा करण्यासाठी चक्क जेवणावळी !

नरेंद्र मते, वर्धा 21 जानेवारीजिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची धामधूम सध्या जोरात सुरू आहे. मतदारांना खूष करण्यासाठी नेते एकेक आमिषं दाखवत आहे. पण प्रचारासाठी कार्यकर्ते गोळा करण्यासाठीही नेत्यांनी एक शक्कल लढवलीय. कार्यकर्त्यांसाठी चक्क जेवणावळी घातल्या जात आहे. आणि त्यामुळे बड्या बड्या पुढार्‍यांवर आचार संहिता भंगाचे गुन्हेही दाखल झाले आहेत. लांबच लांब वाहनांच्या रांगा कार्यकर्त्यांचा गोतावळा आणि भोजनावळी...निवडणुकांमुळे सध्या सगळीकडे हे चित्र दिसतंय. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण उरकादेंची पत्नी मेघा उरकादे जिल्हा परिषेदसाठी निवडणूक लढवत आहे. त्यांनी प्रचारासाठी कार्यकर्त्यांचा लवाजमा गोळा केला. कार्यकर्त्यांच्या जेवणासाठी विशेष काळजी घेतली जातेय. पण खरी बाब मात्र वेगळीच आहे.मेघा उरकादे यांनी मेळावा आणि प्रचार रॅलीसाठी परवानगीच घेतलेली नव्हती. त्यामुळे निवडणूक अधिकार्‍यांनी तक्रार केली. यावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला. निवडणुकीच्या पहिल्याच फेरीत जिल्हाध्यक्षांच्या पत्नीवर गुन्हा दाखल झाला. त्यामुळे एकच खळबळ माजलीय. पण काँग्रेस नेत्यांनी सुरू केलेल्या या भोजनावळींनी कार्यकर्त्यांचं मात्र चांगलंच फावलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 21, 2012 11:41 AM IST

कार्यकर्ते गोळा करण्यासाठी चक्क जेवणावळी !

नरेंद्र मते, वर्धा

21 जानेवारी

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची धामधूम सध्या जोरात सुरू आहे. मतदारांना खूष करण्यासाठी नेते एकेक आमिषं दाखवत आहे. पण प्रचारासाठी कार्यकर्ते गोळा करण्यासाठीही नेत्यांनी एक शक्कल लढवलीय. कार्यकर्त्यांसाठी चक्क जेवणावळी घातल्या जात आहे. आणि त्यामुळे बड्या बड्या पुढार्‍यांवर आचार संहिता भंगाचे गुन्हेही दाखल झाले आहेत.

लांबच लांब वाहनांच्या रांगा कार्यकर्त्यांचा गोतावळा आणि भोजनावळी...निवडणुकांमुळे सध्या सगळीकडे हे चित्र दिसतंय. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण उरकादेंची पत्नी मेघा उरकादे जिल्हा परिषेदसाठी निवडणूक लढवत आहे. त्यांनी प्रचारासाठी कार्यकर्त्यांचा लवाजमा गोळा केला. कार्यकर्त्यांच्या जेवणासाठी विशेष काळजी घेतली जातेय. पण खरी बाब मात्र वेगळीच आहे.

मेघा उरकादे यांनी मेळावा आणि प्रचार रॅलीसाठी परवानगीच घेतलेली नव्हती. त्यामुळे निवडणूक अधिकार्‍यांनी तक्रार केली. यावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला. निवडणुकीच्या पहिल्याच फेरीत जिल्हाध्यक्षांच्या पत्नीवर गुन्हा दाखल झाला. त्यामुळे एकच खळबळ माजलीय. पण काँग्रेस नेत्यांनी सुरू केलेल्या या भोजनावळींनी कार्यकर्त्यांचं मात्र चांगलंच फावलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 21, 2012 11:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close