S M L

महापौरांच्या कृपेनं बनावट कंपनीने फसवले करोडो रुपयांना !

गोविंद वाकडे, पिंपरी-चिंचवड22 जानेवारीपिंपरी-चिंचवड महापालिकेत एक घोटाळा उघडकीस आला आणि यामध्ये ठपका ठेवण्यात आलाय तो खुद्द महापौरांवर...महिला बचत गटांना काम उपलब्ध करुन देतो, असं म्हणणार्‍या एका खाजगी कंपनीला कोणतीही शहानीशा न करता महापालिकेनं करोडो रुपयंाचं अनुदान दिलं. पण आता ती कपंनीच अस्तित्वात नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. विशेष म्हणजे कोट्यावधीचं अनुदान लाटणार्‍या या कंपनीचं संचालकपद हे खुद्द महापौरांनी भुषवलं होतं.महिला बचत गटाच्या सदस्या असणा-या महिला सध्या अडचणींचा सामना करत आहे. कारण या महिलांना काही दिवसातच कर्ज वसुलीच्या नोटीसा दिल्या जाणार आहे. दोन वर्षांपूर्वी महिलाबचत गटाच्या आखिल संघात सामील होऊन या महीलांनी बँकेकडून करोडो रुपयंाचे अनुदान घेतलं होतं. पण आता ना तो बचत गटाचा महासंघ अस्तित्वात आहे ना ती कंपनी.."सुमेध पॉलीमार'' नावाच्या कंपनीने शहरातल्या महिला बचतगटाच्या शकडो महिलांशी करार करुन महासंघ तयार केला. त्यानंतर हा व्यवसाय उभा करण्यासाठी कंपनीच्या संचालकांनी महापालिका आणि बँकेकडून तब्बल 3 कोटी रुपयंापेक्षा जास्त अनुदान घेतलं या कपंनीच्या संचालकपदी सध्याचे महापौर योगेश बहल होते. पण विरोधकांचे सर्व आरोप ते फेटाळत आहे.आर्थिक संकटात सापडलेल्या या महिलांनी आधारासाठी या कंपनीची मदत घेतली पण आता या कंपनीनंच त्यांना अडचणीत आणलं आहे. आता या महिलांना कोण मदत करणार हाच खरा प्रश्न आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 22, 2012 11:12 AM IST

महापौरांच्या कृपेनं बनावट कंपनीने फसवले करोडो रुपयांना !

गोविंद वाकडे, पिंपरी-चिंचवड

22 जानेवारी

पिंपरी-चिंचवड महापालिकेत एक घोटाळा उघडकीस आला आणि यामध्ये ठपका ठेवण्यात आलाय तो खुद्द महापौरांवर...महिला बचत गटांना काम उपलब्ध करुन देतो, असं म्हणणार्‍या एका खाजगी कंपनीला कोणतीही शहानीशा न करता महापालिकेनं करोडो रुपयंाचं अनुदान दिलं. पण आता ती कपंनीच अस्तित्वात नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. विशेष म्हणजे कोट्यावधीचं अनुदान लाटणार्‍या या कंपनीचं संचालकपद हे खुद्द महापौरांनी भुषवलं होतं.

महिला बचत गटाच्या सदस्या असणा-या महिला सध्या अडचणींचा सामना करत आहे. कारण या महिलांना काही दिवसातच कर्ज वसुलीच्या नोटीसा दिल्या जाणार आहे. दोन वर्षांपूर्वी महिलाबचत गटाच्या आखिल संघात सामील होऊन या महीलांनी बँकेकडून करोडो रुपयंाचे अनुदान घेतलं होतं. पण आता ना तो बचत गटाचा महासंघ अस्तित्वात आहे ना ती कंपनी..

"सुमेध पॉलीमार'' नावाच्या कंपनीने शहरातल्या महिला बचतगटाच्या शकडो महिलांशी करार करुन महासंघ तयार केला. त्यानंतर हा व्यवसाय उभा करण्यासाठी कंपनीच्या संचालकांनी महापालिका आणि बँकेकडून तब्बल 3 कोटी रुपयंापेक्षा जास्त अनुदान घेतलं या कपंनीच्या संचालकपदी सध्याचे महापौर योगेश बहल होते. पण विरोधकांचे सर्व आरोप ते फेटाळत आहे.

आर्थिक संकटात सापडलेल्या या महिलांनी आधारासाठी या कंपनीची मदत घेतली पण आता या कंपनीनंच त्यांना अडचणीत आणलं आहे. आता या महिलांना कोण मदत करणार हाच खरा प्रश्न आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 22, 2012 11:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close