S M L

खा.भारतकुमार राऊत यांच्या गाडीला अपघात

22 जानेवारीशिवसेनेचे खासदार भारतकुमार राऊत यांच्या गाडीला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर गंभीर अपघात झाला आहे. या अपघातात भारतकुमार राऊतही जखमी झाले आहे. त्यांच्या डोक्याला आणि खांद्याला मार लागला आहे. एक्सप्रेस हायवेवर तळेगावजवळ त्यांच्या होंडा सिटी गाडीचे टायर फुटल्यामुळे गाडीवरचा ताबा सुटला आणि कार समोरील मारुती झेनला धडकली. खासदार राऊत यांना तातडीने निगडीच्या लोकमान्य हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलं आहे. भारतकुमार राऊत आपलं एक खासगी कामासाठी मुंबईहुन पुण्याला जात असताना हा अपघात झाला. भारतकुमार राऊत हे कार स्वत: चालवीत होते. मारुती झेनमधील 2 लहान मुलांना दुखापत झाली आहे. यातील एका 6 वर्षीय मुलाची परिस्थिती गंभीर असून त्यांना लोणावळा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 22, 2012 04:56 PM IST

खा.भारतकुमार राऊत यांच्या गाडीला अपघात

22 जानेवारी

शिवसेनेचे खासदार भारतकुमार राऊत यांच्या गाडीला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर गंभीर अपघात झाला आहे. या अपघातात भारतकुमार राऊतही जखमी झाले आहे. त्यांच्या डोक्याला आणि खांद्याला मार लागला आहे. एक्सप्रेस हायवेवर तळेगावजवळ त्यांच्या होंडा सिटी गाडीचे टायर फुटल्यामुळे गाडीवरचा ताबा सुटला आणि कार समोरील मारुती झेनला धडकली. खासदार राऊत यांना तातडीने निगडीच्या लोकमान्य हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलं आहे. भारतकुमार राऊत आपलं एक खासगी कामासाठी मुंबईहुन पुण्याला जात असताना हा अपघात झाला. भारतकुमार राऊत हे कार स्वत: चालवीत होते. मारुती झेनमधील 2 लहान मुलांना दुखापत झाली आहे. यातील एका 6 वर्षीय मुलाची परिस्थिती गंभीर असून त्यांना लोणावळा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 22, 2012 04:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close