S M L

13/7 बॉम्बस्फोटाचा कट उलगडला;3 जण अटकेत

23 जानेवारी13 जुलै 2011 रोजी मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती एटीएसचे प्रमुख राकेश मारिया यांनी दिली. नक्की अहमद शेख, नदीम अख्तर अशफाक शेख आणि हारून रशीद अशी या तिघा आरोपींची नावं आहेत. यापैकी हारून रशीद याला बनावट नोटप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या स्फोटामागचा मास्टर माईंड यासीन भटकळ याचं नाव मारिया यांनी जाहीर केलं. भटकळ जून आणि जुलैमध्ये मुंबईत होता असं मारिया म्हणाले आहे. मात्र सध्या भटकळसह तीन जण फरार असल्याची माहिती मारियांनी दिली. एटीएसने 18 राज्यात तपास केला आणि 12 हजार 730 साक्षीदार तपासले अशी माहितीही मारिया यांनी दिली. मात्र स्फोटामध्ये वापरण्यात आलेली स्फोटकं रेल्वेनं मुंबईत आल्याची माहिती मारियांनी दिली.13 जुलै 2011..ऑपेरा हाऊस, झवेरी हाऊस,दादर येथे साखळी बॉम्बस्फोटात 27 मृत्युमुखी तर 127 जखमी झाले होते. 6 महिन्यांच्या आत मुंबई एटीएसने दावा केलाय की या स्फोटांचे गूढ उलगडलंय. आणि यातल्या 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे.3 संशयित अटकेत - 22 वर्षांच्या नकी अहमद वसी अहमद शेखला बिहारच्या दरभंगामधून अटक करण्यात आली- 23 वर्षांच्या नदीम अख्तर अश्फाक शेखलाही बिहार दरभंगामधून अटक झाली- 33 वर्षांचा हारून रशीद आधीपासूनच बनावट नोटांप्रकरणी अटकेत आहेमास्टरमाईंड यासीन भटकळने नदिमला दिल्लीला बोलावून मुंबईमध्ये स्फोट घडवण्याचा मनसुबा सांगितला. त्याने नदिमला दीड लाख रुपये देऊन मुंबईत पाठवलं. तिथं नकी त्याला भेटला. नदिम अँटॉप हिलला राहू लागला. तर नकी भायखळ्याला. दोघांनी एक एक स्कूटर चोरली. याच दोन स्कूटर्सच्या मदतीनं झवेरी बाझार आणि ऑपेरा हाऊसमध्ये स्फोट घडवण्यात आले. यासाठी लागणारी स्फोटकं रेल्वेमार्गाने मुंबईत आणण्यात आली. या पूर्ण घातपातासाठी लागणारे दहा लाख रुपये हवाला मार्गे भटकळनं त्यांना पाठवले. नदीम आणि नकीला अटक झाली असली. तरी यासीन भटकळ अजूनही फरार आहे. या पूर्ण तपासासाठी.. एटीएसचे 40 अधिकारी आणि 132 कर्मचारी 6 महिने शोधकमा करत होते. त्यांनी 18 राज्यांत तपास केला आणि 12 हजारहून जास्त साक्षीदार तपासले. पण भटकळला शोधून काढणं हे आता एटीएस समोरचं सगळ्यात मोठ आव्हान आहे. तपास कसा झाला ? - 18 जुलै 2011 रोजी एटीएसकडे तपासाचे सुत्र आली - एटीएसने 18 राज्यात तपास केला - 12,730 साक्षीदार तपासले - 180 सीसीटीव्ही कॅमेयाचा तपास - 699 तास सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात गेले - एटीएसचे 40 अधिकारी 132 अधिकारी तपासात सहभागी कोण आहेत हे तीन संशयित ?1) नकी अहमद वसी अहमद शेकवय : 22 वर्षबिहारप दरभंगामधून अटक2010मध्ये मुंबईतल्या मदनपुरामध्ये राहायला आला2) नदीम अख्तर अशफाक शेखवय : 23 वर्षबिहार दरभंगामधून अटक3) हारुन रशिद वय : 33 वर्ष

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 23, 2012 11:10 AM IST

13/7 बॉम्बस्फोटाचा कट उलगडला;3 जण अटकेत

23 जानेवारी

13 जुलै 2011 रोजी मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती एटीएसचे प्रमुख राकेश मारिया यांनी दिली. नक्की अहमद शेख, नदीम अख्तर अशफाक शेख आणि हारून रशीद अशी या तिघा आरोपींची नावं आहेत. यापैकी हारून रशीद याला बनावट नोटप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

या स्फोटामागचा मास्टर माईंड यासीन भटकळ याचं नाव मारिया यांनी जाहीर केलं. भटकळ जून आणि जुलैमध्ये मुंबईत होता असं मारिया म्हणाले आहे. मात्र सध्या भटकळसह तीन जण फरार असल्याची माहिती मारियांनी दिली. एटीएसने 18 राज्यात तपास केला आणि 12 हजार 730 साक्षीदार तपासले अशी माहितीही मारिया यांनी दिली. मात्र स्फोटामध्ये वापरण्यात आलेली स्फोटकं रेल्वेनं मुंबईत आल्याची माहिती मारियांनी दिली.

13 जुलै 2011..ऑपेरा हाऊस, झवेरी हाऊस,दादर येथे साखळी बॉम्बस्फोटात 27 मृत्युमुखी तर 127 जखमी झाले होते. 6 महिन्यांच्या आत मुंबई एटीएसने दावा केलाय की या स्फोटांचे गूढ उलगडलंय. आणि यातल्या 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

3 संशयित अटकेत - 22 वर्षांच्या नकी अहमद वसी अहमद शेखला बिहारच्या दरभंगामधून अटक करण्यात आली- 23 वर्षांच्या नदीम अख्तर अश्फाक शेखलाही बिहार दरभंगामधून अटक झाली- 33 वर्षांचा हारून रशीद आधीपासूनच बनावट नोटांप्रकरणी अटकेत आहे

मास्टरमाईंड यासीन भटकळने नदिमला दिल्लीला बोलावून मुंबईमध्ये स्फोट घडवण्याचा मनसुबा सांगितला. त्याने नदिमला दीड लाख रुपये देऊन मुंबईत पाठवलं. तिथं नकी त्याला भेटला. नदिम अँटॉप हिलला राहू लागला. तर नकी भायखळ्याला. दोघांनी एक एक स्कूटर चोरली. याच दोन स्कूटर्सच्या मदतीनं झवेरी बाझार आणि ऑपेरा हाऊसमध्ये स्फोट घडवण्यात आले. यासाठी लागणारी स्फोटकं रेल्वेमार्गाने मुंबईत आणण्यात आली. या पूर्ण घातपातासाठी लागणारे दहा लाख रुपये हवाला मार्गे भटकळनं त्यांना पाठवले. नदीम आणि नकीला अटक झाली असली. तरी यासीन भटकळ अजूनही फरार आहे.

या पूर्ण तपासासाठी.. एटीएसचे 40 अधिकारी आणि 132 कर्मचारी 6 महिने शोधकमा करत होते. त्यांनी 18 राज्यांत तपास केला आणि 12 हजारहून जास्त साक्षीदार तपासले. पण भटकळला शोधून काढणं हे आता एटीएस समोरचं सगळ्यात मोठ आव्हान आहे. तपास कसा झाला ?

- 18 जुलै 2011 रोजी एटीएसकडे तपासाचे सुत्र आली - एटीएसने 18 राज्यात तपास केला - 12,730 साक्षीदार तपासले - 180 सीसीटीव्ही कॅमेयाचा तपास - 699 तास सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात गेले - एटीएसचे 40 अधिकारी 132 अधिकारी तपासात सहभागी

कोण आहेत हे तीन संशयित ?1) नकी अहमद वसी अहमद शेकवय : 22 वर्षबिहारप दरभंगामधून अटक2010मध्ये मुंबईतल्या मदनपुरामध्ये राहायला आला

2) नदीम अख्तर अशफाक शेखवय : 23 वर्षबिहार दरभंगामधून अटक

3) हारुन रशिद वय : 33 वर्ष

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 23, 2012 11:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close