S M L

फिरोदीया करंडकाचे पडघम वाजायला सुरुवात

प्राची कुलकर्णी, पुणे23 जानेवारीनवीन वर्ष सुरु झालं की पुण्यातल्या कॉलेजियन्सना वेध लागतात ते फिरोदिया करंडकाचे... याच फिरोदिया करंडकचे लॉट्स आज पाडले गेलेत. यावेळी सतरंगी रे या सिनेमातील काही कलाकार इथं हजर होते. यातले काही कलाकार गेली अनेक वर्ष फिरोदियाशी जोडले गेले होते. आणि त्यामुळे यावेळी ते सगळेच नॉस्टेल्जिक झाले होते.आवाज कुणाचा च्या घोषणांनी संपुर्ण परिसर दणाणून गेला होता. अर्थात हा जल्लोष होता गेल्या वर्षीच्या विजेत्यांचा.. नवीन टिम्सना चॅलेंज करणारं हे चिअरींग म्हणजेच फिरोदीया करंडक स्पर्धेची नांदी ठरली. फिरोदीया करंडक स्पर्धेचे लॉट्स आज पाडण्यात आले. गेल्या वर्षी विजेत्या ठरलेल्या व्हीआयआयटीने करंडक आयोजकांकडे सोपवला. यंदा ही स्पर्धा तीन टप्प्यांमध्ये रंगणार आहे. यावेळी या स्पर्धकांना मार्गदर्शन करायला हजर होती ती सतरंगी रे ची टीम.. सतरंगी रे मधले जवळपास 8 कलाकार फिरोदीया स्कू ल मधून बाहेर पडलेत. त्यामुळे ही सगळीच मंडळी नॉस्टेल्जिक झाली होती. लॉटस् तर पाडले गेलेत आणि आता सगळ्यांनाच वेध लागलेत की फिरोदीया करंडकाचा यंदाचा मानकरी कोण ठरतो याचे..

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 23, 2012 05:25 PM IST

फिरोदीया करंडकाचे पडघम वाजायला सुरुवात

प्राची कुलकर्णी, पुणे

23 जानेवारी

नवीन वर्ष सुरु झालं की पुण्यातल्या कॉलेजियन्सना वेध लागतात ते फिरोदिया करंडकाचे... याच फिरोदिया करंडकचे लॉट्स आज पाडले गेलेत. यावेळी सतरंगी रे या सिनेमातील काही कलाकार इथं हजर होते. यातले काही कलाकार गेली अनेक वर्ष फिरोदियाशी जोडले गेले होते. आणि त्यामुळे यावेळी ते सगळेच नॉस्टेल्जिक झाले होते.

आवाज कुणाचा च्या घोषणांनी संपुर्ण परिसर दणाणून गेला होता. अर्थात हा जल्लोष होता गेल्या वर्षीच्या विजेत्यांचा.. नवीन टिम्सना चॅलेंज करणारं हे चिअरींग म्हणजेच फिरोदीया करंडक स्पर्धेची नांदी ठरली. फिरोदीया करंडक स्पर्धेचे लॉट्स आज पाडण्यात आले. गेल्या वर्षी विजेत्या ठरलेल्या व्हीआयआयटीने करंडक आयोजकांकडे सोपवला. यंदा ही स्पर्धा तीन टप्प्यांमध्ये रंगणार आहे.

यावेळी या स्पर्धकांना मार्गदर्शन करायला हजर होती ती सतरंगी रे ची टीम.. सतरंगी रे मधले जवळपास 8 कलाकार फिरोदीया स्कू ल मधून बाहेर पडलेत. त्यामुळे ही सगळीच मंडळी नॉस्टेल्जिक झाली होती. लॉटस् तर पाडले गेलेत आणि आता सगळ्यांनाच वेध लागलेत की फिरोदीया करंडकाचा यंदाचा मानकरी कोण ठरतो याचे..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 23, 2012 05:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close