S M L

बाळासाहेब ठाकरेंचा आज 85 वा वाढदिवस ; मातोश्रीवर खास रुद्राक्षतुला

23 जानेवारीशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 85 वा वाढदिवस आहे. आणि बाळासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर खास महामृत्यूंजय यज्ञाचे आयोजन करण्यात आलं होतं. या यज्ञात बाळासाहेब स्वत: सहभागी झाले होते. तसेच मुंबईतल्या नेपाळ महासंघाकडून बाळासाहेबांची खास रुद्राक्षतुला करण्यात आली. या यज्ञानंतर बाळासाहेबांनी पत्रकारांशी बातचीत केली. यावेळी शरद पवारांसोबतची आपली मैत्री आजही कायम आहे, असं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर पवारांना मी माझ्या घरी बोलावीन तेव्हा तुम्हीही या असंही त्यांनी पत्रकारांना सांगितलं. कोणी गेलं म्हणून शिवसेना कमजोर होत नाही. मीसुद्धा काहीजणांना शिवसेनेतून काढलं आहे. हे असं चालूच राहतं अशी प्रतिक्रिया बाळासाहेबांनी आनंद परांजपे प्रकरणावर दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 23, 2012 11:41 AM IST

बाळासाहेब ठाकरेंचा आज 85 वा वाढदिवस ; मातोश्रीवर खास रुद्राक्षतुला

23 जानेवारी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 85 वा वाढदिवस आहे. आणि बाळासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर खास महामृत्यूंजय यज्ञाचे आयोजन करण्यात आलं होतं. या यज्ञात बाळासाहेब स्वत: सहभागी झाले होते. तसेच मुंबईतल्या नेपाळ महासंघाकडून बाळासाहेबांची खास रुद्राक्षतुला करण्यात आली. या यज्ञानंतर बाळासाहेबांनी पत्रकारांशी बातचीत केली.

यावेळी शरद पवारांसोबतची आपली मैत्री आजही कायम आहे, असं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर पवारांना मी माझ्या घरी बोलावीन तेव्हा तुम्हीही या असंही त्यांनी पत्रकारांना सांगितलं. कोणी गेलं म्हणून शिवसेना कमजोर होत नाही. मीसुद्धा काहीजणांना शिवसेनेतून काढलं आहे. हे असं चालूच राहतं अशी प्रतिक्रिया बाळासाहेबांनी आनंद परांजपे प्रकरणावर दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 23, 2012 11:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close