S M L

कृपाशंकर सिंग यांच्याविरोधात सावंत यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

24 जानेवारीमुंबईत काँग्रेस-राष्ट्रवदीची आघाडी झाली असली तरी काँग्रेसअंतर्गत असंतोष आता उघड झाला आहे. मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस अजित सावंत यांनी थेट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र लिहून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंग मनमानी पद्धतीने निवडणुकीची रणनीती आखल्याचा आरोप केला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या कमकुवत हाताळणीमुळे भविष्यकाळात मुंबईमध्ये काँग्रेसवर दुष्परिणाम होतील आणि कार्यकर्त्यांमध्ये असंतोष असल्याचं सावंत यांनी या पत्रात लिहिले आहे. कृपाशंकर सिंग यांनी राष्ट्रवादीशी आघाडी करताना त्यांच्या मतदारसंघातील वॉर्ड राष्ट्रवादीला जाणार नाहीत याची खबरदारी घेतल्याचा आरोपही सावंत यांनी केला. याचबरोबर उमेदवारांची निवडप्रक्रिया, निवडणुकीची पूर्वतयारी, यातही कृपाशंकर सिंग मनमानी करत असल्याचा आरोप अजित सावंत यांनी केला. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या वर्गातून उमेदवारी न देणं, नेत्यांचे नातेवाईक आणि पीएना उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तिकीट वाटपात बाहेर आलेल्या नेत्यांचा प्रभाव आहे तर जुन्या कार्यकर्त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 24, 2012 09:26 AM IST

कृपाशंकर सिंग यांच्याविरोधात सावंत यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

24 जानेवारी

मुंबईत काँग्रेस-राष्ट्रवदीची आघाडी झाली असली तरी काँग्रेसअंतर्गत असंतोष आता उघड झाला आहे. मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस अजित सावंत यांनी थेट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र लिहून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंग मनमानी पद्धतीने निवडणुकीची रणनीती आखल्याचा आरोप केला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या कमकुवत हाताळणीमुळे भविष्यकाळात मुंबईमध्ये काँग्रेसवर दुष्परिणाम होतील आणि कार्यकर्त्यांमध्ये असंतोष असल्याचं सावंत यांनी या पत्रात लिहिले आहे.

कृपाशंकर सिंग यांनी राष्ट्रवादीशी आघाडी करताना त्यांच्या मतदारसंघातील वॉर्ड राष्ट्रवादीला जाणार नाहीत याची खबरदारी घेतल्याचा आरोपही सावंत यांनी केला. याचबरोबर उमेदवारांची निवडप्रक्रिया, निवडणुकीची पूर्वतयारी, यातही कृपाशंकर सिंग मनमानी करत असल्याचा आरोप अजित सावंत यांनी केला. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या वर्गातून उमेदवारी न देणं, नेत्यांचे नातेवाईक आणि पीएना उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तिकीट वाटपात बाहेर आलेल्या नेत्यांचा प्रभाव आहे तर जुन्या कार्यकर्त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 24, 2012 09:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close