S M L

तो माथेफिरु बस ड्रायव्हर संतोष माने मनोरूग्ण !

24 जानेवारीपुण्यात एसटी बस घेऊन धुमाकूळ घालणार ड्रायव्हर संतोष माने हा मानसिक रुग्ण असल्याचीही चर्चा आता सुरू झाली आहे. संतोष सोलापूरच्या कवठाळी गावाचा रहिवासी असल्याची माहिती इथल्या सरपंचांनी दिली. तसेच तो मानसिक रुग्ण असून तो गेल्या काही वर्षांपासून तो उपचार घेत असल्याचंही सरपंचांनी सांगितले. सोलापूरच्या डॉक्टर दिलीप बुरटेंकडून त्यानं उपचार घेतला होता. त्यांनी आज केलेले कृत्य हे मनोरुग्णातून केले असावे असा अंदाजही बुरटे यांनी व्यक्त केला.गेल्या 13 वर्षांपासून तो पुण्याला रहायला आला होता, असंही सरपंचांनी सांगितले. संतोष हा कालच गाणगापूर-पुणे बस चालवून पुण्यात आला. आज सकाळी सव्वा दहा वाजता त्याची ग्रामीण ड्युटी लावली होती. पण लवकरची ड्युटी त्यानं मागितली. पण ही विनंती वरिष्ठांनी ही मागणी झिडकारली. त्यामुळे संतापलेल्या संतोषने सरळ सातारा-स्वारगेट- सातारा बस ताब्यात घेऊन निघून गेला आणि धुमाकूळ घातला. संतोष असं का वागला ?काल संध्याकाळी गाणगापूर-पुणे बस घेऊन आलाआज सव्वादहा वाजता लावली होती ग्रामीण ड्युटी पण लवकर ड्युटी लावण्याची केली होती मागणी वरिष्ठांनी फेटाळली मागणी त्यानंतर सातारा-स्वारगेट बस घेऊन निघून गेलाकोण आहे संतोष माने?वय- 41 वर्षं मूळ गाव- कवठाळी (सोलापूर)13 वर्षांपासून पुण्यात वास्तव्यमानसिक रुग्ण असल्याची माहितीअनेक वर्षांपासून सुरु होते उपचार

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 25, 2012 09:28 AM IST

तो माथेफिरु बस ड्रायव्हर संतोष माने मनोरूग्ण !

24 जानेवारीपुण्यात एसटी बस घेऊन धुमाकूळ घालणार ड्रायव्हर संतोष माने हा मानसिक रुग्ण असल्याचीही चर्चा आता सुरू झाली आहे. संतोष सोलापूरच्या कवठाळी गावाचा रहिवासी असल्याची माहिती इथल्या सरपंचांनी दिली. तसेच तो मानसिक रुग्ण असून तो गेल्या काही वर्षांपासून तो उपचार घेत असल्याचंही सरपंचांनी सांगितले. सोलापूरच्या डॉक्टर दिलीप बुरटेंकडून त्यानं उपचार घेतला होता. त्यांनी आज केलेले कृत्य हे मनोरुग्णातून केले असावे असा अंदाजही बुरटे यांनी व्यक्त केला.गेल्या 13 वर्षांपासून तो पुण्याला रहायला आला होता, असंही सरपंचांनी सांगितले. संतोष हा कालच गाणगापूर-पुणे बस चालवून पुण्यात आला. आज सकाळी सव्वा दहा वाजता त्याची ग्रामीण ड्युटी लावली होती. पण लवकरची ड्युटी त्यानं मागितली. पण ही विनंती वरिष्ठांनी ही मागणी झिडकारली. त्यामुळे संतापलेल्या संतोषने सरळ सातारा-स्वारगेट- सातारा बस ताब्यात घेऊन निघून गेला आणि धुमाकूळ घातला. संतोष असं का वागला ?काल संध्याकाळी गाणगापूर-पुणे बस घेऊन आलाआज सव्वादहा वाजता लावली होती ग्रामीण ड्युटी पण लवकर ड्युटी लावण्याची केली होती मागणी वरिष्ठांनी फेटाळली मागणी त्यानंतर सातारा-स्वारगेट बस घेऊन निघून गेला

कोण आहे संतोष माने?वय- 41 वर्षं मूळ गाव- कवठाळी (सोलापूर)13 वर्षांपासून पुण्यात वास्तव्यमानसिक रुग्ण असल्याची माहितीअनेक वर्षांपासून सुरु होते उपचार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 25, 2012 09:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close