S M L

रश्दींची व्हिडिओ कॉन्फरन्स रद्द

24 जानेवारीवादग्रस्त लेखक सलमान रश्दींवरुन गेले काही दिवस जयपूरमध्ये सुरू असलेल्या साहित्य महोत्सवातीलं वातावरण ढवळून निघालं आहे. भारतातल्या या सर्वांत प्रसिद्ध इंग्रजी साहित्य महोत्सवात सलमान रश्दी उपस्थित राहणार होते. पण काही मुस्लिम संघटनांनकडून झालेल्या कडव्या विरोधामुळे आधी रश्दींचा भारत दौरा आणि त्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सही रद्द झाली आहे.जयपूरमध्ये भरलेल्या जगभरातल्या लेखकांच्या मेळ्यात मंगळवारचा दिवस दु:ख आणि संतापाचा होता. या महोत्सवात भारतीय मुळाचे प्रसिद्ध इंग्रजी लेखक रश्दी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भाषण करणार होते. पण त्याआधीच मिली या कडव्या मुस्लिम संघटनेनं जोरदार निदर्शनं केली. रश्दींचे वादग्रस्त पुस्तक 'सॅटॅनिक वर्सस' हे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणारं आहे, असं या निदर्शकांचं म्हणणं आहे.जयपूरमध्ये होणार्‍या या साहित्य महोत्सवात रश्दी स्वत: उपस्थित राहणार होते. पण दारुल देवबंदनं त्यांच्या भारत दौर्‍यालाच विरोध केला. केंद्र सरकारनंही याप्रकरणी हात झटकले. त्यातच मुंबईच्या अंडरवर्ल्डकडून रश्दींच्या जीवाला धोका असल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून मिळाली. त्यामुळे रश्दींनी दौरा रद्द केला. पण दौरा रद्द करावा, यासाठी जयपूर पोलिसानीच अशी अफवा परसरवल्याचा आरोप रश्दींनी केला. अखेर त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स करण्याचा निर्णय घेतला. त्यालाही विरोध सुरुच राहिला. अखेर सुरक्षेच्या कारणामुळे आयोजकांना रश्दींची व्हिडिओ कॉन्फरन्स रद्द करावी लागली. दरम्यान, स्वत: सलमान रश्दींनी ट्विटरवरुन आपला संताप व्यक्त केला. मुस्लिम गटाने दिलेल्या धमकीने आज अभिव्यक्ती स्वातंत्र्याला दाबण्यात आलंय. लोकशाहीत फक्त धमक्या देणार्‍यांनाच नाही तर सगळ्यांनाचा बोलण्याचा अधिकार आहे. भारतीय वंशाचे लेखक सलमान रश्दींबाबतचा हा वाद नेमका काय आहे ?- 1988 साली रश्दींचं 'द सॅटॅनिक वर्सस' पुस्तक प्रसिद्ध- पुस्तकावरुन जगभरातल्या मुस्लिम समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या- सगळ्यात आधी भारताने या वादग्रस्त पुस्तकावर बंदी आणली- 1989मध्ये इराणचे धर्मगुरु आणि सर्वोच्च राजकीय नेते अयातुल्ला खोमिनींनी रश्दींना मारण्याचा फतवा काढला- या वादानंतर रश्दी 2000 आणि 2007 साली भारतात आले- दोन्ही वेळा त्यांच्याविरोधात निदर्शनं झाली

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 24, 2012 05:45 PM IST

रश्दींची व्हिडिओ कॉन्फरन्स रद्द

24 जानेवारी

वादग्रस्त लेखक सलमान रश्दींवरुन गेले काही दिवस जयपूरमध्ये सुरू असलेल्या साहित्य महोत्सवातीलं वातावरण ढवळून निघालं आहे. भारतातल्या या सर्वांत प्रसिद्ध इंग्रजी साहित्य महोत्सवात सलमान रश्दी उपस्थित राहणार होते. पण काही मुस्लिम संघटनांनकडून झालेल्या कडव्या विरोधामुळे आधी रश्दींचा भारत दौरा आणि त्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सही रद्द झाली आहे.जयपूरमध्ये भरलेल्या जगभरातल्या लेखकांच्या मेळ्यात मंगळवारचा दिवस दु:ख आणि संतापाचा होता. या महोत्सवात भारतीय मुळाचे प्रसिद्ध इंग्रजी लेखक रश्दी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भाषण करणार होते. पण त्याआधीच मिली या कडव्या मुस्लिम संघटनेनं जोरदार निदर्शनं केली. रश्दींचे वादग्रस्त पुस्तक 'सॅटॅनिक वर्सस' हे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणारं आहे, असं या निदर्शकांचं म्हणणं आहे.

जयपूरमध्ये होणार्‍या या साहित्य महोत्सवात रश्दी स्वत: उपस्थित राहणार होते. पण दारुल देवबंदनं त्यांच्या भारत दौर्‍यालाच विरोध केला. केंद्र सरकारनंही याप्रकरणी हात झटकले. त्यातच मुंबईच्या अंडरवर्ल्डकडून रश्दींच्या जीवाला धोका असल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून मिळाली. त्यामुळे रश्दींनी दौरा रद्द केला. पण दौरा रद्द करावा, यासाठी जयपूर पोलिसानीच अशी अफवा परसरवल्याचा आरोप रश्दींनी केला. अखेर त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स करण्याचा निर्णय घेतला. त्यालाही विरोध सुरुच राहिला. अखेर सुरक्षेच्या कारणामुळे आयोजकांना रश्दींची व्हिडिओ कॉन्फरन्स रद्द करावी लागली.

दरम्यान, स्वत: सलमान रश्दींनी ट्विटरवरुन आपला संताप व्यक्त केला. मुस्लिम गटाने दिलेल्या धमकीने आज अभिव्यक्ती स्वातंत्र्याला दाबण्यात आलंय. लोकशाहीत फक्त धमक्या देणार्‍यांनाच नाही तर सगळ्यांनाचा बोलण्याचा अधिकार आहे.

भारतीय वंशाचे लेखक सलमान रश्दींबाबतचा हा वाद नेमका काय आहे ?- 1988 साली रश्दींचं 'द सॅटॅनिक वर्सस' पुस्तक प्रसिद्ध- पुस्तकावरुन जगभरातल्या मुस्लिम समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या- सगळ्यात आधी भारताने या वादग्रस्त पुस्तकावर बंदी आणली- 1989मध्ये इराणचे धर्मगुरु आणि सर्वोच्च राजकीय नेते अयातुल्ला खोमिनींनी रश्दींना मारण्याचा फतवा काढला- या वादानंतर रश्दी 2000 आणि 2007 साली भारतात आले- दोन्ही वेळा त्यांच्याविरोधात निदर्शनं झाली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 24, 2012 05:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close