S M L

सोनवणे जळीतकांडाला 1 वर्ष पूर्ण; आज जैसे थे परिस्थिती !

दीप्ती राऊत, नाशिक25 जानेवारीप्रजासत्ताक दिनाच्या पुर्व संध्याकाळी माणुसकीला काळिमा फासणार्‍या यशवंत सोनवणे जळीतकांडाला एक वर्ष पूर्ण झालं. यानिमित्ताने गरिबांसाठीच्या सवलतीच्या रॉकेलवर पोसलं जाणारं तेलभेसळांचं पितळ उघड पडलं. पण तेवढ्यापुरतंच. त्यानंतर परिस्थिती जैसे थे. गेल्या वर्षभरात यशवंत सोनवणे जळीतकांडाच्या तपासाचं नेमकं काय झालं? गेल्यावर्षी 25 जानेवारीच्या संध्याकाळी नाशिकचे अपर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना जिवंत जाळण्यात आलं आणि एकच हाहाकार उडाला. तेलकंपन्यांचे डेपो असलेल्या मनमाडपासून सुरू झालेल्या तेलभेसळीचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यावेळी घोषणा तर भरपूर झालेल्या..महसूलमंत्री बाळासाबेर थोरात म्हणतात, सोनवणे जळीत हत्याकांड प्रकरणाचा तपास शेवटपर्यंत करू.पण प्रत्यक्षात सरकारची ही घोषणा किती पोकळ होती हे गेल्या वर्षभरातल्या घटनांवरू स्पष्ट होतंय.- 8 फेब्रुवारीला 11 आरोपींवर मोक्का लावाला- 22 फेब्रुवारीला पोपट शिंदेचा मुलगा कुणाल जामीन- 2 एप्रिलला विकास आणि जावई दीपक यांना जामीन- 8 एप्रिलला तपास सीबीआयकडे वर्ग- 25 मे ला उरलेल्या 7 जणांची जामिनावर सुटकाहा तपास राज्य पोलिसांकडे 72 दिवस, तर त्यानंतर सीबीआयकडे 47 दिवस होता. असे 120 दिवस हातात मिळूनही पोलीस चार्जशीट दाखल करू शकले नाहीत. मुद्दा फक्त पोपट शिंदेच्या अड्‌ड्याचा किंवा यशवंत सोनवणेंच्या हत्येचा नव्हता. तेलभेसळीची बजबजपुरी समूळ नाहीशी करण्याचे आवाहन सरकारपुढे होतं. पण त्या दृष्टीनं सरकारला अपयशच आलंय. गेल्या वर्षभरात पोलिसांनी टाकलेल्या धाडीत तेलभेसळ सुरू असल्याचं सिद्ध झालं आहे.* 18 मे - 2 जण अटक, 8 लाखांचा माल जप्त* 24 जून - 4 अटक, 8 लाखांचा माल जप्त* 15 नोव्हेंबर - 2 अटक, 11 लाखांचा माल जप्त* 14 जानेवारी - 4 अटक, 10 लाखांचा माल जप्तदरम्यान, यशवंत सोनवणेंनी पोपट शिंदेचे टँकर सोडवण्यासाठी केलेली पैशाची मागणी उजेडात आली. तेलभेसळ रोखणार्‍यांचे तेलभेसळ करणार्‍यांशी असलेलं संगनमत स्पष्ट झालं. एक सोनवणे गेले, एक पोपट शिंदे गेला. तेलभेसळ सुरूच आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 25, 2012 11:23 AM IST

सोनवणे जळीतकांडाला 1 वर्ष पूर्ण; आज जैसे थे परिस्थिती !

दीप्ती राऊत, नाशिक

25 जानेवारी

प्रजासत्ताक दिनाच्या पुर्व संध्याकाळी माणुसकीला काळिमा फासणार्‍या यशवंत सोनवणे जळीतकांडाला एक वर्ष पूर्ण झालं. यानिमित्ताने गरिबांसाठीच्या सवलतीच्या रॉकेलवर पोसलं जाणारं तेलभेसळांचं पितळ उघड पडलं. पण तेवढ्यापुरतंच. त्यानंतर परिस्थिती जैसे थे. गेल्या वर्षभरात यशवंत सोनवणे जळीतकांडाच्या तपासाचं नेमकं काय झालं? गेल्यावर्षी 25 जानेवारीच्या संध्याकाळी नाशिकचे अपर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना जिवंत जाळण्यात आलं आणि एकच हाहाकार उडाला. तेलकंपन्यांचे डेपो असलेल्या मनमाडपासून सुरू झालेल्या तेलभेसळीचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यावेळी घोषणा तर भरपूर झालेल्या..महसूलमंत्री बाळासाबेर थोरात म्हणतात, सोनवणे जळीत हत्याकांड प्रकरणाचा तपास शेवटपर्यंत करू.

पण प्रत्यक्षात सरकारची ही घोषणा किती पोकळ होती हे गेल्या वर्षभरातल्या घटनांवरू स्पष्ट होतंय.- 8 फेब्रुवारीला 11 आरोपींवर मोक्का लावाला- 22 फेब्रुवारीला पोपट शिंदेचा मुलगा कुणाल जामीन- 2 एप्रिलला विकास आणि जावई दीपक यांना जामीन- 8 एप्रिलला तपास सीबीआयकडे वर्ग- 25 मे ला उरलेल्या 7 जणांची जामिनावर सुटका

हा तपास राज्य पोलिसांकडे 72 दिवस, तर त्यानंतर सीबीआयकडे 47 दिवस होता. असे 120 दिवस हातात मिळूनही पोलीस चार्जशीट दाखल करू शकले नाहीत. मुद्दा फक्त पोपट शिंदेच्या अड्‌ड्याचा किंवा यशवंत सोनवणेंच्या हत्येचा नव्हता. तेलभेसळीची बजबजपुरी समूळ नाहीशी करण्याचे आवाहन सरकारपुढे होतं. पण त्या दृष्टीनं सरकारला अपयशच आलंय. गेल्या वर्षभरात पोलिसांनी टाकलेल्या धाडीत तेलभेसळ सुरू असल्याचं सिद्ध झालं आहे.* 18 मे - 2 जण अटक, 8 लाखांचा माल जप्त* 24 जून - 4 अटक, 8 लाखांचा माल जप्त* 15 नोव्हेंबर - 2 अटक, 11 लाखांचा माल जप्त* 14 जानेवारी - 4 अटक, 10 लाखांचा माल जप्त

दरम्यान, यशवंत सोनवणेंनी पोपट शिंदेचे टँकर सोडवण्यासाठी केलेली पैशाची मागणी उजेडात आली. तेलभेसळ रोखणार्‍यांचे तेलभेसळ करणार्‍यांशी असलेलं संगनमत स्पष्ट झालं. एक सोनवणे गेले, एक पोपट शिंदे गेला. तेलभेसळ सुरूच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 25, 2012 11:23 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close