S M L

ऑस्ट्रेलियाचा 604 धावांची इंनिग ; भारताची खराब सुरुवात

25 जानेवारीऍडलेड टेस्टच्या दुसर्‍या दिवशी ऑस्ट्रेलियाने टेस्टवर चांगलंच वर्चस्व मिळवलं आहे. पाँटिंग आणि क्लार्कच्या डबल सेंच्युरीमुळे पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी 7 विकेटवर 604 रन्सचा डोंगर उभा केला.आणि त्यानंतर सेहवाग आणि द्रविड या भारताच्या किमती विकेटही मिळवल्या. भारतासाठी गंभीर आणि सचिन ही जोडी सध्या पिचवर आहे आणि फॉलोऑन टाळण्यासाठी टीमला अजून 343 रन करायचे आहेत.ऍडलेडमध्ये स्वच्छ सूर्यप्रकाशात कालचे दोन शतकवीर पुन्हा बॅटिंगसाठी सज्ज झाले. आणि काल ज्या थाटात त्यांनी बॅटिंग केली त्याच थाटात पाँटिंग आणि क्लार्कनी आज सुरुवात केली. अवघ्या तासाभरातच दोघांनी स्कोअर चारशे रनच्या पलिकडे नेला. भारतीय फिल्डरनी पाँटिंगवर एकदा मेहरनजर केली ती 186 रनवर त्याचा एक सोपा कॅच सोडून...पाँटिंग पेक्षा क्लार्कचा रनचा वेग जास्त होता. त्यानेच आधी डबल सेंच्युरी पूर्ण केली. या सीरिजमधली त्याची दुसरी डबल सेंच्युरी.. पण लंचब्रेकनंतर मात्र तो एकच बॉल टिकला. वैयक्तिक 210 रनवर यादवने त्याला क्लीनबोल्ड केलं. दोघांमधली पार्टनरशिप होती 386 रनची. पाँटिंगने आपली सहावी डबल सेंच्युरी आज पूर्ण केली ती ट्रेडमार्क पूल शॉट खेळून...भारताविरुद्धची त्याची ही तब्बल तिसरी डबल सेंच्युरी.त्यानंतर लक्ष्मणने पाँटिंगला दुसरं जीवदान दिलं. ऑस्ट्रेलियाने आता आक्रमक धोरण स्विकारलं होतं. आणि त्याच नादात माईक हसी रनआऊट झाला. गंभीरच्या दक्ष फिल्डिंगमुळे भारतीय टीमला ही विकेट मिळाली. पाठोपाठ पाँटिंगही आऊट झाला. झहीरच्या बॉलिंगवर डीप मिडविकेटला तेंडुलकरने हा कॅच पकडला. त्यानंतर अश्विनने पीटर सिडलला 2 रनवर आऊट केलं. आता ऑस्ट्रेलियाची इनिंग गुंडाळली जाईल असं वाटत होतं, पण ब्रॅड हॅडिन आण रायन हॅरिसने तग धरला आणि इनिंग सहाशे पार नेली. त्यानंतर मात्र सात विकेटवर 604 रनच्या स्कोअरवर कॅप्टन मायकेल क्लार्कने इनिंग घोषित केली. वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांनी मग भारतीय इनिंग सुरु केली. यावेळी सेहवागच्या चेहर्‍यावर निर्धार दिसत होता. आणि सुरुवातीलाच तीन फोर मारत त्याने आपला इरादाही स्पष्ट केला. पण सिडलच्या एका फुलटॉसने त्याची इनिंगच संपवली. सिडलच्याच हातात कॅच देऊन तो 18 रनवर आऊट झाला. राहुल द्रविड या सीरिजमध्ये सहाव्यांदा क्लीनबोल्ड झाला. सचिन तेंडुलकर आणि गौतम गंभीरने मग उरलेला वेळ फारशी जोखीम न पत्करता खेळून काढला. दिवस संपता संपता भारतीय टीमचा स्कोअर होता दोन विकेटवर 61 रन. टीम अजूनही 543 रन्सनी पिछाडीवर आहे. आणि फॉलोऑन टाळण्यासाठी टीमला हवेत आणखी 343 रन.द वॉल ढासळली !ऑस्ट्रेलिया दौरा भारतीय टीमसाठी जितका वाईट ठरलाय, त्याहून कितीतरी पटीने खराब ठरलाय तो राहुल द्रविडसाठी...या दौर्‍यात द वॉल अक्षरश ढासळली. ऍडलेड टेस्टमध्ये हिल्फेनहॉसने राहुल द्रविडला फक्त 1 रन्सवर क्लिन बोल्ड केलं. या दौर्‍यात क्लिन बोल्ड होण्याची द्रविडची 7 इनिंगमधली ही 6 वी वेळ होती. तर टेस्ट क्रिकेटमध्ये बोल्ड होण्याची ही त्याची तब्बल 55 वी वेळ आहे. भारताचा सर्वात तंत्रशुध्द बॅट्समन म्हणून राहुल द्रविडची ओळख आहे. पण या दौर्‍यात एकच चुक त्याच्याकडून सारखी होतेय. प्रत्येकवेळी त्याची बोल्ड होण्याची पध्दतही तिच आहे. बॅट आणि पॅडच्यामधून बॉल स्टंम्पवर आदळतोय... हिल्फेनहॉसनं त्याला तब्बल 3 वेळा क्लिन बोल्ड केलंय. तर सिडेलच्या बॉलिंगवर द्रविड दोनदा क्लिन बोल्ड झाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 25, 2012 03:22 PM IST

ऑस्ट्रेलियाचा 604 धावांची इंनिग ; भारताची खराब सुरुवात

25 जानेवारी

ऍडलेड टेस्टच्या दुसर्‍या दिवशी ऑस्ट्रेलियाने टेस्टवर चांगलंच वर्चस्व मिळवलं आहे. पाँटिंग आणि क्लार्कच्या डबल सेंच्युरीमुळे पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी 7 विकेटवर 604 रन्सचा डोंगर उभा केला.आणि त्यानंतर सेहवाग आणि द्रविड या भारताच्या किमती विकेटही मिळवल्या. भारतासाठी गंभीर आणि सचिन ही जोडी सध्या पिचवर आहे आणि फॉलोऑन टाळण्यासाठी टीमला अजून 343 रन करायचे आहेत.

ऍडलेडमध्ये स्वच्छ सूर्यप्रकाशात कालचे दोन शतकवीर पुन्हा बॅटिंगसाठी सज्ज झाले. आणि काल ज्या थाटात त्यांनी बॅटिंग केली त्याच थाटात पाँटिंग आणि क्लार्कनी आज सुरुवात केली. अवघ्या तासाभरातच दोघांनी स्कोअर चारशे रनच्या पलिकडे नेला. भारतीय फिल्डरनी पाँटिंगवर एकदा मेहरनजर केली ती 186 रनवर त्याचा एक सोपा कॅच सोडून...पाँटिंग पेक्षा क्लार्कचा रनचा वेग जास्त होता. त्यानेच आधी डबल सेंच्युरी पूर्ण केली. या सीरिजमधली त्याची दुसरी डबल सेंच्युरी.. पण लंचब्रेकनंतर मात्र तो एकच बॉल टिकला. वैयक्तिक 210 रनवर यादवने त्याला क्लीनबोल्ड केलं. दोघांमधली पार्टनरशिप होती 386 रनची. पाँटिंगने आपली सहावी डबल सेंच्युरी आज पूर्ण केली ती ट्रेडमार्क पूल शॉट खेळून...भारताविरुद्धची त्याची ही तब्बल तिसरी डबल सेंच्युरी.

त्यानंतर लक्ष्मणने पाँटिंगला दुसरं जीवदान दिलं. ऑस्ट्रेलियाने आता आक्रमक धोरण स्विकारलं होतं. आणि त्याच नादात माईक हसी रनआऊट झाला. गंभीरच्या दक्ष फिल्डिंगमुळे भारतीय टीमला ही विकेट मिळाली. पाठोपाठ पाँटिंगही आऊट झाला. झहीरच्या बॉलिंगवर डीप मिडविकेटला तेंडुलकरने हा कॅच पकडला. त्यानंतर अश्विनने पीटर सिडलला 2 रनवर आऊट केलं. आता ऑस्ट्रेलियाची इनिंग गुंडाळली जाईल असं वाटत होतं, पण ब्रॅड हॅडिन आण रायन हॅरिसने तग धरला आणि इनिंग सहाशे पार नेली. त्यानंतर मात्र सात विकेटवर 604 रनच्या स्कोअरवर कॅप्टन मायकेल क्लार्कने इनिंग घोषित केली.

वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांनी मग भारतीय इनिंग सुरु केली. यावेळी सेहवागच्या चेहर्‍यावर निर्धार दिसत होता. आणि सुरुवातीलाच तीन फोर मारत त्याने आपला इरादाही स्पष्ट केला. पण सिडलच्या एका फुलटॉसने त्याची इनिंगच संपवली. सिडलच्याच हातात कॅच देऊन तो 18 रनवर आऊट झाला. राहुल द्रविड या सीरिजमध्ये सहाव्यांदा क्लीनबोल्ड झाला. सचिन तेंडुलकर आणि गौतम गंभीरने मग उरलेला वेळ फारशी जोखीम न पत्करता खेळून काढला. दिवस संपता संपता भारतीय टीमचा स्कोअर होता दोन विकेटवर 61 रन. टीम अजूनही 543 रन्सनी पिछाडीवर आहे. आणि फॉलोऑन टाळण्यासाठी टीमला हवेत आणखी 343 रन.

द वॉल ढासळली !ऑस्ट्रेलिया दौरा भारतीय टीमसाठी जितका वाईट ठरलाय, त्याहून कितीतरी पटीने खराब ठरलाय तो राहुल द्रविडसाठी...या दौर्‍यात द वॉल अक्षरश ढासळली. ऍडलेड टेस्टमध्ये हिल्फेनहॉसने राहुल द्रविडला फक्त 1 रन्सवर क्लिन बोल्ड केलं. या दौर्‍यात क्लिन बोल्ड होण्याची द्रविडची 7 इनिंगमधली ही 6 वी वेळ होती. तर टेस्ट क्रिकेटमध्ये बोल्ड होण्याची ही त्याची तब्बल 55 वी वेळ आहे. भारताचा सर्वात तंत्रशुध्द बॅट्समन म्हणून राहुल द्रविडची ओळख आहे. पण या दौर्‍यात एकच चुक त्याच्याकडून सारखी होतेय. प्रत्येकवेळी त्याची बोल्ड होण्याची पध्दतही तिच आहे. बॅट आणि पॅडच्यामधून बॉल स्टंम्पवर आदळतोय... हिल्फेनहॉसनं त्याला तब्बल 3 वेळा क्लिन बोल्ड केलंय. तर सिडेलच्या बॉलिंगवर द्रविड दोनदा क्लिन बोल्ड झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 25, 2012 03:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close