S M L

अंडरवर्ल्डची निवडणुकात एंट्री !

सुधाकर काश्यप, मुंबई24 जानेवारीमहापालिका निवडणुकांमध्ये आता वेगळे रंग भरतायत...आपल्या गुंडगिरीने एक काळ गाजवणारे गँगस्टर, आता आपल्या नातेवाईकांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवत आहे. एका प्रकारे निवडणुकांच्या माध्यमातून अंडरवर्ल्ड एन्ट्री करत आहे.मुंबईतील अंडरवर्ल्ड शांत झालं असं वाटत असेल.. तर पुन्हा विचार करा.. कारण आता हे गँगस्टर्स निवडणुकीच्या मार्गाने मुंबईवर राज्य करण्याचे मनसुबे रचत आहेत. अरुण गवळी, डी के राव, छोटा राजन.. हे सगळे अंडरवर्ल्ड डॉन्स आता हात जोडून तुमच्या घरी मतं मागायला आले तर आश्चर्य वाटू नये! अरुण गवळीने महापालिका निवडणुकांसाठी आपल्या अखिल भारतीय सेनेचे 22 उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. त्याची मुलगी गीता गवळी वॉर्ड क्रमांक भायखळ्याच्या वार्ड नंबर 204 मधून बीएमसीच्या रिंगणात उतरणार आहे. डी.के.रावचा सख्खा भाऊ सादा रेड्डी ओरा, आठवलेंच्या आरपीआय माहीममधून निवडणूक लढवणार आहे. डीके राव हा छोटा राजनचा खास माणूस असून.. तोच सध्या गँग चालवल असल्याची सूत्रांची माहिती आहे. छोट राजनचा सख्खा भाऊ दीपक निकाळजेही राजकारणातच सक्रीय आहे. गेल्या पालिका निवडणुकीत दीपक निकाळजेंनी तीन नगरसेवक निवडून आणले होते. त्यामुळं यावेळीही आरपीआयनं त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली. गँगस्टर अश्विन नाईकच्या कुटुंबाचे एकेकाळी दोन नगरसेवक होते. त्याची पत्नी निता नाईक आणि भावजय अंजली नाईक या शिवसेनेच्या नगरसेविका होत्या. कालपर्यंत बंदुकीच्या जोरावर धाक जमवणारे आता मतदान यंत्राच्या माध्यमातून वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 24, 2012 05:00 PM IST

अंडरवर्ल्डची निवडणुकात एंट्री !

सुधाकर काश्यप, मुंबई

24 जानेवारी

महापालिका निवडणुकांमध्ये आता वेगळे रंग भरतायत...आपल्या गुंडगिरीने एक काळ गाजवणारे गँगस्टर, आता आपल्या नातेवाईकांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवत आहे. एका प्रकारे निवडणुकांच्या माध्यमातून अंडरवर्ल्ड एन्ट्री करत आहे.

मुंबईतील अंडरवर्ल्ड शांत झालं असं वाटत असेल.. तर पुन्हा विचार करा.. कारण आता हे गँगस्टर्स निवडणुकीच्या मार्गाने मुंबईवर राज्य करण्याचे मनसुबे रचत आहेत. अरुण गवळी, डी के राव, छोटा राजन.. हे सगळे अंडरवर्ल्ड डॉन्स आता हात जोडून तुमच्या घरी मतं मागायला आले तर आश्चर्य वाटू नये! अरुण गवळीने महापालिका निवडणुकांसाठी आपल्या अखिल भारतीय सेनेचे 22 उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. त्याची मुलगी गीता गवळी वॉर्ड क्रमांक भायखळ्याच्या वार्ड नंबर 204 मधून बीएमसीच्या रिंगणात उतरणार आहे.

डी.के.रावचा सख्खा भाऊ सादा रेड्डी ओरा, आठवलेंच्या आरपीआय माहीममधून निवडणूक लढवणार आहे. डीके राव हा छोटा राजनचा खास माणूस असून.. तोच सध्या गँग चालवल असल्याची सूत्रांची माहिती आहे.

छोट राजनचा सख्खा भाऊ दीपक निकाळजेही राजकारणातच सक्रीय आहे. गेल्या पालिका निवडणुकीत दीपक निकाळजेंनी तीन नगरसेवक निवडून आणले होते. त्यामुळं यावेळीही आरपीआयनं त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली. गँगस्टर अश्विन नाईकच्या कुटुंबाचे एकेकाळी दोन नगरसेवक होते. त्याची पत्नी निता नाईक आणि भावजय अंजली नाईक या शिवसेनेच्या नगरसेविका होत्या. कालपर्यंत बंदुकीच्या जोरावर धाक जमवणारे आता मतदान यंत्राच्या माध्यमातून वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 24, 2012 05:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close