S M L

'सॉफ्टवेअर'ची नोकरी सोडून तो उतरला निवडणुकीच्या रिंगणात

प्राची कुलकर्णी,पुणे24 जानेवारीराजकारण म्हणजे भ्रष्टाचार... असं म्हणत टीका करणारे अनेकजण असतात. पण प्रत्यक्ष राजकारणात उतरून हा भ्रष्टाचार कमी करायची हिंमत किती जण दाखवतात? पुण्यात काही सामान्य, पण सुशिक्षित नागरिक हा बदल घडवायचा प्रयत्न करतायत आणि तेही राजकारणाचा एक भाग बनून... पुण्यातल्या बाणेर परिसरात राहणारा सिद्धार्थ एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपरचं काम करत होता. चांगल्या पगारावर त्याचं आयुष्यही आरामात चाललं होतं. पण फक्त तोंडी लावण्यापुरतं समाजकार्य त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं...म्हणूनचं त्यानं निर्णय घेतला तो थेट निवडणुकीत उतरण्याचा आणि मग कोणालाही स्वप्नवत वाटेल अशी सॉफ्टवेअर इंजिनिअरची नोकरी सोडून देऊन सिद्धार्थ पुणे नागरी संघटनेच्या माध्यमातून निवडणूक लढवतोय. सिद्धार्थसोबतच इतरही अनेक सुशिक्षित नागरीक यावेळेस थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत...भैरू चौगुले त्यापैकीच एक..अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली. पण फक्त आंदोलन पुरेसं नाही असं त्यांना वाटतं आहे. त्यापुढे जाऊन त्यांना बदल घडवायचाय आणि तोही त्या व्यवस्थेचा भाग बनून...

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 24, 2012 05:29 PM IST

'सॉफ्टवेअर'ची नोकरी सोडून तो उतरला निवडणुकीच्या रिंगणात

प्राची कुलकर्णी,पुणे

24 जानेवारी

राजकारण म्हणजे भ्रष्टाचार... असं म्हणत टीका करणारे अनेकजण असतात. पण प्रत्यक्ष राजकारणात उतरून हा भ्रष्टाचार कमी करायची हिंमत किती जण दाखवतात? पुण्यात काही सामान्य, पण सुशिक्षित नागरिक हा बदल घडवायचा प्रयत्न करतायत आणि तेही राजकारणाचा एक भाग बनून... पुण्यातल्या बाणेर परिसरात राहणारा सिद्धार्थ एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपरचं काम करत होता. चांगल्या पगारावर त्याचं आयुष्यही आरामात चाललं होतं. पण फक्त तोंडी लावण्यापुरतं समाजकार्य त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं...म्हणूनचं त्यानं निर्णय घेतला तो थेट निवडणुकीत उतरण्याचा आणि मग कोणालाही स्वप्नवत वाटेल अशी सॉफ्टवेअर इंजिनिअरची नोकरी सोडून देऊन सिद्धार्थ पुणे नागरी संघटनेच्या माध्यमातून निवडणूक लढवतोय. सिद्धार्थसोबतच इतरही अनेक सुशिक्षित नागरीक यावेळेस थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत...भैरू चौगुले त्यापैकीच एक..

अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली. पण फक्त आंदोलन पुरेसं नाही असं त्यांना वाटतं आहे. त्यापुढे जाऊन त्यांना बदल घडवायचाय आणि तोही त्या व्यवस्थेचा भाग बनून...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 24, 2012 05:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close