S M L

पुण्यात बस पळवून ड्रायव्हरचा उच्छाद ; 8 ठार

25 जानेवारीपुण्यात आज सकाळी एका माथेफिरु एसटी ड्रायव्हरने स्वारगेट एसटी स्टँडमधून सातारा स्वारगेट सातारा ही बस पळवून नेऊन सकाळी धुमाकूळ घातला. यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाले. संतोष माने अस या ड्रायव्हरचं नाव आहे, आणि तो स्वारगेट डेपोचाच कर्मचारी आहे. कालच तो गाणगापूर ते पुणे अशी ड्युटी करुन परतला होता. आज सकाळी सव्वा दहा वाजता त्याची ग्रामीण ड्युटी लावली होती. पण लवकरची ड्युटी त्यानं मागितली. पण ही विनंती वरिष्ठांनी ही मागणी झिडकारली. त्यामुळे संतोषने सरळ सातारा-स्वारगेट- सातारा बस ताब्यात घेऊन निघून गेला आणि सोलापूरच्या दिशेनं राँग साईडनं त्यांने अंदाधुंद गाडी दामटत अनेकांना जखमी केलं. हा दिवस पुणं कधीच विसरू शकणार नाही. या 60 मिनिटांमधल्या तांडवाचे घाव पुणेकरांच्या मनावर सदैव राहतील. बुधवारी सकाळी आठच्या सुमारास या थरार नाट्याला सुरवात झाली.. ती स्वारगेटपासून. संतोष माने या ड्रायव्हरनं रागाच्या भरात एक रिकामी बस..स्टँडच्या बाहेर काढली.. आणि भरधाव वेगाने कँपच्या दिशने तो निघाला. सकाळची वेळ असल्यामुळे अनेक मुलं शाळा कॉलेजात जाण्याच्या लगबगीत होती. त्या सगळ्यांना निर्दयीपणे चिरडत संतोष पुढे गेला.कँपमध्ये गर्दी काहीशी कमी असल्याने त्याने वेग वाढवला. इथंही त्यांने वाटेत अनेक दुचाकी वाहनांना तुडवलं. रस्त्यातल्या नुकसानावरूनच त्याच्या वेगाच्या अंदाज येतो. एव्हाना पोलिसांना कळवण्यात आलं होतं. पण एसटीतल्या लोकांनी पोलिसांना सांगितलं की आतापर्यंत या ड्रायव्हरचा रेकॉर्ड अतिशय चांगला आहे.कँपला वळसा घालून तो खडक पोलीस स्टेशनच्या दिशेनं आला होता. एव्हाना अर्धा तास उलटला होता. हा ब्रेक फेल होण्याचा प्रकार नाही, हे उघड झालं होतं. पोलीस संतोषच्या मागे होते. गोळीबार करून त्याची बस थांबवण्याचा प्रयत्न करत होते. पण त्याचा हैदोस काही थांबत नव्हता. मग संतोषने पुन्हा स्वारगेटकडे मोर्चा वळवला. नीलायम थिएटरजवळ त्याने एकापाठोपाठ एक तीन मोठ्या गाड्यांना टक्कर दिली. त्यामुळे त्याचा वेग मंदावला. तीच संधी साधून शरीफ इब्राहिम कुट्टी या शूर विद्यार्थ्याने त्या बसवर झडप घातली आणि संतोषला पकडलं. संतोषला पकडल्यानंतर संतापलेल्या पुणेकरांचा स्फोट झाला. त्यांनी त्याला चोप देण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्याला ताबडतोब ताब्यात घेतलं. ठीक 60 मिनिटांत या भयनाट्यावर पडदा पडला होता. पण तोवर अनेक जीव काळाच्या पडद्याआड गेले होते. इतर बातम्या तो माथेफिरु बस ड्रायव्हर मनोरूग्ण ! पुण्यात एसटी बस घेऊन धुमाकूळ घालणार ड्रायव्हर संतोष माने हा मानसिक रुग्ण असल्याचीही चर्चा आता सुरू झाली आहे. संतोष सोलापूरच्या कवठाळी गावाचा रहिवासी असल्याची माहिती इथल्या सरपंचांनी दिली. तसेच तो मानसिक रुग्ण असून तो गेल्या काही वर्षांपासून तो उपचार घेत असल्याचंही सरपंचांनी सांगितले. सोलापूरच्या डॉक्टर दिलीप बुरटेंकडून त्यानं उपचार घेतला होता. त्यांनी आज केलेले कृत्य हे मनोरुग्णातून केले असावे असा अंदाजही बुरटे यांनी व्यक्त केला.गेल्या 13 वर्षांपासून तो पुण्याला रहायला आला होता, असंही सरपंचांनी सांगितले. संतोष हा कालच गाणगापूर-पुणे बस चालवून पुण्यात आला. आज सकाळी सव्वा दहा वाजता त्याची ग्रामीण ड्युटी लावली होती. पण लवकरची ड्युटी त्यानं मागितली. पण ही विनंती वरिष्ठांनी ही मागणी झिडकारली. त्यामुळे संतापलेल्या संतोषने सरळ सातारा-स्वारगेट- सातारा बस ताब्यात घेऊन निघून गेला आणि धुमाकूळ घातला. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी खबरदारी घेऊ - अजितदादा बस अपघातावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया असा पकडला माथेफिरु बस ड्रायव्हर बस अपघातात मृत पावलेल्या श्वेतानं केलं नेत्रदान रोजच्याप्रमाणे बसची वाट पाहत थांबले अन्...

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 25, 2012 09:19 AM IST

पुण्यात बस पळवून ड्रायव्हरचा उच्छाद ; 8 ठार

25 जानेवारी

पुण्यात आज सकाळी एका माथेफिरु एसटी ड्रायव्हरने स्वारगेट एसटी स्टँडमधून सातारा स्वारगेट सातारा ही बस पळवून नेऊन सकाळी धुमाकूळ घातला. यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाले. संतोष माने अस या ड्रायव्हरचं नाव आहे, आणि तो स्वारगेट डेपोचाच कर्मचारी आहे. कालच तो गाणगापूर ते पुणे अशी ड्युटी करुन परतला होता. आज सकाळी सव्वा दहा वाजता त्याची ग्रामीण ड्युटी लावली होती. पण लवकरची ड्युटी त्यानं मागितली. पण ही विनंती वरिष्ठांनी ही मागणी झिडकारली. त्यामुळे संतोषने सरळ सातारा-स्वारगेट- सातारा बस ताब्यात घेऊन निघून गेला आणि सोलापूरच्या दिशेनं राँग साईडनं त्यांने अंदाधुंद गाडी दामटत अनेकांना जखमी केलं.

हा दिवस पुणं कधीच विसरू शकणार नाही. या 60 मिनिटांमधल्या तांडवाचे घाव पुणेकरांच्या मनावर सदैव राहतील. बुधवारी सकाळी आठच्या सुमारास या थरार नाट्याला सुरवात झाली.. ती स्वारगेटपासून. संतोष माने या ड्रायव्हरनं रागाच्या भरात एक रिकामी बस..स्टँडच्या बाहेर काढली.. आणि भरधाव वेगाने कँपच्या दिशने तो निघाला. सकाळची वेळ असल्यामुळे अनेक मुलं शाळा कॉलेजात जाण्याच्या लगबगीत होती. त्या सगळ्यांना निर्दयीपणे चिरडत संतोष पुढे गेला.कँपमध्ये गर्दी काहीशी कमी असल्याने त्याने वेग वाढवला. इथंही त्यांने वाटेत अनेक दुचाकी वाहनांना तुडवलं. रस्त्यातल्या नुकसानावरूनच त्याच्या वेगाच्या अंदाज येतो. एव्हाना पोलिसांना कळवण्यात आलं होतं. पण एसटीतल्या लोकांनी पोलिसांना सांगितलं की आतापर्यंत या ड्रायव्हरचा रेकॉर्ड अतिशय चांगला आहे.

कँपला वळसा घालून तो खडक पोलीस स्टेशनच्या दिशेनं आला होता. एव्हाना अर्धा तास उलटला होता. हा ब्रेक फेल होण्याचा प्रकार नाही, हे उघड झालं होतं. पोलीस संतोषच्या मागे होते. गोळीबार करून त्याची बस थांबवण्याचा प्रयत्न करत होते. पण त्याचा हैदोस काही थांबत नव्हता.

मग संतोषने पुन्हा स्वारगेटकडे मोर्चा वळवला. नीलायम थिएटरजवळ त्याने एकापाठोपाठ एक तीन मोठ्या गाड्यांना टक्कर दिली. त्यामुळे त्याचा वेग मंदावला. तीच संधी साधून शरीफ इब्राहिम कुट्टी या शूर विद्यार्थ्याने त्या बसवर झडप घातली आणि संतोषला पकडलं.

संतोषला पकडल्यानंतर संतापलेल्या पुणेकरांचा स्फोट झाला. त्यांनी त्याला चोप देण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्याला ताबडतोब ताब्यात घेतलं. ठीक 60 मिनिटांत या भयनाट्यावर पडदा पडला होता. पण तोवर अनेक जीव काळाच्या पडद्याआड गेले होते.

इतर बातम्या

तो माथेफिरु बस ड्रायव्हर मनोरूग्ण !

पुण्यात एसटी बस घेऊन धुमाकूळ घालणार ड्रायव्हर संतोष माने हा मानसिक रुग्ण असल्याचीही चर्चा आता सुरू झाली आहे. संतोष सोलापूरच्या कवठाळी गावाचा रहिवासी असल्याची माहिती इथल्या सरपंचांनी दिली. तसेच तो मानसिक रुग्ण असून तो गेल्या काही वर्षांपासून तो उपचार घेत असल्याचंही सरपंचांनी सांगितले. सोलापूरच्या डॉक्टर दिलीप बुरटेंकडून त्यानं उपचार घेतला होता. त्यांनी आज केलेले कृत्य हे मनोरुग्णातून केले असावे असा अंदाजही बुरटे यांनी व्यक्त केला.गेल्या 13 वर्षांपासून तो पुण्याला रहायला आला होता, असंही सरपंचांनी सांगितले. संतोष हा कालच गाणगापूर-पुणे बस चालवून पुण्यात आला. आज सकाळी सव्वा दहा वाजता त्याची ग्रामीण ड्युटी लावली होती. पण लवकरची ड्युटी त्यानं मागितली. पण ही विनंती वरिष्ठांनी ही मागणी झिडकारली. त्यामुळे संतापलेल्या संतोषने सरळ सातारा-स्वारगेट- सातारा बस ताब्यात घेऊन निघून गेला आणि धुमाकूळ घातला.

भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी खबरदारी घेऊ - अजितदादा बस अपघातावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया असा पकडला माथेफिरु बस ड्रायव्हर बस अपघातात मृत पावलेल्या श्वेतानं केलं नेत्रदान रोजच्याप्रमाणे बसची वाट पाहत थांबले अन्...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 25, 2012 09:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close