S M L

ध्यानचंद आणि गिर्यारोहक तेनसिंग नोर्गे यांना भारतरत्न ?

25 जानेवारीहॉकीचे जादूगार ध्यानचंद यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न पुरस्कार दिला जाईल अशी खात्रीलायक बातमी आहे. ध्यानचंद यांच्याबरोबरच माऊंट एव्हरेस्ट शिखरावर यशस्वी चढाई करणारे गिर्यारोहक तेनसिंग नोर्गे यांच्याही नावाची शक्यता आहे. या दोघांचीही शिफारस क्रीडा मंत्रालयाने केली आहे. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचे नाव मात्र यावर्षी यादीत नाही. कारण बीसीसीआयने त्याची शिफारसच केली नाही आहे. खरंतर महाराष्ट्रात राजकीय वर्तुळातही सचिन तेंडुलकरला भारतरत्न देण्यावरुन चर्चा सुरु होती. पण यावर्षी तरी या पुरस्कारासाठी ध्यानचंद आणि तेनसिंग नोर्गे यांचीच शिफारस झालीय. 2011 वर्षापर्यंत स्पोर्ट्समधल्या कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्याची सोय नव्हती. पण याचवर्षी कला, साहित्य आणि विज्ञान यांच्या जोडीने स्पोर्ट्समधल्या कामगिरीचाही या सर्वोच्च पुरस्कारासाठी विचार होतोय. आणि ध्यानचंद हे भारतरत्न मिळवणारे पहिले क्रीडापटू ठरतील. यापूर्वी 2008मध्ये हा पुरस्कार भीमसेन जोशी यांना मिळाला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 25, 2012 09:55 AM IST

ध्यानचंद आणि गिर्यारोहक तेनसिंग नोर्गे यांना भारतरत्न ?

25 जानेवारी

हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न पुरस्कार दिला जाईल अशी खात्रीलायक बातमी आहे. ध्यानचंद यांच्याबरोबरच माऊंट एव्हरेस्ट शिखरावर यशस्वी चढाई करणारे गिर्यारोहक तेनसिंग नोर्गे यांच्याही नावाची शक्यता आहे. या दोघांचीही शिफारस क्रीडा मंत्रालयाने केली आहे. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचे नाव मात्र यावर्षी यादीत नाही. कारण बीसीसीआयने त्याची शिफारसच केली नाही आहे. खरंतर महाराष्ट्रात राजकीय वर्तुळातही सचिन तेंडुलकरला भारतरत्न देण्यावरुन चर्चा सुरु होती. पण यावर्षी तरी या पुरस्कारासाठी ध्यानचंद आणि तेनसिंग नोर्गे यांचीच शिफारस झालीय. 2011 वर्षापर्यंत स्पोर्ट्समधल्या कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्याची सोय नव्हती. पण याचवर्षी कला, साहित्य आणि विज्ञान यांच्या जोडीने स्पोर्ट्समधल्या कामगिरीचाही या सर्वोच्च पुरस्कारासाठी विचार होतोय. आणि ध्यानचंद हे भारतरत्न मिळवणारे पहिले क्रीडापटू ठरतील. यापूर्वी 2008मध्ये हा पुरस्कार भीमसेन जोशी यांना मिळाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 25, 2012 09:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close