S M L

बनावट सिमकार्डमुळे एटीएसच्या तपासाला अडथळा

शोएब अहमद, मुंबई27 जानेवारीएटीएसला सध्या सगळ्या तपासांमध्ये अडचण येतेय ती खोट्या सिम कार्ड्समुळे...खोटी कागदपत्रं देऊन मिळवलेल्या या सिमकार्डच्या मदतीने दहशतवादी कटांची आखणी तर करतातच पण सुरक्षेच्या कचाट्यातूनही बाहेर राहतात आहे. याच पद्धतीचा वापर जुलै 2011 च्या मुंबई सिरीयल ब्लास्टचा मास्टरमाईंट यासिन भटकळनेही केला. आता या फेक सिमकार्डस बद्दल कडक पावलं उचलावीत अशाी विनंती महाराष्ट्र एटीएसने ट्रायला केली आहे.अहमद झरार सिद्दीबुपा....ऊर्फ इमरान...ऊर्फ यासिन भटकळ...13 जुलै 2011 च्या मुंबई सिरीयल ब्लास्टचा मास्टरमाईंड...झवेरी बाजार आणि ऑपेरा हाऊसमध्ये बॉम्ब ठेवणार्‍यांसोबत बोलताना त्याने याच नंबरचा वापर केला. आणि या नंबरचं सिमकार्ड विकत घेण्यासाठीची बोगस कागदपत्रं मिळवण्यासाठी लागले...फक्त 3 रुपये !!फेक सिमकार्ड्स आणि 13/7- एमटीएनएल चा एजंट गणेश विठ्ठल तिकोलेला या प्रकरणात अटक करण्यात आली. एमटीएनएलचं प्री-पेड सिमकार्ड घेण्यासाठी सामान्यांनी दिलेल्या ओरीजिनल कागदपत्रांच्या झेरॉक्स याने विकल्या. - खोटी सिमकार्ड रजिस्टर करण्यासाठी शेकडो कागदपत्रं आणि फोटो प्रत्येकी 3 रुपयांनी विकले गेले. - यातली काही फेक सिमकार्ड वाढीव दराने इंडियन मुजाहिदीनच्या मुंबई, पुणे आणि बिहारमधल्या अतिरेक्यांना विकली गेली. - हे सगळं प्रकरण दरभंगापर्यंत पसरल्याचं तपासात उघड झालं. - फेक सिमकार्ड इंडस्ट्री- 2010मध्ये पोलिसांनी 26,450 सिमकार्ड्सची तपासणी केली. - यातील 8909 सिमकार्ड बोगस असल्याचं आढळून आलं. - अशीच तब्बल 4993 सिमकार्ड्स आणि हजाराच्या वर बोगस कागदपत्रं या महिन्यात जप्त करण्यात आली आहेत. ही गोष्ट आता महाराष्ट्र एटीएसने ट्रायच्या निदर्शनास आणून दिलीय. कागदपत्रांच्या पडताळणीबाबत मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर्स आणि डीलर्समध्ये सध्या टोलवाटोलवी सुरू आहे. आणि बोगस सिमकार्डसची वाढती संख्या एटीएसच्या मार्गातला अडथळा ठरतेय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 27, 2012 10:13 AM IST

बनावट सिमकार्डमुळे एटीएसच्या तपासाला अडथळा

शोएब अहमद, मुंबई

27 जानेवारी

एटीएसला सध्या सगळ्या तपासांमध्ये अडचण येतेय ती खोट्या सिम कार्ड्समुळे...खोटी कागदपत्रं देऊन मिळवलेल्या या सिमकार्डच्या मदतीने दहशतवादी कटांची आखणी तर करतातच पण सुरक्षेच्या कचाट्यातूनही बाहेर राहतात आहे. याच पद्धतीचा वापर जुलै 2011 च्या मुंबई सिरीयल ब्लास्टचा मास्टरमाईंट यासिन भटकळनेही केला. आता या फेक सिमकार्डस बद्दल कडक पावलं उचलावीत अशाी विनंती महाराष्ट्र एटीएसने ट्रायला केली आहे.अहमद झरार सिद्दीबुपा....ऊर्फ इमरान...ऊर्फ यासिन भटकळ...13 जुलै 2011 च्या मुंबई सिरीयल ब्लास्टचा मास्टरमाईंड...झवेरी बाजार आणि ऑपेरा हाऊसमध्ये बॉम्ब ठेवणार्‍यांसोबत बोलताना त्याने याच नंबरचा वापर केला. आणि या नंबरचं सिमकार्ड विकत घेण्यासाठीची बोगस कागदपत्रं मिळवण्यासाठी लागले...फक्त 3 रुपये !!

फेक सिमकार्ड्स आणि 13/7

- एमटीएनएल चा एजंट गणेश विठ्ठल तिकोलेला या प्रकरणात अटक करण्यात आली. एमटीएनएलचं प्री-पेड सिमकार्ड घेण्यासाठी सामान्यांनी दिलेल्या ओरीजिनल कागदपत्रांच्या झेरॉक्स याने विकल्या. - खोटी सिमकार्ड रजिस्टर करण्यासाठी शेकडो कागदपत्रं आणि फोटो प्रत्येकी 3 रुपयांनी विकले गेले. - यातली काही फेक सिमकार्ड वाढीव दराने इंडियन मुजाहिदीनच्या मुंबई, पुणे आणि बिहारमधल्या अतिरेक्यांना विकली गेली. - हे सगळं प्रकरण दरभंगापर्यंत पसरल्याचं तपासात उघड झालं. - फेक सिमकार्ड इंडस्ट्री

- 2010मध्ये पोलिसांनी 26,450 सिमकार्ड्सची तपासणी केली. - यातील 8909 सिमकार्ड बोगस असल्याचं आढळून आलं. - अशीच तब्बल 4993 सिमकार्ड्स आणि हजाराच्या वर बोगस कागदपत्रं या महिन्यात जप्त करण्यात आली आहेत. ही गोष्ट आता महाराष्ट्र एटीएसने ट्रायच्या निदर्शनास आणून दिलीय. कागदपत्रांच्या पडताळणीबाबत मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर्स आणि डीलर्समध्ये सध्या टोलवाटोलवी सुरू आहे. आणि बोगस सिमकार्डसची वाढती संख्या एटीएसच्या मार्गातला अडथळा ठरतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 27, 2012 10:13 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close