S M L

..या गावाचा कारभार सुशिक्षित तरुणींच्या हाती !

मेघदूत शेरॉन, आणंद26 जानेवारीपंचायती राजमध्ये आदर्श ठरावं असं उदाहरण गुजरातच्या एका गावामध्ये घडलंय. संपूर्ण गावकारभार सुशिक्षित युवतींच्या हातात द्यायचा निर्णय गावकर्‍यांनी घेतला. सत्तेतल्या या तरुण कारभारणी गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आल्या आहेत.आणंद जिल्ह्यातल्या सिसवा गावात कामात गर्क असलेल्या सगळ्याजणी 18 ते 23 वयोगटातल्या आहेत. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये 10 हजार ग्रामपंचायतींची निवडणूक गुजरातमध्ये झाली. सिसवा गावात तर ही निवडणूक बिनविरोध लढली जाईल असं जाहीर केलं गेलं. आणि 12 सुशिक्षित मुली बिनविरोध निवडुन आल्या. या नव्या कारभारणींमध्ये कोणी शिक्षिका आहे, कोणी इंजिनिअर, कोणी नर्स आणि तर कोणी आयटी व्यावसायिक. आता या कारभारणींचा प्रवास बदल आणण्याच्या दिशेने सुरु झाला आहे. शिक्षिका असणार्‍या हिना पटेल यांना भेटलं की बदलाची सुरुवात दिसते. सरपंच हिना पटेल म्हणतात, या गावाने स्त्रियांवर विश्वास दाखवलाय आणि आम्ही या गावाच्या विकासासाठी सर्वप्रकारे प्रयत्न करु...आमची पार्श्वभुमी वेगवेगळी आहे आणि ज्याची आम्हाला मदत होईल. या गावातील गावकरी कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधील नाहीत. म्हणूनच गावकारभार चालवण्यासाठी त्यांनी मुलींना निवडून आणलं. गावकर्‍यांनी आणि महिला ग्रामपंचायतीने इतरांसाठी आदर्श घालून दिलाय असा विश्वास आणंद जिल्हा प्रशासनाला वाटतोय. तहसीलदार डी.एच.त्रिपाठी म्हणतात, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे आणि मला अशी आशा आहे की राज्याचा दृष्टीकोन त्यामुळे बदलेल. शिकलेले लोक खास करुन महिला ग्रामपंचायतीचा गट बनवतील ही खरचं चांगली बाब आहे चांगल्या कामाची नांदी तर झाली आता गावाला वेध लागले आहे ते प्रत्यक्षात काम उभं राहण्याचे. बिनविरोध निवडणुकीसाठी गुजरात सरकारतर्फे समरस योजने अंतर्गत दिला जाणारा पुरस्कार सिसवा गावाला मिळाला आहे. हा पुरस्कार असतो 5 लाखांचा. नव्याने निवडुन आलेल्या कारभारणींच्या हातात विकासाच्या कामांसाठी 50 लाख आहेत, संधीचं सोनं करण्यासाठी.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 26, 2012 04:46 PM IST

..या गावाचा कारभार सुशिक्षित तरुणींच्या हाती !

मेघदूत शेरॉन, आणंद

26 जानेवारी

पंचायती राजमध्ये आदर्श ठरावं असं उदाहरण गुजरातच्या एका गावामध्ये घडलंय. संपूर्ण गावकारभार सुशिक्षित युवतींच्या हातात द्यायचा निर्णय गावकर्‍यांनी घेतला. सत्तेतल्या या तरुण कारभारणी गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आल्या आहेत.

आणंद जिल्ह्यातल्या सिसवा गावात कामात गर्क असलेल्या सगळ्याजणी 18 ते 23 वयोगटातल्या आहेत. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये 10 हजार ग्रामपंचायतींची निवडणूक गुजरातमध्ये झाली. सिसवा गावात तर ही निवडणूक बिनविरोध लढली जाईल असं जाहीर केलं गेलं. आणि 12 सुशिक्षित मुली बिनविरोध निवडुन आल्या. या नव्या कारभारणींमध्ये कोणी शिक्षिका आहे, कोणी इंजिनिअर, कोणी नर्स आणि तर कोणी आयटी व्यावसायिक. आता या कारभारणींचा प्रवास बदल आणण्याच्या दिशेने सुरु झाला आहे. शिक्षिका असणार्‍या हिना पटेल यांना भेटलं की बदलाची सुरुवात दिसते.

सरपंच हिना पटेल म्हणतात, या गावाने स्त्रियांवर विश्वास दाखवलाय आणि आम्ही या गावाच्या विकासासाठी सर्वप्रकारे प्रयत्न करु...आमची पार्श्वभुमी वेगवेगळी आहे आणि ज्याची आम्हाला मदत होईल.

या गावातील गावकरी कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधील नाहीत. म्हणूनच गावकारभार चालवण्यासाठी त्यांनी मुलींना निवडून आणलं. गावकर्‍यांनी आणि महिला ग्रामपंचायतीने इतरांसाठी आदर्श घालून दिलाय असा विश्वास आणंद जिल्हा प्रशासनाला वाटतोय.

तहसीलदार डी.एच.त्रिपाठी म्हणतात, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे आणि मला अशी आशा आहे की राज्याचा दृष्टीकोन त्यामुळे बदलेल. शिकलेले लोक खास करुन महिला ग्रामपंचायतीचा गट बनवतील ही खरचं चांगली बाब आहे

चांगल्या कामाची नांदी तर झाली आता गावाला वेध लागले आहे ते प्रत्यक्षात काम उभं राहण्याचे. बिनविरोध निवडणुकीसाठी गुजरात सरकारतर्फे समरस योजने अंतर्गत दिला जाणारा पुरस्कार सिसवा गावाला मिळाला आहे. हा पुरस्कार असतो 5 लाखांचा. नव्याने निवडुन आलेल्या कारभारणींच्या हातात विकासाच्या कामांसाठी 50 लाख आहेत, संधीचं सोनं करण्यासाठी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 26, 2012 04:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close