S M L

पिंपरी- चिंचवडमध्येही युती तुटण्याची शक्यता

26 जानेवारीनाशिकमध्ये युती तुटल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्येही युती तुटण्याची शक्यता आहे. भाजप आणि शिवसेनेमध्ये जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. एकूण 12 जागांवरुन हा वाद आहे. त्यातले 9, 11 आणि 33 या वॉर्डांमध्ये तीव्र मतभेद आहेत. अनेक वेळा चर्चा होऊनही कुठलाही तोडगा निघू शकलेला नाही. अखेर शिवसेनेनं मैत्रीपूर्ण लढतीचा पर्यायही ठेवला. पण त्यावरही एकमत होऊ शकलेलं नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संम्रभ निर्माण झाला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवतील अशी शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान महायुतीचा निर्णय घेण्याची जबाबदारी उध्दव ठाकरे आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यावर सोपवण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 26, 2012 04:48 PM IST

पिंपरी- चिंचवडमध्येही युती तुटण्याची शक्यता

26 जानेवारी

नाशिकमध्ये युती तुटल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्येही युती तुटण्याची शक्यता आहे. भाजप आणि शिवसेनेमध्ये जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. एकूण 12 जागांवरुन हा वाद आहे. त्यातले 9, 11 आणि 33 या वॉर्डांमध्ये तीव्र मतभेद आहेत. अनेक वेळा चर्चा होऊनही कुठलाही तोडगा निघू शकलेला नाही. अखेर शिवसेनेनं मैत्रीपूर्ण लढतीचा पर्यायही ठेवला. पण त्यावरही एकमत होऊ शकलेलं नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संम्रभ निर्माण झाला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवतील अशी शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान महायुतीचा निर्णय घेण्याची जबाबदारी उध्दव ठाकरे आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यावर सोपवण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 26, 2012 04:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close