S M L

पुण्यात सशस्त्र टोळक्याने दुकाने पेटवले ; एकाचा मृत्यू

28 जानेवारीपुण्याच्या धनकवडी भागातील गुलाबनगर इथं रात्री उशीरा, टॉरटॉईस कलेक्शन हे दुकान सशस्त्र टोळक्यांनी पेटवून दिले. यात अनिष जैन साखरीया या युवकाचा मृत्यू झाला तर स्वप्नील मोरे आणि सन्नी मोरे हे दोघे तरुण गंभीर जखमी झाले आहेत. पुर्व वैमन्यसातून हा प्रकार घडल्याचं बोललं जातं आहे. या घटनेमुळे संपूर्ण धनकवडी आणि बालाजीनगर परिसरात खळबळ उडाली. काही महिन्यांपूर्वी या भागात नवरात्रातील तोरण मिरवणूकीवरुन दोन गटात झालेल्या हाणामारीत परिसरातील अनेक गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. यावेळी एका तरुणाचा मृत्यूही झाला होता. या घटनांचा परस्परांशी काही संबंध आहे का याचा पोलीस तपास करत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 28, 2012 11:15 AM IST

पुण्यात सशस्त्र टोळक्याने दुकाने पेटवले ; एकाचा मृत्यू

28 जानेवारी

पुण्याच्या धनकवडी भागातील गुलाबनगर इथं रात्री उशीरा, टॉरटॉईस कलेक्शन हे दुकान सशस्त्र टोळक्यांनी पेटवून दिले. यात अनिष जैन साखरीया या युवकाचा मृत्यू झाला तर स्वप्नील मोरे आणि सन्नी मोरे हे दोघे तरुण गंभीर जखमी झाले आहेत. पुर्व वैमन्यसातून हा प्रकार घडल्याचं बोललं जातं आहे. या घटनेमुळे संपूर्ण धनकवडी आणि बालाजीनगर परिसरात खळबळ उडाली. काही महिन्यांपूर्वी या भागात नवरात्रातील तोरण मिरवणूकीवरुन दोन गटात झालेल्या हाणामारीत परिसरातील अनेक गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. यावेळी एका तरुणाचा मृत्यूही झाला होता. या घटनांचा परस्परांशी काही संबंध आहे का याचा पोलीस तपास करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 28, 2012 11:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close