S M L

नाराज मनसे उमेदवारांच्या संतापाचा स्फोट

29 जानेवारीमहापालिकेवर निवडून येणार्‍या उमेदवाराला पालिकेची संपूर्ण माहिती असावी यासाठी अभिनव अशी इच्छुक उमेदवारांची परीक्षा घेऊन राज यांनी उमेदवारांना उत्साहीत करुन परीक्षेला लावले. पण यादी जाहीर झाल्यानंतर नाराजीचा स्फोट आज मनसेत झाला. आणि ठाण्यात कार्यकर्त्यांनी पुस्तिका फाडल्या, कार्यलयासमोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. एवढ्यावरच हे थांबले नाही तर तिकीटासाठी पैसे मागितल्याचा आरोप नितिन भोईर यांनी केला. तर दुसरीकडे घाटकोपर भागात नगरसेवक परमेश्वर कदम यांच्या पत्नीला उमेदवारी मिळाल्याने नाराज उमेदवार आणि समर्थकांनी राज ठाकरे यांच्या घरावर निषेध मोर्चा काढला. मात्र यावेळी राज यांनी मोर्चेकरांना भेटण्यास नकार दिला.दोनच दिवसांपुर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी परवा उमेदवारांची यादी जाहीर करणार अशी घोषणा केली. तसेच मला बंडखोरीची चिंता नाही, यासाठी मी काही पक्ष चालवत नाही असं ठणाकावून कार्यकर्त्यांना सांगितले. पण ऐकणार ते कार्यकर्ते काय ? आज आपल्या निवासस्थानी कृष्णकुंजवर राज यांनी पत्रकार परिषदेत उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत मुंबईतील 208 , ठाण्यातील 130 पैकी 115 , पुण्यातल्या 152 पैकी 138 तर नाशिकमधल्या 122 पैकी 115 उमेदवारांची घोषणा राज यांनी केली. यावेळीही ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांची पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त केली तसेच काही प्रभागांचा तांत्रिक मुद्दा सुटल्यावर उरलेल्या सगळ्या उमेदवारांचीही यादी जाहीर होणार आहे असं सांगितले. पण यादी प्रसिध्द होऊन काही तास उलट नाही तोच उमेदवारी न भेटलेल्या कार्यकर्त्यांचा बांध फुटला आणि ठाण्यात आपल्याच पक्षाच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं. यावेळी पक्षाने दिलेली माहिती पुस्तिका फाडल्या,आणि जोरदार घोषणाबाजी केल्या.तसेच यांनी तिकीटासाठी पैसे मागितल्याचा आरोप नितिन भोईर यांनी केला. तसेच घाटकोपर भागात नगरसेवक परमेश्वर कदम यांच्या पत्नीला उमेदवारी मिळाल्याने नाराज उमेदवार आणि समर्थकांनी राज ठाकरे यांच्या घरावर निषेध मोर्चा काढला. मात्र यावेळी राज यांनी मोर्चेकरांना भेटण्यास नकार दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 29, 2012 05:22 PM IST

नाराज मनसे उमेदवारांच्या संतापाचा स्फोट

29 जानेवारी

महापालिकेवर निवडून येणार्‍या उमेदवाराला पालिकेची संपूर्ण माहिती असावी यासाठी अभिनव अशी इच्छुक उमेदवारांची परीक्षा घेऊन राज यांनी उमेदवारांना उत्साहीत करुन परीक्षेला लावले. पण यादी जाहीर झाल्यानंतर नाराजीचा स्फोट आज मनसेत झाला. आणि ठाण्यात कार्यकर्त्यांनी पुस्तिका फाडल्या, कार्यलयासमोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. एवढ्यावरच हे थांबले नाही तर तिकीटासाठी पैसे मागितल्याचा आरोप नितिन भोईर यांनी केला. तर दुसरीकडे घाटकोपर भागात नगरसेवक परमेश्वर कदम यांच्या पत्नीला उमेदवारी मिळाल्याने नाराज उमेदवार आणि समर्थकांनी राज ठाकरे यांच्या घरावर निषेध मोर्चा काढला. मात्र यावेळी राज यांनी मोर्चेकरांना भेटण्यास नकार दिला.दोनच दिवसांपुर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी परवा उमेदवारांची यादी जाहीर करणार अशी घोषणा केली. तसेच मला बंडखोरीची चिंता नाही, यासाठी मी काही पक्ष चालवत नाही असं ठणाकावून कार्यकर्त्यांना सांगितले. पण ऐकणार ते कार्यकर्ते काय ? आज आपल्या निवासस्थानी कृष्णकुंजवर राज यांनी पत्रकार परिषदेत उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत मुंबईतील 208 , ठाण्यातील 130 पैकी 115 , पुण्यातल्या 152 पैकी 138 तर नाशिकमधल्या 122 पैकी 115 उमेदवारांची घोषणा राज यांनी केली. यावेळीही ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांची पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त केली तसेच काही प्रभागांचा तांत्रिक मुद्दा सुटल्यावर उरलेल्या सगळ्या उमेदवारांचीही यादी जाहीर होणार आहे असं सांगितले. पण यादी प्रसिध्द होऊन काही तास उलट नाही तोच उमेदवारी न भेटलेल्या कार्यकर्त्यांचा बांध फुटला आणि ठाण्यात आपल्याच पक्षाच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं. यावेळी पक्षाने दिलेली माहिती पुस्तिका फाडल्या,आणि जोरदार घोषणाबाजी केल्या.तसेच यांनी तिकीटासाठी पैसे मागितल्याचा आरोप नितिन भोईर यांनी केला. तसेच घाटकोपर भागात नगरसेवक परमेश्वर कदम यांच्या पत्नीला उमेदवारी मिळाल्याने नाराज उमेदवार आणि समर्थकांनी राज ठाकरे यांच्या घरावर निषेध मोर्चा काढला. मात्र यावेळी राज यांनी मोर्चेकरांना भेटण्यास नकार दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 29, 2012 05:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close